शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

श्रीकृष्णाने मुकुटात मोरपीस खोवले, त्यामागे कारण आहे कृष्णाची पूर्वजन्मातील कृतज्ञता! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 11:21 IST

श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हातात बासरी आणि मुकुटात खोवलेले मोरपीस; ते केवळ शोभेचे नाही तर त्यामागे आहे सुंदर कथा!

कधीही कोणाचे केलेले उपकार विसरू नयेत, असे म्हणतात. परमेश्वराने हा आदर्श त्याच्या कृतीतून घालून दिला आहे. जसे की कृष्णावतारात त्याच्या मुकुटात सदोदित खोवलेले मोरपीस! त्यात केवळ कृष्णाची रसिकता नाही, तर कृतज्ञ भाव दडलेला आहे. हा कृतज्ञ भाव कोणाप्रती? हे जाणून घेण्यासाठी वाचा ही छानशी गोष्ट...

वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली, तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले. पण पाणी कोठेच मिळेना. सर्वत्र जंगलच दिसत होते. तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की, जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हांला दाखव. तेव्हा एक मोर तेथे आला व श्रीरामास म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.चला मी आपणास दाखवतो.पण मार्गात मी  उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार, त्यामुळे चुकामूक होऊ शकते. म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन. त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयाजवळ पोहचाल.

मोरपंख एका विशेष काळी व एका विशेष ऋतुमध्ये आपणहून तुटून पडतात. पण मोराच्या इच्छेविरूद्ध पंख काढले तर त्याचा मृत्यु होतो. रामकथेतल्या मोराचा काळ जवळ आला नव्हता, पण प्रभू कार्यार्थ त्याने पंख काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचा मृत्यूचा जवळ आला. जलाशयाजवळ प्रभू रामचंद्र पोहोचले  तेव्हा मोर म्हणाला की, 'मी किती भाग्यशाली आहे की, जो या सृष्टीची तहान भागवतो, त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले.आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही.'

तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मोराला म्हटले की, माझ्यासाठी जे सुंदर मोरपंख तू अकाली काढून मार्गात टाकलेस, त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहेत व जो ऋणानुबंध झाला आहे, हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडीन. 

त्यानुसार पुढच्या अवतारात, म्हणजे श्रीकृष्ण अवतारात प्रभू रामांनी आपल्या मुकुटावर मयूरपंख धारण करुन दिलेल्या वचनानुसार मयुराचे ऋण व्यक्त केले. शिवाय त्याच्या ऋणात कायम राहण्यासाठी आहे त्याचा मान वाढवण्यासाठी मोरपंखांना आपल्यापासून कधीच विलग केले नाही. 

भगवंताप्रमाणे आपणही आपल्यावर केलेल्या उपकरांची जाणीव ठेवून कृतज्ञतेने वागले पाहिजे. माता, पिता, गुरु, नातेवाईक, समाज, निसर्ग या सर्वांचाच आपल्या जडण घडणीत मोठा वाटा आहे. शिवाय ज्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिला, श्वास दिला, निरोगी, सुदृढ शरीर दिले, त्याच्या ऋणात कायम राहिले पाहिजे.