स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 14:21 IST2026-04-08T14:18:27+5:302026-04-08T14:21:19+5:30

Shree Swami Samarth Smaran Din 2026: श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन कधी? कोणती सेवा करावी? सविस्तर जाणून घ्या...

shree swami samarth smaran din 2026 do 3 remedies for 7 days this seva will give protective shield you experience wonderful grace of swami maharaj | स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!

स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!

Shree Swami Samarth Smaran Din 2026: चैत्र महिना स्वामी भक्तांसाठी विशेष असतो. चैत्र शुद्ध द्वितीयेला श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन उत्साहाने साजरा केला जातो. तर चैत्र वद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या स्मरण दिनी स्वामींची शिकवण, उपदेश, स्वामी विचार यांचे स्मरण करून स्वामींच्या चरणी विशेष सेवा अर्पण केली जाते. स्वामींची कृपा लाभावी, यासाठी प्रत्येक जण विशेष प्रयत्न करत असतो, काही उपाय करत असतो.

बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. विशेष म्हणजे याच दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्रि व्रत एकत्र आले आहेत. महादेव शिवशंकरांचे अखंड स्मरण स्वामी करत असत. त्यामुळे प्रदोष, मासिक शिवरात्रि व्रत आणि स्वामींचा स्मरण दिन एकाच दिवशी येणे पुण्य फलदायी मानले गेले आहे. स्वामी स्मरण दिनाला ७ दिवस आहेत. गुरुवार, ०९ एप्रिल २०२६ पासून ते स्वामी स्मरण दिनापर्यंत न चुकता स्वामी सेवा केल्यास लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. 

७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल

- स्वामी सेवेतील तीन सेवांपैकी एक उपाय सकाळी करायचा आहे आणि दुसरा सायंकाळी करायचा आहे.

- सकाळच्या वेळात पहिला उपाय करावा. एक वही घ्यावी आणि त्यावर २१ वेळा ‘श्री स्वामी समर्थ’ असे लिहावे. 

- तसेच सायंकाळी स्वामींचा अत्यंत प्रभावी मानला गेलेला तारक मंत्र म्हणावा किंवा श्रवण करावा. 

- हे दोन्ही उपाय करताना सकाळी आणि सायंकाळी वेळ निश्चित करावी. तुम्हाला जी वेळ योग्य वाटते, ती वेळ निवडावी आणि हे दोन्ही उपाय करावेत.

- न चुकता आणि सलग हे उपाय करावेत. हे दोन्ही उपाय करणार असल्याचा संकल्प करावा.

- तिसरा उपाय म्हणजे डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने "श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः" या मंत्राचा जप करावा.

- तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार २१ वेळा किंवा १०८ वेळा (एक माळ) किंवा त्यापेक्षा जास्त जप करू शकता.

- दररोज एक वेळ ठरवून घ्या. त्याच वेळी रोज ही साधना करणे अधिक फलदायी मानले जाते.

- घरातील देवघरासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर आसन टाकून शांत बसावे. तुपाचा दिवा किंवा अगरबत्ती प्रज्वलित करावी.

- जप करण्यापूर्वी स्वामींना आपली मनोकामना विनवणी स्वरूपात सांगावी आणि जप पूर्ण झाल्यावर स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे.

- निस्वार्थ नामस्मरणामुळे स्वामी भक्ताच्या हाकेला धावून येतात आणि त्याची सत्कार्य पूर्ण करतात, असा अनेकांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. 

- ही केवळ एक कृती नसून ती स्वामींशी जोडले जाण्याची एक भक्तिपूर्ण प्रक्रिया आहे. 

- स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. 

- स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. 

॥ श्री स्वामी समर्थ ॥

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Web Title : स्वामी स्मरण दिन 2026: 7 दिन, 3 उपाय, दैवीय कृपा प्राप्ति

Web Summary : स्वामी स्मरण दिन 2026 से पहले सात दिनों तक इन तीन उपायों का पालन करें। 'श्री स्वामी समर्थ' 21 बार जपें, तारक मंत्र का जाप करें, और 'श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः' पर ध्यान केंद्रित करें। भक्ति से मनोकामनाएं पूर्ण होंगी।

Web Title : Swami Smaran Din 2026: 7 Days, 3 Remedies for Divine Grace

Web Summary : Follow these three remedies for seven days leading up to Swami Smaran Din 2026 for divine blessings. Recite 'Shree Swami Samarth' 21 times, chant the Tarak mantra, and meditate on 'Shree Akkalkot Swami Samarthay Namah' with devotion to fulfill wishes.