श्री स्वामी समर्थ प्रकट दिन २०२६: स्वामींना घरी आणायचा विचार करताय? ‘अशी’ करा प्रतिष्ठापना, कायम कृपा राहील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:59 IST2026-03-18T14:54:30+5:302026-03-18T14:59:03+5:30

Shree Swami Samarth Maharaj Prakat Din 2026: प्रकट दिनाच्या निमित्ताने अनेकांना स्वामींना घरी आणून त्यांची सेवा करण्याची मनापासून इच्छा असते.

shree swami samarth prakat din 2026 know how swami pratishthapana do in house important rules swami will remain blessed you forever | श्री स्वामी समर्थ प्रकट दिन २०२६: स्वामींना घरी आणायचा विचार करताय? ‘अशी’ करा प्रतिष्ठापना, कायम कृपा राहील!

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन २०२६: स्वामींना घरी आणायचा विचार करताय? ‘अशी’ करा प्रतिष्ठापना, कायम कृपा राहील!

Shree Swami Samarth Maharaj Prakat Din 2026: भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा प्रत्येक स्वामी भक्तासाठी पर्वणीच असतो. स्वामींची सेवा कशी करावी, काय करावी, काय तयारी करावी, याबाबत विचारविनिमय सुरू होतो. स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी कोट्यवधि भाविक आवर्जून स्वामींची विशेष सेवा, स्वामींचे विशेष पूजन करत असतात. प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामींची घरात प्रतिष्ठापना करणार असाल, तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. काही नियम नक्की पाळायला हवेत, असे सांगितले जाते. घरी स्वामींची प्रतिष्ठापना कशी करावी? जाणून घेऊया...

स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वांत मोठी लीला मानली गेली आहे. या सगुण ब्रह्माची उपासना अतीव श्रद्धेने, प्रेमाने अन्‌ भक्तीने महाराष्ट्रातील घराघरांतून नित्य सुरू आहे. स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन शंभर वर्षांहून अधिक वर्षे उलटून गेला असला तरी त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. असे स्वामी आपल्या घरीही असावेत. स्वामी सेवा करण्याची संधी आपल्यालाही मिळावी. जेवढी शक्य असेल तेवढी सेवा स्वामींची करावी, अशी अनेकांची इच्छा असते.

सोबतीला स्वामी आहेत, स्वामी कायम कृपा करतात

श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा भेट म्हणून मिळालेली असली आणि त्याचे पूजन तुम्हाला करायचे असेल, तर त्याची योग्य प्रकारे पूजा होणे आवश्यक असते. श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती किंवा प्रतिमा अतिशय प्रेरणादायी आहे. ती घरात ठेवल्याने अत्यंत सकारात्मक लहरी अनुभवास येतात, असा अनेकांचा अनुभव आहे. स्वामींचा सहवास मिळावा म्हणून घरात किंवा देवघरात प्रतिष्ठापना करावी, असे म्हटले जाते. 

- स्वामींची मूर्ती शक्यतो देवघरात स्थापन करावी, मात्र जागेचा अभाव असेल तर घरातली अशी जागा जिथे आपल्याला कायम पावित्र्य राखता येईल, अशी निवडावी. 

- वास्तुशास्त्राच्या नियमांप्रमाणे केल्यास उत्तमच.

- स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिक सचेतन होते आणि ती मूर्ती शोभेची न राहता तिला देवत्त्व प्राप्त होते.

- स्वामींची मूर्ती स्थापना घरच्या घरी करता येते. परंतु पुरोहितांना बोलवून मंत्रोच्चारण, पूजा विधी करत प्राणप्रतिष्ठा करणे अधिक उत्तम मानले जाते. 

- मंत्रांच्या प्रभावामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊ शकते. तसेच सकारात्मक वातावरण तयार होते.

- गुरुजी मिळत नसल्यास एका ताम्हनात स्वामींची मूर्ती घ्यावी. स्वामींची पंचोपचार किंवा षोडषोपचार पूजा करावी. स्वामींच्या मूर्तीवर दूध व पाण्याने अभिषेक करत 'श्री स्वामी समर्थ' मंत्राचा उच्चार करावा. 

- ज्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची घरात प्रतिष्ठापना कराल तेव्हा स्वामींसाठी गोडाचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा.

- स्वामींना जो नैवेद्य अर्पण करणार आहात. त्या प्रसादाचे अवश्य वाटप करावे.

- अभिषेकयुक्त पंचोपचार किंवा षोडषोपचार पूजन झाल्यावर यथाशक्ती स्वामी मंत्रांचा जप करावा. तारक मंत्र अवश्य म्हणावा.

- स्वामींच्या पूजनात पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पिवळे पेढे/मिठाई यांचा आवर्जून समावेश करावा.

-  रोज सकाळी आणि सायंकाळी स्वामींसमोर दिवा लावावा, उदबत्ती ओवाळावी आणि स्वामींची प्रार्थना करावी.

- शक्य झाल्यास स्वामींची प्रतिष्ठापना केल्यानंतर गुरुलीलामृत, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथांचे पठण नक्की करावे. 

- ज्या ठिकाणी स्वामींची मूर्ती स्थापित केली आहे, ती जागा कायम स्वच्छ, नेटनेटकी, टापटीप ठेवावी. 

- मनापासून स्वामी सेवा करावी. सेवेत खंड पडू देऊ नये. 

- स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. 

॥ श्री स्वामी समर्थ ॥

 

Web Title : स्वामी समर्थ प्रकट दिन 2026: घर पर स्वामी को कैसे स्थापित करें

Web Summary : प्रकट दिन पर स्वामी समर्थ को श्रद्धा से घर पर स्थापित करें। स्थापना, शुद्धिकरण और पूजा के लिए दिशानिर्देशों का पालन करें। मिठाई अर्पित करें, मंत्रों का जाप करें और पवित्र ग्रंथों को पढ़ें। स्वामी के आशीर्वाद के लिए स्वच्छता और अटूट भक्ति बनाए रखें।

Web Title : Swami Samarth Prakat Din 2026: How to Establish Swami at Home

Web Summary : Establish Swami Samarth at home on Prakat Din with faith. Follow guidelines for placement, purification, and worship. Offer sweets, chant mantras, and read sacred texts. Maintain cleanliness and unwavering devotion for Swami's blessings.