‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
By देवेश फडके | Updated: November 19, 2025 13:09 IST2025-11-19T12:59:47+5:302025-11-19T13:09:29+5:30
Shree Swami Samarth Atharvashirsha Stotra: स्वामींचे मंत्र, स्तोत्र न चुकता दररोज अनेक जण म्हणत असतात. श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष हेही अत्यंत प्रभावी मानले जाते. तुम्ही अद्यापही याचे पारायण सुरू केले नाही का? जाणून घ्या...

‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
Shree Swami Samarth Atharvashirsha Stotra: श्री स्वामी समर्थ या नावाचा केवळ उच्चार केला, तरी मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. सकारात्मकता मिळते. वेगळीच ऊर्जा संचारते. प्रेरणा मिळते. श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतील. प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार? श्री स्वामी समर्थांचे माहात्म्य आणि त्यांचे चरित्र अनेकांनी अनेक प्रकारे रंगविले असले तरी त्याचा जो अधिक विचार करावा, तो त्याचे अनंत नवे पैलू आपल्या लक्षात येतात. खरोखरच अद्भूताचा अनुभव येतो. सूर्य किरण जसे मोजता येत नाही, सागराच्या लाटांची मोजदाद करता येत नाही, त्याचप्रमाणे स्वामींच्या चरित्राचा थांगच लागत नाही, असे अनेक जण सांगतात.
श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वांत मोठी लीला मानली गेली आहे. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. स्वामी निश्चित मदत करतील अन् अशक्यही शक्य करतील, असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे.
श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष
स्वामी अद्भूत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची अनेक स्तोत्रे, मंत्र आहेत. अनेक जण दररोज स्वामींची नित्य उपासना, नामस्मरण करत असतात. या अनेक स्तोत्रांपैकी एक अद्भूत प्रभावी स्तोत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष. दर गुरुवारी या स्तोत्राचे श्रवण आणि पठण केल्याने अपार लाभ होतो. अनेक फायदे होतात, असे म्हटले जाते. स्वामींसह दत्तगुरूंची कृपा आणि आशीर्वाद मिळतात. यश, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. यशाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होते. अध्यात्मिक उन्नती होते, असे मानले जाते. दररोज हे स्तोत्र म्हटले जाऊ शकते. शक्य असेल, तर ११, २१, १०८ अशा प्रकारे पारायणही केले जाऊ शकते. परंतु, पारायण करण्यापूर्वी संकल्प करणे आवश्यक आहे. संकल्पबद्ध पद्धतीने केलेले पारायण शुभ फलदायक ठरते, असे म्हटले जाते. दररोज म्हणायचे असेल, तर संकल्प आवश्यक नाही.
॥ श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष ॥ Shree Swami Samarth Atharvashirsha ॥
॥ अथ ध्यानम् ॥
ॐ ध्यायेत् शांतं प्रशांतं कमलनयनं योगिराजं दयालुम् ।
स्वामी मुद्रासनस्थं विमलतनुयुतं मंदहास्यं कृपालम् ।
दृष्टिक्षेपोहि यस्य हरति स्मरणात पापजालौघ संघम् ।
भक्तानां स्मर्तृगामी जयति सविदधत् केवलानंद कंदम् ॥१॥
॥ हरी ॐ ॥
नमः श्रीस्वामी समर्थाय परमहंसाय दिव्यरूपधारिणे ।
नमः श्रीपाद श्रियावल्लभावतारधारिणे ।
नमः श्रीमन्नरसिंह सरस्वत्यावतारधारिणे ।
नमः कर्दली वनवासिने ।
नमो अवधूताय स्वेच्छाचारिणे । नमः कैवल्यानंद सच्चिदानंद स्वरूपिणे ॥२॥
त्वं परं तत्त्वमयः ।
तत्त्वमस्यादि महावाक्यैः संबोधितः । त्वं पृथिव्यादि पंचमहाभुतः स्वरूपः । त्वं अष्टधा प्रकृति पुरुषात्मकः । त्वं चराचरः साक्षीः । त्वं ज्ञप्तिमयस्त्वं पूर्णानंदमयः । त्वं मूलाधारादि षट्चक्रस्थित दैवतात्मकः ॥३॥
सर्वं जगदेतत्त्वत्तो जायते । त्वयि विद्यते । त्वयि लीयते । त्वामहं ध्यायामि नित्यम् ॥४॥
पाहिमां त्वं । प्राच्यां पाहि । प्रतीच्यां पाहि । दक्षिणातात् पाहि । उत्तरस्यां पाहि । उर्ध्वात् पाहि । अधस्तात् पाहि । सर्वतः पाहि पाहि माम् । भयेभ्यःस्त्राहि माम् । संसारमहाभयात् मामुद्धर । शरणागतोऽस्मि त्वाम् ॥५॥
आजानुबाहुं गौरांगं दिव्य कौपिन धारिणम् । तुलसी बिल्व पुष्पादि गंध द्रव्यैः सुपूजितम् । भक्तोद्धारैक ब्रीदं च स्मरणे भक्ततारकम् । ध्यायामि हृदयाकाशे सच्चिदानंदरूपिणम् ॥ ६॥
"स्वामी समर्थ" इति महामंत्रः । महाभय विनाशकः । नादानुसंधाने स्वामीति जप्त्वा पापजालं प्रणश्यति । स्वस्वरूपानुसंधाने स्वामीति जप्त्वा सच्चिदानंदं प्राप्नोति । आत्मसाक्षात्कारो भवति ॥७॥
नमाम्यहं दिव्यरूपं जगदानंद दायकम् । महायोगेश्वरं वंदे ब्रह्मा विष्णु महेश्वरम् । शक्तिं गणपतिं चैव सर्वदेवमयं भजेत् । कृपालु भक्तवरदं वंन्देऽहं सर्वसाक्षिणम् ॥८॥
ॐ दत्तात्रेयाय विद्महे। परमहंसाय धीमहि । तन्नो स्वामी प्रचोदयात् ॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः । सुशांतिर्भवतु ॥
॥ अवधूतचिंतन श्रीगुरूदेवदत्त स्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
सर्वेऽपि सुखिनः । संतु सर्वे संतु निरामयाः ॥
सर्वे भद्राणि पश्यंन्तु । मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॥
॥ इति श्रीस्वामी अथर्वशीर्षं संपूर्णम् ॥
॥ श्री स्वामी समर्थ ॥