शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Shree Lakshmi Panchami 2022: श्री पंचमी: एकदाच करा पूजा; वर्षभर राहील लक्ष्मी देवीची कृपा, कमी पडणार नाही पैसा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 10:44 AM

Shree Lakshmi Panchami 2022: चैत्र महिन्यातील पंचमीला लक्ष्मी देवीचे पूजन करणे अत्यंत शुभ मानले गेले असून, नानाविध लाभ मिळू शकतात, असे सांगितले जाते.

हिंदू नववर्षाला सुरुवात झाली आहे. गुढीपाडवा धुमधडाक्यात साजरा करत नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. नववर्षातील पहिला चैत्र महिना शुभ आणि पवित्र मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक तिथीचे महत्त्व वेगळे आहे. चैत्र प्रतिपदेपासून ते राम नवमीपर्यंत चैत्री नवरात्र साजरे केले जाते. नववर्षाच्या सुरुवातीपासूनच सण-उत्सव, व्रत-वैकल्ये चालू होतात. चैत्र शुद्ध पंचमीला श्री पंचमी म्हणजेच श्री लक्ष्मी पंचमीचे व्रताचरण केले जाते. या दिवशी केल्या जाणाऱ्या लक्ष्मी देवीच्या पूजनाला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. श्रीपंचमीचे महत्त्व, मान्यता आणि व्रताचरण पूजनाची पद्धत जाणून घेऊया... (Shree Lakshmi Panchami 2022)

चैत्र शुद्ध पंचमीला साजरी केली जाणारी श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमी यंदाच्या वर्षी बुधवार, ०६ एप्रिल २०२२ रोजी आहे. लक्ष्मी देवीला धन, वैभव, सुख, समृद्धी, विष्णुप्रिया मानले जाते. या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन अतिशय महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळू शकते. धनलाभासह अनेकविध फायदे मिळू शकतात, असे सांगितले जाते. (Shree Lakshmi Panchami 2022 Date and Time)

असे करावे व्रताचरण 

श्री पंचमीला लक्ष्मी देवीची विशेष पूजन करावे, असे सांगितले जाते. सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म उरकल्यानंतर लक्ष्मी देवीच्या पूजेला सुरुवात करावी. आपापले कुळधर्म, कुळाचार यानुसार षोडशोपचार पूजा करावी. यावेळी धान्य, हळद आणि गुळ देवीला अर्पण करावा. शक्य असल्यास या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करावी. ते अतिशय शुभ मानले जाते. तसेच लक्ष्मी देवीला कमळाचे फूल अर्पण करावे. श्रीसुक्ताचे पठण करावे. श्रीसुक्ताचे पठण शक्य नसल्यास श्रवण करावे. लक्ष्मी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात. लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. पूजा झाल्यावर खिरीचा नैवेद्य दाखवावा. शक्य असेल तर कुमारिकांना खिरीचा प्रसाद द्यावा. संपूर्ण पूजा आटोपल्यानंतर यथाशक्ती ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः॥, ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:॥, ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥ या मंत्रांचा जप करावा. (Shree Lakshmi Panchami 2022 Puja Vidhi) 

श्री पंचमीला दानाचे विशेष महत्त्व

श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमीला दानाचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे. या दिवशी गोमातेला अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. याशिवाय यथाशक्ती दानधर्म करावा, असे सांगितले जाते. असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर सदैव राहू शकते, अशी मान्यता आहे. सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, आपापल्या पद्धती, परंपरा यांप्रमाणे करावे, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Navratriनवरात्रीReligious programmeधार्मिक कार्यक्रम