शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

Shravan Vrat 2022: श्रावणमासात 'या' १५ उपासना ठरतील महापुण्यदायी; यापैकी तुम्ही कोणती निवडणार ते आजच ठरवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 17:32 IST

Shravan Vrat 2022: संकल्पपूर्तीसाठी गरज असते ती सातत्याची आणि शुद्ध विचारांची, या दोन गोष्टी असतील तर संकल्प सिद्धीस जातो!

श्रावण मास हा पुण्य साच्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त पुण्य गाठीशी बांधता यावे, म्हणून सलग महिनाभर उपासना करायला हवी. एखाद वेळेस खंड पडला तर पुन्हा सातत्य ठेवून श्रावण मासात उपासनेचा संकल्प करायला हवा. ही उपासना कोणत्याही प्रकारे असू शकते. साध्या नामजपापासून ते पोथीवाचनापर्यंत काहीही. एखाद्या स्तोत्राची नियमित आवर्तने, देवदर्शन असा जो नेम आपण सातत्याने करू शकू तो श्रावण मासाचा संकल्प करावा. या संकलपूर्तीचा आनंद वेगळाच असतो. त्याची अनुभूती घेता यावी म्हणून उदाहरणादाखल सौ. अस्मिता दीक्षित पुढे काही संकल्प देत आहेत. 

१.  श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायाचे नित्य वाचन (२१ दिवसात पारायण होते )२. श्री सूक्ताचे नित्य पठण ( रोज १६ वेळा म्हणायचे आहे १५ वेळा + फलश्रुती असे १६ वेळा )३.  श्री शनी महात्म पठण / शनी महाराजांचा जप ओं शं शनैश्चराय नमः ४. दर सोमवारी घरातील शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक.५.  मंगळवार / शुक्रवार जो आपल्या कुल्स्वमिनीचा वार असेल त्या दिवशी कुंकुमार्चन .६.  सप्तशती पाठ , गुरुचरित्र , साई चरित्र  अश्या पवित्र ग्रंथांचे वाचन ७.  दर शनिवारी ४ चमचे हळद घेवून त्यात गोमुत्र घालून घराचा उंबरठा सारवणे ८.  गायत्री मंत्राचे सकाळी नित्य पठण आणि सूर्य नमस्कार ९.  श्री स्वामी समर्थ नित्य जप ( रोज निदान ११ माळा ) /  श्री गजानन बावन्नी

१०.  शुक्रवारी देवीला खीर पुरणाचा नेवैद्य (निदान एक तरी शुक्रवार )/ महालक्ष्मीचा जप- ओं श्री महालक्ष्मै माताय्ये नमः११.  श्रावण सोमवारी लघुरुद्र / महादेवाचा जप ओं नमः शिवाय १२.  श्रावण शनिवार  किंवा पौर्णिमेला श्री सत्यनारायण पूजा १३. अनेक घरातून जिवतीचे पूजन केले जाते – कुलाचार १४. श्रावणातील शुक्रवारी घरातील देवीला आणि एक शुक्रवार देवीच्या देवळात जावून देवीची ओटी भरावी . घरात भरलेल्या ओटीतील सर्व साहित्य फळे, तांदूळ , श्रीफळ घरात वापरावे. श्री सुक्त म्हणावे .१५. ह्या सर्वांच्या पलीकडे असणारी उपासना म्हणजे “ अन्नदान “ पण ते कुणाला ? तर ज्याला खरच पोटाला तडस लागली आहे त्याला. म्हंटलेच आहे .

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।।जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||

सर्वात मोठा यज्ञ जो पोटात पेटला आहे त्याला अन्नाचा घास ( आहुती ) भरवणे हे सर्वात मोठे पुण्य आहे आणि म्हणूनच भुकेलेल्या आणि गरजू कष्टकरी अश्या व्यक्तीला शिधा /अन्न दान केले, तर त्याचे पुण्य अफाट आहे. जे रोजच श्रीखंड पुरी खात आहेत त्यांना बोलवून पुण्य मिळणार नाही कारण त्यांना त्याची आवश्यकता नाही पण जे एकवेळच्या दोन घासालाही कष्ट करूनही तरसत आहेत अश्यांना अन्नदान केले तर त्यांचे आशीर्वाद नक्कीच फळतील आणि आपणही योग्य व्यक्तीला दान केल्याचे समाधान मिळेल .

उपासना कुठलीही असावी पण त्यात सातत्य असणे आवश्यक आहे . ह्या उपासना आपण आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आणि आत्मिक समाधानासाठी करत आहोत . दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही त्यामुळे त्याची वाच्यता करू नये. म्हणूनच आपली नित्य कर्मे करत असताना जितके जमेल ते करावे पण जे करू ते प्रामाणिकपणे मनापासून तरच त्याला अर्थ आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या सर्व उपासनांना जोड हवी ती शुद्ध , पवित्र मनाची. नामस्मरण , मनन , चिंतन करावे. उगीचच कुणाचीतरी निंदा नालस्ती करू नये . आपली वास्तू शुद्ध , स्वच्छ ठेवली तरच लक्ष्मीची कृपा होऊन तिचा वास चिरकाल आपल्या वस्तुत राहील. 

आजपासून घरोघरी हा श्रावण सोहळा करुया आणि आयुष्यातील हे सर्व क्षण सोनेरी करुया . परमेश्वरी सेवा कधीही फोल जाणार नाही त्याची अपिरीमित शुभ फळे जन्मोजन्मी मिळणारच. चलातर मग श्रावणसरी अंगावर घेवून त्याचे स्वागत करुया आणि श्रावणाचा आनंद मनसोक्त लुटुया.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल