शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

Shravan Vrat 2021 : पुत्रदा एकादशीचे महत्त्व, कथा आणि व्रतविधी सविस्तर जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 5:31 PM

Shravan Vrat 2021 : एखादी गोष्ट जेव्हा श्रद्धेने केली जाते, तिचे फळ निश्चित मिळते. 

श्रावण शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते.  १८ ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी आहे. एकादशी हे व्रत भगवान विष्णूंसाठी केले जाते. वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीला विशिष्ट नाव आणि हेतू दिलेला आहे. जेणेकरून तो हेतू साध्य होण्यासाठी का होईना भाविकांनी एकादशीचे व्रत करावे, हा उद्देश असू शकेल. नावावरूनच या एकादशीचे महत्त्व आपल्याला लक्षात येते. ते म्हणजे एकादशीचे हे व्रत पुत्रप्राप्तीसाठी केले जाते. ते कसे करतात व त्यामागील कथा काय आहे ते पाहू.

पुत्रदा एकादशीची कथा :कांचनपूरचा राजा शूरसेन हा प्रजापालनदक्ष, पुण्यवान आणि पराक्रमी होता. त्याला शंभर राण्या होत्या परंतु पुत्रसौख्य नव्हते. ऋषिमुनींना त्याने आपले दु:खं सांगितल्यावर त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्याने हे व्रत केले, त्यायोगे त्याची वंशवेल बहरली.

आजच्या विज्ञानयुगात अशा कथांवर लोकांचा कदाचित विश्वास बसणार नाही. परंतु आज वैद्यकीय क्षेत्रातील उपचारांमुळे अनेकांना संतानप्राप्तीचे सुख प्राप्त होत आहे, त्याप्रमाणे पुराणकाळातील तपस्वी ऋषिमुनींनादेखील ही विद्या अवगत असू शकेल यावर विश्वास ठेवण्यास काहीच हरकत नाही. एखादी गोष्ट जेव्हा श्रद्धेने केली जाते, तिचे फळ निश्चित मिळते. 

एकादशीचे व्रत विष्णूभक्तीसाठी आहेच, शिवाय ते आरोग्यासाठीही हितकारक आहे. म्हणून दर महिन्यातून दोन एकादशीला हे व्रत केले जाते. एकादशीचा उपास हा दोन्ही वेळ करणे अपेक्षित असते. त्यादिवशी केवळ फलाहार करावा आणि देवाचे नामस्मरण करून, दर्शन घेऊन देह व चित्त शुद्ध करावे, असा एकादशीचा हेतू असतो. त्यानुसार पुत्रदा एकादशीचे व्रत करावयाचे असेल तर व्रत विधी पुढीलप्रमाणे आहे.

पुत्रदा एकादशीचा व्रतविधी :हे व्रत करण्यासाठी एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला दुपारी जेवून एकभुक्त राहावे. एकादशीच्या दिवशी स्नानविधी करून परमेश्वराची पूजा करावी. फुले ले, फळे, नैवेद्य अर्पण करून आरती करावी. देवदर्शन घ्यावे. रात्री कथा, कीर्तन, पारायण करावे. दुसऱ्या दिवशी स्नान, पूजा करून गरजूंना तसेच पुरोहितांना दान दक्षिणा देऊन मग स्वत: जेवावे. हे व्रत केल्याने पाप नाश होऊन संतानप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल