शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

श्रावणी शुक्रवार: धन-वैभव, सुख लाभेल; दिवेलागणीला म्हणा अष्टलक्ष्मीचे ‘हे’ प्रभावी स्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 14:24 IST

Shravani Shukrawar 2023: धन-वैभवाची देवी लक्ष्मी मातेचे हे प्रभावी स्तोत्र सायंकाळी आवर्जून म्हणावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

Shravani Shukrawar 2023: व्रत-वैकल्यांची रेलचेल असलेला श्रावण महिना सुरू झाला आहे. सन २०२३ मध्ये श्रावण महिना अधिक आल्यामुळे चातुर्मासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. अधिक मासाची सांगता झाल्यानंतर आता निज श्रावण मासाला सुरुवात झाली आहे. या महिन्यात श्रावणातील सर्व व्रत-वैकल्ये, सण-उत्सव उत्साहात साजरे केले जाणार आहेत. श्रावणातील प्रत्येक व्रताला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. संस्कृती, परंपरा, शिकवण यांची सांगत व्रतांमधून घातल्याचे दिसते. श्रावणी शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन केले जाते. या व्रताचे महात्म्य वेगळे आहे.

पहिल्या श्रावणी शुक्रवारी महालक्ष्मीची स्थापना केली जाते. लक्ष्मी देवीची विशेष कृपा, शुभाशिर्वाद लाभण्यासाठी देवीचे पूजन, नामस्मरण, विशेष व्रताचरण केले जाते. घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी, धन-वैभव प्राप्त व्हावे, कोणत्याही गोष्टींची चणचण भासू नये, यासाठी लक्ष्मीचे आवाहन केले जाते. लक्ष्मी देवीचे व्रत कठीण असते. लक्ष्मी चंचल असल्याचे म्हटल्याचे जाते. त्यामुळे योग्य पद्धतीने व्रताचरण झाले नाही, तर लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

अष्टलक्ष्मीचे आवाहन आणि स्तोत्रपठण

प्रत्येक व्यक्ती पैसे कमवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेते. या प्रयत्नांना लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाची जोड मिळाली, तर घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. म्हणूनच आपण प्रयत्नांना उपासनेचीही जोड द्यावी, असे शास्त्र सांगते. लक्ष्मी देवीचे प्रभावी मानले गेलेले अष्टलक्ष्मी स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते. या स्तोत्राच्या पठणाचा आणखी एक लाभ म्हणजे, आपल्याला जे हवे आहे ते आपल्या पूर्वजांनी प्रासादिक शब्दात वर्णन करून ठेवले आहे. तेच प्रभावी शब्द स्तोत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. या अष्टलक्ष्मी स्तोत्राचे केवळ पठण लाभदायक मानले गेले आहे. स्तोत्र पठण शक्य नसेल तर, श्रवण करावे. लक्ष्मी देवीला मनापासून नमस्कार करावा. लक्ष्मी देवीच्या आवडत्या गोष्टी अर्पण कराव्यात. प्रभावी अष्टलक्ष्मी स्तोत्र सायंकाळी म्हणजेच दिवेलागणीच्या वेळी सायंकाळी म्हणावे, असे सांगितले जाते. 

श्री अष्टलक्ष्मी स्त्रोतम:

आदि लक्ष्मीः

सुमनस वन्दित सुन्दरि माधवि चंद्र सहोदरि हेममये ।मुनिगण वन्दित मोक्षप्रदायिनी मंजुल भाषिणि वेदनुते ।पङ्कजवासिनि देवसुपूजित सद-गुण वर्षिणि शान्तिनुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि परिपालय माम् ।

धान्य लक्ष्मी:

अयिकलि कल्मष नाशिनि कामिनि वैदिक रूपिणि वेदमये ।क्षीर समुद्भव मङ्गल रुपिणि मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते ।मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि देवगणाश्रित पादयुते ।जय जय हे मधुसूदनकामिनि धान्यलक्ष्मि परिपालय माम् ।

धैर्य लक्ष्मी:

जयवरवर्षिणि वैष्णवि भार्गवि मन्त्र स्वरुपिणि मन्त्रमये ।सुरगण पूजित शीघ्र फलप्रद ज्ञान विकासिनि शास्त्रनुते ।भवभयहारिणि पापविमोचनि साधु जनाश्रित पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि धैर्यलक्ष्मि सदापालय माम् ।

गज लक्ष्मी:

जय जय दुर्गति नाशिनि कामिनि वैदिक रूपिणि वेदमये ।रधगज तुरगपदाति समावृत परिजन मंडित लोकनुते ।हरिहर ब्रम्ह सुपूजित सेवित ताप निवारिणि पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि गजलक्ष्मि रूपेण पालय माम् ।

सन्तान लक्ष्मी:

अयि खगवाहिनी मोहिनि चक्रिणि रागविवर्धिनि ज्ञानमये ।गुणगणवारिधि लोकहितैषिणि सप्तस्वर भूषित गाननुते ।सकल सुरासुर देव मुनीश्वर मानव वन्दित पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि सन्तानलक्ष्मि परिपालय माम् ।

विजय लक्ष्मी: 

जय कमलासनि सद-गति दायिनि ज्ञानविकासिनि गानमये ।अनुदिन मर्चित कुङ्कुम धूसर भूषित वसित वाद्यनुते ।कनकधरास्तुति वैभव वन्दित शङ्करदेशिक मान्यपदे ।जय जय हे मधुसूदन कामिनि विजयक्ष्मि परिपालय माम् ।

विद्या लक्ष्मी:

प्रणत सुरेश्वरि भारति भार्गवि शोकविनाशिनि रत्नमये ।मणिमय भूषित कर्णविभूषण शान्ति समावृत हास्यमुखे ।नवनिद्धिदायिनी कलिमलहारिणि कामित फलप्रद हस्तयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि विद्यालक्ष्मि सदा पालय माम् ।

धन लक्ष्मी:

धिमिधिमि धिन्धिमि धिन्धिमि-दिन्धिमी दुन्धुभि नाद सुपूर्णमये ।घुमघुम घुङ्घुम घुङ्घुम घुङ्घुम शङ्ख निनाद सुवाद्यनुते ।वेद पुराणेतिहास सुपूजित वैदिक मार्ग प्रदर्शयुते ।जय जय हे कामिनि धनलक्ष्मी रूपेण पालय माम् ।

अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि ।विष्णुवक्षःस्थलारूढे भक्तमोक्षप्रदायिनी ।।शङ्ख चक्र गदाहस्ते विश्वरूपिणिते जयः ।जगन्मात्रे च मोहिन्यै मङ्गलम शुभ मङ्गलम ।

। इति श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम सम्पूर्णम ।

 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलspiritualअध्यात्मिक