शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:06 IST

Angarki Sankashti Chaturthi 2025 August Moonrise Time: श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अत्यंत शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्ट चतुर्थी व्रतात चंद्रोदयाला महत्त्व असते. चंद्रोदयाची वेळ काय आहे? जाणून घ्या...

Angaraki Sankashti Chaturthi 2025 Chandrodaya: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ आता अगदी काही दिवसांनी अबालवृद्धांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. गणपतीच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. डेकोरेशन कसे करावे, यंदा वेगळे काय करावे, याची चाचपणी सुरू झाली आहे. अनेक मोठ्या गणेश मंडळांमध्ये गणपती आगमन सुरू झाले आहे. गणेशोत्सवाचा उत्साह संचारायला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत असून, श्रावण संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आल्याने आनंद, चैतन्य द्विगुणित झाले आहे. अंगारक योग सातत्याने येत नाही. त्यामुळे श्रावण संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जाते. संकष्ट चतुर्थीच्या व्रतात पूजन, उपवास यासह चंद्रोदयाला महत्त्व असते. श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी चंद्रोदय वेळ (Moonrise Time) काय आहे? गणेश पूजनाची सोपी पद्धत जाणून घेऊया...

मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता

गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. 

श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग

श्रावण संकष्ट चतुर्थीला अंगारक योग

चतुर्थी तिथी मंगळवारी आली की, तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते. अंगारक म्हणजे मंगळ. अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले, तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. बाप्पा मंगलमूर्ती आहे. अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्टया केल्याचे पुण्य मिळते, अशी काही भाविकांची समजूत आहे, तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थ्या केल्याचे पुण्य देते, असेही काहींचे मानणे आहे. म्हणूनच अन्य चतुर्थी उपवास केले नाहीत, तरी अंगारक संकष्ट चतुर्थीचा उपास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले जाते. 

मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५

अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रारंभ: मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०८ वाजून ४० मिनिटे.

संकष्ट चतुर्थी अंगारक योग समाप्त: बुधवार, १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०६ वाजून ३६ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी व्रताचरण करावे, असे सांगितले जात आहे.

अंगारक संकष्ट चतुर्थी मान्यता

अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. याबाबत मुद्गल पुराणात एक कथा सांगितली जाते. अंगारक चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते, अशी मान्यता आहे. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते, असा भाविकांचा अनुभव आहे.   

श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!

यशोदामातेने केले होते संकष्ट चतुर्थीचे व्रत

भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चारचौघा मुलांसारखे वागावे म्हणून यशोदामातेने हे व्रत केल्याचे सांगितले जाते. या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे. हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते. या सर्व अद्भूत योगांमुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे सांगितले जात आहे. 

श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत गणेश पूजन

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे.  मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते.

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ 

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे
पुणेरात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे
नाशिकरात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे
अहिल्यानगररात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे
धुळेरात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे
जळगावरात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे
वर्धारात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०८ वाजून ५५ मिनिटे
बीडरात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून १४ मिनिटे
सोलापूररात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे
अकोलारात्रौ ०९ वाजून ०० मिनिटे
छत्रपती संभाजीनगररात्रौ ०९ वाजून ०७ मिनिटे
भुसावळरात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे
परभणीरात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे
नांदेडरात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून ४९ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून १४ मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे
इंदौररात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे

 

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपती 2024Shravan Specialश्रावण स्पेशलPuja Vidhiपूजा विधीchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सण