शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

निज श्रावणारंभ: यंदा किती श्रावणी सोमवार? कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 12:00 IST

निज श्रावण मासाला सुरुवात होत आहे. यंदाचे श्रावणी सोमवार, शिवामूठ यांविषयी जाणून घ्या....

Shravan 2023: चातुर्मासातील महत्त्वाचा मानला गेलेला महिना म्हणजे श्रावण. यंदाच्या वर्षी श्रावण महिना अधिक आला होता. अधिक मासाची सांगता झाल्यानंतर आता निज श्रावणाला सुरुवात होत आहे. निज श्रावण महिन्यात व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. १७ ऑगस्ट २०२३ पासून निज श्रावण महिन्याला प्रारंभ होत असून, १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत निज श्रावण महिना असणार आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. सप्ताहातील सातही दिवस वेगवेगळी व्रते आचरली जातात. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेषत: श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे मानले जाते. यंदाच्या श्रावणात किती श्रावणी सोमवार आहेत? कोणत्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी? जाणून घेऊया... (shravan maas 2023 date and time)

पृथ्वीने नवीन गालीचा ओढळ्याचा काळ म्हणजे श्रावण. नाविन्याची चाहूल म्हणजे श्रावण. श्रावणात आपल्या संस्कृती, परंपरा, सण-उत्सव यांची अगदी रेलचेल असते. वातावरणात थंडावा आलेला असतो. जिथे पाहावे, तिथे धरणी माता नवचैतन्याने न्हाऊन निघत असते. श्रावणातील व्रते म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्ष साधनेचे मार्ग नाहीत. अतिशय तरलपणे काहीतरी शिकवण देणारी किंवा एकमेकांतील नाते संबंध जपणारी, ती वृद्धिंगत करणारी एक भावनिक; पण विशिष्ट नियमात जगणारी अमृत महिरप आहे ती. श्रावण महिना पूर्वी ‘नभस्’ या नावाने ओळखला जात असे. या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते. तसेच श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे. (shravani somwar 2023)

शिवपूजनासाठी सर्वोत्तम श्रावण मास

श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे. (shivamuth to offer on sawan somvar 2023)

सन २०२३ मधील श्रावणी सोमवार आणि शिवामूठ

पहिला श्रावणी सोमवार: २१ ऑगस्ट २०२३ रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे. या दिवशी शिवपूजन झाल्यानंतर तांदूळ शिवामूठ म्हणून वाहावे, असे सांगितले जाते.

दुसरा श्रावणी सोमवार: २८ ऑगस्ट २०२३ रोजी दुसरा श्रावणी सोमवार आहे. या दिवशी महादेव शिवशंकरांची पूजा झाल्यानंतर शिवामूठ म्हणून तीळ वाहावे, असे सांगितले जाते. विशेष म्हणजे या दिवशी सोमप्रदोष आहे. 

तिसरा श्रावणी सोमवार: ०४ सप्टेंबर २०२३ रोजी तिसरा श्रावणी सोमवार आहे. या दिवशी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ म्हणून मूग वाहावे, असे सांगितले जाते.

चौथा श्रावणी सोमवार: ११ सप्टेंबर २०२३ रोजी चौथा श्रावणी सोमवारी आहे. या दिवशी महादेव शिवशंकरांची पूजा झाल्यानंतर शिवामूठ म्हणून जव वाहावे, असे सांगितले जाते. 

 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलspiritualअध्यात्मिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम