३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 02:02 PM2024-05-17T14:02:27+5:302024-05-17T14:04:45+5:30

Shani Sade Sati Upay: साडेसातीचा काळ सुरू असणाऱ्यांनी नेमके काय करावे आणि काय करू नये, तसेच कोणते उपाय उपयुक्त ठरू शकतात? जाणून घ्या...

shani sade sati 2024 do these remedies to get shani dev blessings sade sati upay in marathi | ३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा

३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा

Shani Sade Sati Upay: नवग्रहांमध्ये शनी हा मंदगतीने चालणारा ग्रह आहे. एका राशीत शनी सुमारे अडीच वर्ष असतो. या काळात साडेसाती असते, असे म्हटले जाते. साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व गोचरी शनि यांच्याशी निगडित आहे. चंद्रापासून ४५ अंश मागे शनिचे अंशात्मक भ्रमण सुरू होते, तेव्हा साडेसाती सुरू होते व चंद्रापासून ४५ अंशापुढे शनी गेला की साडेसाती संपते. आपली साडेसाती सुरू होणार असल्याचे समजते, तेव्हा जणू काही आपणावर संकट ओढावणार आहे, असा आपला समज होतो. मात्र, तसे नाही. शनी कर्मप्रधान असल्यामुळे तुमचे कर्म जसे असेल, त्याप्रमाणे फळ मिळते, अशी मान्यता आहे.

आताच्या घडीला शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे मकर, कुंभ आणि मीन या राशींची साडेसाती सुरू आहे. २०२५ मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मकर राशीची साडेसाती संपुष्टात येणार आहे. तर, कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा, मीन राशीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. तसेच मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे. मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा असेल. सुमारे जून २०२७ मध्ये कुंभ राशीची साडेसाती संपेल. तर ऑगस्ट २०२९ पर्यंत मीन राशीची साडेसाती असणार आहे. 

शनीच्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागू शकते

प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे. करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ देत असतो, असे म्हटले जाते. शनी साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असलेल्यांनी ज्येष्ठ व्यक्तींशी आदराने वागावे. नोकरीच्या ठिकाणीही सहकाऱ्यांशी चांगले वागावे. कोणाचा अनादर करत असाल तर तुम्हाला शनीच्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागू शकते. मात्र, काही उपाय साडेसाती काळात उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे शनीचा प्रतिकूल प्रभाव काहीसा कमी होऊ शकतो. शनीची कृपा लाभू शकते, असे सांगितले जाते.

कोणते उपाय करणे ठरते उपयुक्त?

- शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.

- साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते.

- स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे. 

- शनी बीज मंत्राचा जप दररोज करावा. विशेषत: शनिवारी अवश्य करावा. 

- शनिवारी शनीदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा.

- हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. 

- शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.

- ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनीधामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे. 

- पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे.

- सदर माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
 

Web Title: shani sade sati 2024 do these remedies to get shani dev blessings sade sati upay in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.