Shani Gochar 2022 : पुढील अडीच महिने शनी कृपेने 'या' तीन राशींना मिळेल अमाप पैसा आणि चमकेल भाग्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 12:13 IST2022-05-04T12:12:35+5:302022-05-04T12:13:08+5:30
Shani Gochar 2022: ज्योतिष शास्त्रानुसार शनी हा ग्रह अडीच वर्षात आपली राशी बदलतो. २९ एप्रिल रोजी शनीने आपली राशी बदलून कुंभ राशीत प्रवेश केला आहे, परंतु तो या राशीत फक्त ७५ दिवसच राहील. त्यामुळे कोणते बदल घडणार ते पाहू.

Shani Gochar 2022 : पुढील अडीच महिने शनी कृपेने 'या' तीन राशींना मिळेल अमाप पैसा आणि चमकेल भाग्य!
शनीचे संक्रमण खूप महत्वाचे आहे. ज्या व्यक्तीवर शनिदेवाची कृपा होते, त्याचे भाग्य उजळते. शनी न्यायाचा देव मानला जातो. तो अतिशय शिस्तप्रिय आहे. कोण कसे वागते यावर त्याची बारीक नजर असते. त्यांनी कोणाची परीक्षा घ्यायची ठरवली तर ती व्यक्ती सुतासारखी सरळ होते. २९ एप्रिल रोजी शनीने ३० वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश केला आहे. मात्र, मकर राशीतून अडीच वर्षांनी कुंभ राशीत गेलेला शनी केवळ ७५ दिवस कुंभमध्ये मुक्काम करून परत स्थलांतर करणार आहे. हे स्थलांतर कुठून कोणत्या दिशेने व कधी होणार आहे ते जाणून घेऊ.
यावेळी शनि प्रतिगामी असेल
१२ जुलै नंतर, शनि मागे जाईल आणि पुन्हा स्वतःच्या राशीत मकर राशीत प्रवेश करेल. यासोबतच त्यांचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ प्रभाव राहील. १२ जुलैपर्यंत अर्थात पुढचे अडीच महिने तो तीन राशींसाठी लाभदायक ठरेल.
या राशींवर शनिची कृपा राहील
मेष : कुंभ राशीतील शनीचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी चांगले ठरेल. शनिदेवाच्या कृपेने त्यांना चांगले पैसे मिळतील. नोकरी किंवा व्यवसायात चांगले यश मिळेल. पैशासाठी नवीन मार्ग मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. गुंतवणूकित यश मिळेल. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या शारीरिक व्याधींमधून मुक्ती मिळेल.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचा राशी बदल चांगला आहे. ७५ दिवस कुंभ राशीत राहून शनि या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये जोरदार लाभ देईल. नवीन नोकरी मिळू शकते किंवा आहे त्या नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकतो. नशिबाच्या साथीमुळे सर्व कामे पूर्ण होतील. व्यापाऱ्यांनाही मोठा फायदा होईल.
धनु: शनीने कुंभ राशीत प्रवेश करताच धनु राशीच्या लोकांना साडे सातीपासून मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे त्यांची रखडलेली कामे आता मार्गी लागतील. करिअरमध्ये फायदे होतील. पदोन्नती, वेतनवाढ, सन्मान मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. पुढचे अडीच महिने भाग्याचे आहेत कारण शनीची साथ आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करा!