शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Shani Gochar 2022: शनी देवाच्या कृपेने येत्या दीड महिन्यात होणार 'या' तीन राशींच्या उत्पन्नात भरभक्कम वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 07:27 IST

Shani Gochar 2022: आर्थिक उत्पन्नाचे मार्ग म्हणजे यशाचे मार्ग खुलण्यासारखे आहेत. यश मिळाले की पाठोपाठ आनंद, समाधान आलेच. पुढील तीन राशींच्या वाट्याला हा सुकाळ येत आहे.

न्यायाची देवता शनि जेव्हाही कोणत्याही राशीत संक्रमण करतो तेव्हा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे मागच्या महिना अखेरीस शनी देवांनी आपली हक्काची मकर रास सोडून आपली उप रास कुंभ यात प्रवेश केला आहे. हा मुक्काम ५ जुलै पर्यंत असेल त्यानंतर १३ जुलै रोजी, तो पुन्हा मकर राशीत प्रवेश करेल. यानंतर १७ जानेवारी २०२३ रोजी तो पूर्णपणे कुंभ राशीत येईल. तोवर येत्या दीड महिन्यात कोणत्या राशींना या स्थित्यंतराचा आर्थिक लाभ होईल ते जाणून ते जाणून घ्या!

शनीच्या संक्रमणाने मीन राशीवर साडेसाती सुरू झाली असून धनु राशीचे लोक साडेसातीपासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. त्याचवेळेस कुंभ राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार असून मकर राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. मिथुन, तूळ राशीतून शनीची परिक्रमा संपली आहे. आणि कर्क व वृश्चिक राशीवर शनीचा प्रभाव सुरू झाला आहे. त्या स्थित्यंतराचा लाभ कोणत्या तीन राशींना होणार आहे ते जाणून घेऊया. 

मिथुन : शनिदेव हे अष्टमेश आणि भाग्येश असल्याने या राशीत भाग्य स्थानात भ्रमण करत आहेत. यासोबतच या राशीतून शनिदेवाचा प्रभाव संपला आहे. कुंभ राशीत शनीचा प्रवेश या राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. जीवनात संघर्ष कमी होईल आणि यशाचे अनेक मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. आजवर रखडलेल्या सर्व योजना सुरळीत सुरू होतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप फलदायी असेल. शनीच्या या संक्रमणामुळे शत्रू पक्ष पराभूत होईल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. पोटाशी संबंधित आजार वाढू शकतात. त्यामुळे आवश्यक पथ्य पाळा. 

तूळ : या राशीमध्ये शनिदेव सुखाचा आणि पंचम स्थानाचा स्वामी असल्याने केवळ पंचम स्थानातूनच भ्रमण होत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांसाठी शनीचा राशी बदल चांगला ठरू शकतो. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही काही कामासाठी किंवा सहलीसाठी कुटुंबासह परदेशात जाऊ शकता. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेवरून कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. सतर्क राहा. वैवाहिक जीवनात तणाव वाढू नये यासाठी सुसंवाद ठेवा. 

धनु : या राशीमध्ये शनि धन आणि शक्तीचा स्वामी आहे. गेल्याच महिन्यात शनिदेवाची साडेसातीही संपली आहे. त्यामुळे या राशीचे लोक एका नवीन अध्यायाला सुरुवात करतील. सर्व जुनी प्रलंबित कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. आर्थिक स्थितीही मजबूत राहील. नोकरी व्यवसायात प्रगतीची पूर्ण शक्यता आहे. मात्र खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा. कारण जास्त खर्च वाढू शकतो. न्यायालयाशी संबंधित बाबी तुमच्या हिताच्या ठरतील. आईच्या आणि स्वतःच्या तब्येतीची तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक उत्पन्नाची नवनवी दालने तुमच्यासाठी खुली होत आहेत, संधीचे सोने करून घ्या!

टॅग्स :Astrologyफलज्योतिष