Shani Amavsya 2025: शनि अमावास्येला शनि मंदिरात जाताना 'ही' काळजी अवश्य घ्या; नाहीतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 11:06 IST2025-03-27T11:03:19+5:302025-03-27T11:06:06+5:30
Shani Amavasya 2025: यंदा २९ मार्च रोजी शनि अमावस्या, सूर्यग्रहण, शनि गोचर असे अनेक दुर्मिळ योग जुळून आले आहेत, त्यादिवशी शनि मंदिरात जा, पण...

Shani Amavsya 2025: शनि अमावास्येला शनि मंदिरात जाताना 'ही' काळजी अवश्य घ्या; नाहीतर...
शनी देवांचे नुसते नाव काढले, तरी एक प्रकारची भीती मनात निर्माण होते. बरोबर आहे, शालेय वयापासून शिक्षा करणाऱ्या शिक्षकांचीच सर्वात जास्त भीती वाटत आली आहे. ही भीती आदरयुक्त भीती असते. कारण असे शिक्षक आपल्याला योग्य वळण लागावे म्हणून प्रसंगी कठोर होऊन शिक्षा देतात. त्याचप्रमाणे शनी देव हे सुद्धा कठोर शिक्षक आहेत. म्हणून इतर देवांच्या तुलनेत आपल्याला त्यांची जास्त भीती वाटते. साडेसाती काळात ते आपल्या आयुष्याला चांगले वळण लागावे, म्हणून हर तऱ्हेने परीक्षा घेतात आणि जे विद्यार्थी त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण होतात, त्यांच्यावर शनी देव प्रसन्न देखील होतात.
Shani Amavasya 2025: शनी अमावस्येचा दुर्मिळ संयोग 'या' तीन राशींच्या जीवनात आणणार भरघोस आनंद!
यंदा ३० मार्च २०२५ रोजी शनि अमावस्या(Shani Amavasya 2025) आहे आणि त्याचदिवशी सूर्यग्रहण(Solar Eclipese 2025)आहे, तसेच शनि देव कुंभ राशीतून मीन राशीत स्थलांतर करणार आहेत. मकर राशिची साडेसाती संपून मेष राशिची सुरू होणार आहे. एवढ्या सगळ्या घटना घडून दुसर्या दिवशी गुढी पाडव्याला (Gudi Padwa 2025) ३० मार्च २०२५ रोजी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. अशा वेळी देवदर्शन घेणे ओघाने आलेच. शनि अमावास्येला शनि मंदिरात जरूर जा, पण तिथे जाताना पुढे दिलेली काळजी अवश्य घ्या!
सूर्यपुत्र मानला गेलेल्या शनीला अन्य देवतांप्रमाणे पूजले जाते. शनीची अनेक स्तोत्र, मंत्र, श्लोक असून, याचे पठण, नामस्मरण, जप केले जातात. शनीच्या प्रतिकूल प्रभावापासून बचाव होण्यासाठी भाविक शनीची उपासना करत असल्याचे पाहायला मिळते. विशेष करून शनीची साडेसाती, ढिय्या प्रभाव तसेच महादशा सुरू असलेल्यांना शनी पूजन, नामस्मरण, उपासना करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, शनीदेवाची मूर्ती, तसबीर, प्रतिमा शक्यतो घरात स्थापन केली जात नाही. घरात अन्य देवांची प्रतिमा, मूर्ती असून सुद्धा शनी देवांची प्रतिमा निषिद्ध का? याबाबत शास्त्रीय आणि पौराणिक कारण सांगितले जाते.
शनी देवाला मिळाला होता शाप :
पौराणिक कथा असे सांगते, की शनी देवांना शाप मिळाला होता, की त्यांची दृष्टी ज्याच्यावर पडेल, त्याचा विनाश होईल. म्हणून त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात ठेवली जात नाही. त्यासाठी मंदिराची जागा सुयोग्य ठरते. शनी महाराज ही उग्र स्वभावाची देवता असल्यामुळे, त्यांच्या सहवासात येताना सभोवतालचे वयल तेवढेच प्रभावित असावे लागते, अन्यथा अरिष्ट परिणाम भोगावे लागतील. शनी महाराजांच्या मंदिराची रचना ही तेथील भूमीचा, वातावरणातील लहरींचा आणि सभोवतालच्या परिसराचा अभ्यास करून बांधलेली असते. या गोष्टी घराच्या चार भिंतीत साकारणे शक्य नाही. म्हणून शनी महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात न ठेवता देवळातच ठेवली जाते.
कसे घ्यावे शनी देवाचे दर्शन?
शनीदेवाची पूजा करताना कधीही त्यांच्या मूर्तीसमोर उभे राहून पूजा करू नये. तर, शनिदेवाचे दर्शन नेहमी मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभे राहून घ्यावे. शनीदेवाच्या दृष्टीपासून वाचण्यासाठी शनिदेवाच्या मूर्तीऐवजी त्यांच्या पाषाणरूपाचे दर्शन घ्यावे. याशिवाय पिंपळाच्या झाडाची पूजा करणे, मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे किंवा शनिदेवाला दान करणे हे देखील शनिदेवाची कृपा मिळवण्याचा उत्तम उपाय आहे. गरीब, असहाय्य लोकांना मदत करून त्यांची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
Shani Amavasya 2025: २००० वर्षांनी जुळून येतोय दुर्लभ संयोग; 'हा' छोटासा उपाय तुमचे जीवन बदलू शकतो!