शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Shani Amavasya 2021 : शनी अमावस्येनिमित्त शनी दोष कसा ओळखावा आणि त्यावर प्रतिबंध कसा घालावा, ते जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 18:46 IST

Shani Amavasya 2021 : जर वारंवार आर्थिक नुकसान होत असेल, कामे बिघडत असतील, मौल्यवान वस्तू गहाळ होत असतील तर हा तुमचा परीक्षा काळ आहे असे समजून जा. यालाच शनी महाराजांचा प्रकोपही म्हणता येईल. त्यांचा राग कसा ओळखावा आणि प्रकोप कसा टाळावा हे जाणून घ्या. 

४ डिसेंबर रोजी सूर्य ग्रहण आहे आणि त्याच दिवशी शनी अमावस्यादेखील आहे. शनी देवांच्या नावाने अनेकांना भीती वाटते. शनी दोषाला अनेक जण घाबरतात. परंतु शनी दोष नक्की ओळखावा कसा आणि त्यावर उपाय काय, हे पाहू. शनी महाराजांनी निर्माण केलेली प्रतिकूल परिस्थिती आपल्यासाठी खूप वेदनादायी ठरू शकते. अशा परिस्थितीत शनि ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी उपाय केल्यास थोडा फरक पडतो. ज्यांना आपली साडेसाती सुरू आहे किंवा शनीची वक्रदृष्टी सुरु आहे, याची माहिती नसेल, त्यांनी बाह्य परिस्थितीवरून शनी महाराजांची अवकृपा होत असल्याचे समजून घ्यावे.

या घटना शनी महादेवांचा प्रकोप होत असल्याची सूचना देतात. 

- पायाशी संबंधित कोणत्याही आजाराचा त्रास होऊ शकतो.- क्षमतेपेक्षा अधिक काम करूनही कामाचे श्रेय मिळत नाही.- सतत आर्थिक नुकसान होते किंवा काम बिघडते. - पाळीव प्राण्यांचा मृत्यू (उदा. काळा कुत्रा किंवा म्हशी)- खूप मेहनत घेऊनही एखाद्या कामात अपयश येते. - कोणताही खोटा आरोप होणे आणि कोर्ट कचेरीच्या कामात अडकणे. - एखादी महाग वस्तू हरवणे किंवा चोरी करणे.- घराच्या भिंतींवर पिंपळ पानाची वारंवार वाढ होणे. - घरात वरचेवर कोळ्याचे जाळे तयार होणे. - घरात लाल मुंग्यांची रीघ लागणे. - घराभोवती काळ्या मांजरीचे सतत रडणे. 

शनिदेवाचा राग टाळण्याचे उपाय

-रोज हनुमान चालीसा म्हणा. -कावळ्याला नाहीतर कुत्र्याला भाकरी खायला घाला. -भिकारी, दुर्बल व्यक्ती, नोकरदार व स्वच्छता कामगारांना आर्थिक मदत करा.-शनी मंदिरात दर शनिवारी तीळ, उडीद, तेल शनी देवाला अर्पण करा. - शनिवारी एका भांड्यात तिळाचे तेल घ्या आणि त्यामध्ये आपला चेहरा पहा आणि नंतर शनि मंदिरात ठेवा. -शनिदेव यांना तिळाचे  तेल अर्पण करा. यामुळे शनिदेव लवकरच प्रसन्न होतील.-निःस्वार्थ मनाने गरीब माणसाला नेहमी मदत करा. असे केल्याने शनिदेव लवकरच प्रसन्न होतील आणि आपले कल्याण करतील. -पिंपळाच्या झाडाला केशर, चंदन, तांदूळ, फुलं मिसळून पाणी वहा. -शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावा व पूजा करा. -मांसाहार आणि मद्यपान टाळा. -ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. - ज्येष्ठ व्यक्तींच्या सेवेने देखील शनी महाराज प्रसन्न होतात आणि आपल्यावर कृपा करतात.