Shakambhari Navratri 2025: शाकंभरी नवरात्रीनिमित्त करूया देवीची विशेष उपासना; भाग ४

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 07:00 IST2025-01-10T07:00:00+5:302025-01-10T07:00:02+5:30

Shakambhari Navratri 2025: शाकंभरी नवरात्रीनिमित्त आपण देवीचे स्तोत्र पठण करून त्याचा भावार्थ जाणून घेत आहोत.

Shakambhari Navratri 2025: Let's do special worship of Goddess on the occasion of Shakambhari Navratri; Part 4 | Shakambhari Navratri 2025: शाकंभरी नवरात्रीनिमित्त करूया देवीची विशेष उपासना; भाग ४

Shakambhari Navratri 2025: शाकंभरी नवरात्रीनिमित्त करूया देवीची विशेष उपासना; भाग ४

>> रवींद्र गाडगीळ 

जय जय जाप्यजये जय शब्द परस्तुती तत्पर विश्वनूते, 
झण झण झिंझीम झिंकृत नूपुर शिंजित मोहित भूत पते | 
नटीत नटार्थ नटी नट नायक नाटन नाटित नाट्यरते, 
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||१०||

तुझी विजय गाथा सारखी मनात जपण्यासारखी आहे. त्यामुळे आम्ही तुझा सतत जयजयकार करीत असतो. आणि विनम्रतेने वंदनही करतो. तू तुझ्या नृत्याकलेत इतकी पारंगत आहेस, की तुझ्या पायातले ते किणकिणणारे पैंजणाचे झण झण झिंज झिंज आवाज ऐकून साक्षात नटेश्वर शिव सुद्धा नाचत तुझ्याबरोबर सहभागी होण्यासाठी मोहित होतात, म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

अयी सुमन: सुमन: सुमन: सुमन: सुमनोहर कांती यूते, 
श्रीत रजनी रजनी रजनी रजनी रजनि करवक्त्र वृते | 
सुनयन विभ्रमर भ्रमर भामर भ्रमर भ्रमराधिपते, 
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||११||

हे जगदंबे, तू हितचिंतकांच्या मनात कायम देवादिकांनी तुला अर्पिलेल्या निर्मल अशा प्राजक्ताच्या फुलांसारखी टवटवीत आकर्षक मनोहारी कांतिधारक वास करत असतेस. कमलिनी मध्ये जसे परागयुक्त कमळ फुल उमलून येते, तसे तुझे सुंदर मोहित करणारे सस्मित मुखकमल जसे चंद्रमुखी, इतके की तुझे जे कमलनयन आहेत त्याकडे ब्रमाणे वश होऊन खरोखरीचे भ्रमर घोंगावत आहेत की काय असे वाटते, म्हणून अशा ह्या माझ्या मातेला, हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

महित महाहव मल्लम तल्लीक वल्लित रल्लीत मल्लरते, 
विरचित वल्लीक पल्लीक मल्लीक झिल्लीक भील्लीक वर्ग वृते | 
श्रूतकृत फुल्ल समुल्ल सीतारुण तल्लज पल्लव सल्ललिते, 
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||१२||

हे जगदंबे, युद्धात तुझे सरदार व्यवस्थित युद्धधर्माचे पालन करून लढत आहेत की नाही, हे तू चारी दिशांनी जाऊन पाहून त्यांचे कौतुकही करत आहेस,त्यांची काळजी करून विविध सुविधाही पुरवत आहेस. वनांमध्ये स्वछंद विहार करीत असतांना तू स्वतःला अनेकविध पान फुलांनी आच्छादून स्वतःला सजवले आहेस,ते खरोखरीच खूपच सौंदर्यमय आहे, भिल्लिक होऊन झिल्लीक नामक वाद्य वाजवून तू शिवाला आकर्षित केले आहेस. हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

अशी ही श्रीमद जगद्गुरू शंकराचारी विरचित देवीस्तुती आपण म्हणत आहोत, पुढचे श्लोक उद्या. 

Web Title: Shakambhari Navratri 2025: Let's do special worship of Goddess on the occasion of Shakambhari Navratri; Part 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.