दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:31 IST2025-08-06T12:27:39+5:302025-08-06T12:31:18+5:30
Second Shravan Guruwar 2025 Datta Guru Seva: श्रावण गुरुवारी गुरुस्तोत्र अवश्य म्हणावे. हे स्तोत्र म्हणण्यास सोपे आहे. दत्तगुरूंची कृपा प्राप्त होऊ शकेल, असे म्हटले जात आहे.

दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
Second Shravan Guruwar 2025 Datta Guru Seva: मराठी वर्षातील महत्त्वाचा चातुर्मास काळ आहे. चातुर्मासातील अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण महिना सुरू आहे. श्रावणातील दुसरा गुरुवार ०७ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. गुरुवार हा दत्तगुरू, स्वामी समर्थ आणि सद्गुरू पूजनासाठी विशेष मानला जातो. गुरुवारी सद्गुरूंचे विशेष पूजन केले जाते. श्रावणातील गुरुवारी प्रभावी मानले गेलेले गुरुस्तोत्र आवर्जून म्हणा आणि दत्तगुरूंच्या अखंडित कालातीत कृपेचे धनी होण्याची संधी गमावू नका, असे सांगितले जात आहे.
गुरुवार या दिवसावर गुरु ग्रहाचा अंमल असतो. गुरु ग्रहाशी संबंधित उपाय, उपासना करण्यासह सद्गुरूंची सेवा, विशेष पूजन करणेही पुण्य फलदायी मानले गेले आहे. दत्त उपासना सोपी नाही. दत्त गुरु ही वैराग्य देवता मानली जाते. भवतापातून आपल्याला सोडवते. श्रीदत्तात्रेयांचे असंख्य शिष्य असून त्यांनी सर्वांवर त्यांच्या पात्रतेनुसार कृपा केली आहे. गुरुवारी दत्तगुरूंचे विशेष पूजन करण्यासह पिवळ्या रंगाची फुले वाहावीत. पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत आणि शक्य असेल, तर दानही करावीत, असे सांगितले जाते. यासह गुरुस्तोत्र अवश्य म्हणावे.
॥ गुरुस्तोत्र ॥
अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् ।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १॥
अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ २॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ३॥
स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित्सचराचरम् ।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ४॥
चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् ।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ५॥
सर्वश्रुतिशिरोरत्नविराजितपदाम्बुजः ।
वेदान्ताम्बुजसूर्यो यः तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ६॥
चैतन्यश्शाश्वतश्शान्तः व्योमातीतो निरञ्जनः ।
बिन्दुनादकलातीतः तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ७॥
ज्ञानशक्तिसमारूढः तत्त्वमालाविभूषितः ।
भुक्तिमुक्तिप्रदाता च तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ८॥
अनेकजन्मसम्प्राप्तकर्मबन्धविदाहिने ।
आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ९॥
शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः ।
गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १०॥
न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः ।
तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ११॥
मन्नाथः श्रीजगन्नाथः मद्गुरुः श्रीजगद्गुरुः ।
मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १२॥
गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतम् ।
गुरोः परतरं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १३॥
त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ १४॥
॥ इति श्रीगुरुस्तोत्रम् ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥