पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 14:53 IST2025-09-07T14:49:12+5:302025-09-07T14:53:48+5:30

Pitru Paksha Sankashti Chaturthi 2025: मृत्यू पंचकाचे विघ्न संकष्ट चतुर्थीला दूर होणार आहे. विघ्नहर्ता कृपेने शुभ होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

sankashti chaturthi september 2025 date in bhadrapad pitru paksha 2025 should do 5 things and ganpati will give immense auspicious blessings | पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!

पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!

Pitru Paksha Sankashti Chaturthi 2025: ॐ एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ॥ गणपतीचे नुसते नामस्मरण केले तरी वातावरण अगदी प्रफुल्लित, चैतन्यमयी होते. सर्व संकटे, समस्या, अडचणी, विघ्न दूर होणार, असा विश्वास पक्का होतो. विघ्नहर्ता गणपती अबालवृद्धांचे लाडके दैवत. गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात, जड अंतःकरणाने अनंत चतुर्दशीला निरोप दिला जाते. यानंतर सुरू होणाऱ्या पितृपक्षात येणारी संकष्ट चतुर्थी विशेष मानली जाते. यंदा अनंत चतुर्दशी, भाद्रपद पौर्णिमेला मृत्यू पंचक लागले. या मृत्यू पंचकाचे विघ्न संकष्ट चतुर्थीला दूर होणार आहे. विघ्नहर्ता कृपेने शुभ होऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता

गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणरायाचे आगमन होते. कुळाचार, कुळधर्माप्रमाणे गणपती बाप्पाचे पूजन, सेवा करून जड अंतःकरणाने गणपतीला निरोप दिला जातो. त्यामुळे पितृपक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला पुन्हा एकदा बाप्पाची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. पितृपक्षात पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावे श्राद्ध, तर्पण विधी केला जातो. यंदा, बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद संकष्ट चतुर्थी आहे. 

मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, विघ्नहर्ता कृपा करणार

पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या नक्षत्रांमधील भ्रमण कालावधीला पंचक मानले जाते. काही मान्यतांनुसार, या काळात केलेल्या अशुभ कार्यांचा पाचपट प्रभाव पडत असतो. शनिवारी पंचक सुरू झाले तर त्याला मृत्यू पंचक असे म्हटले जाते. शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.२२ वाजेपासून पंचक सुरू होत आहे. बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०४.०३ वाजता पंचक समाप्त होणार आहे. मृत्यू पंचक अतिशय कष्टदायी, प्रतिकूल मानले जाते. भाद्रपद संकष्ट चतुर्थी सुरू होतानाच मृत्यू पंचक समाप्त होणार आहे. 

पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!

भाद्रपद पितृपक्ष संकष्ट चतुर्थी: बुधवार, १० सप्टेंबर २०२५.

भाद्रपद पितृपक्ष संकष्ट चतुर्थी प्रारंभ: बुधवार, १० सप्टेंबर २२०२५ रोजी दुपारी ०३ वाजून ३८ मिनिटे.

भाद्रपद पितृपक्ष संकष्ट चतुर्थी समाप्ती: गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटे.

भाद्रपद पितृपक्ष संकष्ट चतुर्थी चंद्रोदय: बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ०८ वाजून ३४ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी चंद्रोदयाला महत्त्व असल्यामुळे बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी संकष्ट चतुर्थी असणार आहे. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे.

पितृपक्ष संकष्ट चतुर्थी व्रताचे महत्त्व

संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. संकष्ट चतुर्थीला बाप्पाला लाडवाचा नैवेद्य दाखवावा. गणपतीच्या आवडत्या गोष्टी अर्पण कराव्यात. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते.   मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणावी. जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे.

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

Web Title: sankashti chaturthi september 2025 date in bhadrapad pitru paksha 2025 should do 5 things and ganpati will give immense auspicious blessings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.