Sankashti Chaturthi 2025: आज संकटहरण चतुर्थी आणि पुढच्या महिन्यात अंगारकी; महिनाभर करा 'हा' इच्छापूर्तीचा उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 10:24 IST2025-07-14T10:23:57+5:302025-07-14T10:24:59+5:30

Gajanana Sankashti Chaturthi July 2025: इच्छापूर्ती करणारी ही उपासना आजपासून महिनाभर दिवसातून तीन वेळा करायची आहे आणि त्यासाठी फक्त तीन मिनिटं लागणार आहेत!

Sankashti Chaturthi 2025: Today is Sankatharan Chaturthi and next month is Angarki; do this wish-fulfilling remedy for a month! | Sankashti Chaturthi 2025: आज संकटहरण चतुर्थी आणि पुढच्या महिन्यात अंगारकी; महिनाभर करा 'हा' इच्छापूर्तीचा उपाय!

Sankashti Chaturthi 2025: आज संकटहरण चतुर्थी आणि पुढच्या महिन्यात अंगारकी; महिनाभर करा 'हा' इच्छापूर्तीचा उपाय!

आज सोमवार, १४ जुलै, चातुर्मासातील(Chaturmas 2025) पहिली संकष्ट चतुर्थी(Sankashti Chaturthi 2025) आहे आणि पुढच्या महिन्यात १२ ऑगस्ट रोजी मंगळवारी संकष्टी आल्याने अंगारक योग(Angarki Chaturthi 2025) तयार होत आहे. त्यामुळे या महिनाभरात पुढे दिलेली उपासना भक्तिभावे केली असता तिचा लाभ मिळेल असे त्या उपासनेच्या शेवटी म्हटले आहे. 

Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!

यासाठी महिनाभर देवर्षी नारद यांनी रचलेल्या 'संकटनाशक' स्तोत्राचे पठण करायचे आहे. हे मूळचे संस्कृत स्तोत्र कवी श्रीधर यांनी मराठीत अनुवादित केले. त्यामुळे ज्यांना संस्कृत येत नाही, त्यांनाही हे स्तोत्र पठण करणे सोपे झाले. त्यात गणरायची बारा नावे आहेत व शेवटी स्तोत्राची फलश्रुती दिली आहे. त्यात असे म्हटले आहे, की हे प्रासादिक स्तोत्र त्रिकाळ अर्थात सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हटले तर त्याचे फळ निश्चित मिळते.विद्यार्थ्याला विद्या, धनार्थ्याला धन, पुत्रार्थ्याला पुत्र आणि मोक्षार्थ्याला गती मिळते असे म्हटले आहे. 

हे स्तोत्र मनोभावे म्हटले असता सहा मासात या स्तोत्राची अनुभूती येते. अनेकांनी त्याचा लाभ घेतला आहे. तुम्हीही बाप्पाचे नाव घ्या आणि हे स्तोत्र तीन वेळा म्हणण्यास सुरुवात करा. स्तोत्र म्हणण्यास १ मिनिटाच्या वर वेळ लागत नाही, पण सातत्य मात्र हवं. आता तुम्ही तुमच्या सोयीची वेळ निवडून घ्या आणि महिनाभर तीन वेळेस ही उपासना करा. 

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका | भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें | तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||

पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें | सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक | अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर | विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||

विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन | पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||

जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ| एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे | श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||

चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन.

Web Title: Sankashti Chaturthi 2025: Today is Sankatharan Chaturthi and next month is Angarki; do this wish-fulfilling remedy for a month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.