संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:48 IST2025-09-10T14:48:26+5:302025-09-10T14:48:57+5:30

Sankashti Chaturthi September 2025 Moonrise Time: आज पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी आहे, संकष्टीचा उपास सोडण्यासाठी जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि गणेश पूजेचा विधी. 

Sankashti Chaturthi 2025 Chandroday Muhurta: When is the moonrise on Sankashti in Pitru Paksha? See Ganesh Puja rituals and auspicious times | संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

Sankashti Chaturthi September 2025 Chandroday Time: बुधवारी, १० सप्टेंबर २०२५ रोजी संकष्टी चतुर्थी(Sankashti Chaturthi 2025) आहे. विशेष म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुद्ध विनायक चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थीही बुधवारीच आली होती आणि आज पितृपक्षातील(Pitru Paksha 2025) संकष्टीही बुधवारीच आली आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया महत्त्व, पूजा विधी आणि चंद्रोदयाचा मुहूर्त. 

पितृपक्षामुळे महत्त्वाची खरेदी पुढे ढकलताय? थांबा! 'या' मुहूर्तावर केलेली खरेदी देईल दुप्पट लाभ!

पितृपक्षातील भाद्रपद वद्य संकष्ट चतुर्थी(Sankashti Chaturthi 2025 Pitru Paksha)

गणपतीचे नुसते नामस्मरण केले तरी वातावरण अगदी प्रफुल्लित, चैतन्यमयी होते. सर्व संकटे, समस्या, अडचणी, विघ्न दूर होणार, असा विश्वास पक्का होतो. विघ्नहर्ता गणपती अबालवृद्धांचे लाडके दैवत. गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात, जड अंतःकरणाने अनंत चतुर्दशीला निरोप दिला जाते. यानंतर सुरू होणाऱ्या पितृपक्षात येणारी संकष्ट चतुर्थी विशेष मानली जाते. कारण, पितृपक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला पुन्हा एकदा बाप्पाची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. यंदा अनंत चतुर्दशी, भाद्रपद पौर्णिमेला मृत्यू पंचक लागले. या मृत्यू पंचकाचे विघ्न संकष्ट चतुर्थीला दूर होणार आहे. विघ्नहर्ता कृपेने शुभ होऊ शकते, असे सांगितले जात आहे. 

पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?

पितृपक्षातील भाद्रपद वद्य संकष्ट चतुर्थी चंद्रोदय मुहूर्त(Sankashti Chaturthi 2025 Chandroday Muhurta Time):

पितृपक्षातील भाद्रपद वद्य संकष्ट चतुर्थी : १० सप्टेंबर २०२५

पितृपक्षातील भाद्रपद वद्य संकष्ट चतुर्थी प्रारंभ : १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून ३९ मिनिटांनी 

पितृपक्षातील भाद्रपद वद्य संकष्ट चतुर्थी समाप्ती : ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत 

पितृपक्षातील भाद्रपद वद्य संकष्ट चतुर्थी चंद्रोदयाची वेळ : रात्री ८ वाजून ३४ मिनिटांनी

संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी, समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण, काही विशेष स्तोत्रांचे पठण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ, पुण्यफलदायी, लाभदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे, असे म्हटले जाते.

Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा

पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी पूजा विधी

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते.  रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

 

Web Title: Sankashti Chaturthi 2025 Chandroday Muhurta: When is the moonrise on Sankashti in Pitru Paksha? See Ganesh Puja rituals and auspicious times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.