शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Sankashti Chaturthi 2024: संकष्टीला राशीनुसार करा दान; मार्गी लागेल अडलेले काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 07:48 IST

Sankashti Chaturthi 2024: पुण्यसंचय व्हावा म्हणून श्रावणमासात दानधर्म सुचवला जातो; अशातच आज संकष्ट चतुर्थीचा मुहूर्त चुकवू नका, राशीनुसार दान करा आणि कष्टमुक्त व्हा!

आज श्रावणातली संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2024). आजच्या दिवशी संकष्टीचा उपास तर केला जातोच, शिवाय श्रावण मास सुरु असल्याने आजच्या दिवशी राशीनुसार पुढील वस्तूंचे दान केले असता अडलेली कामे मार्गी लागतात असे ज्योतिष तज्ज्ञांनी सुचवले आहे. सदर वस्तू या आपल्या घरातल्याच असल्याने त्यासाठी विशेष तयारीची आवश्यकता नाही. मात्र हे दान सत्पात्री अर्थात योग्य आणि गरजू व्यक्तीला करणे इष्ट ठरते. 

श्रावणात (Shravan 2024) जशी शिवामूठ वाहिली जाते तसे संकष्टीलाही दानधर्म करा असे सांगितले आहे. शिवामूठ वाहताना आपण मूठभर धान्य शिवाला अर्पण करतो आणि तो आशुतोष प्रसन्न होतो. मात्र माणसाची भूक मोठी आणि कधीही न संपणारी असल्याने जेव्हा गरजू व्यक्तीला दान कराल तेव्हा ते त्याच्या संसाराला, जेवणाला पूरक असेल अशा बेताने करा, असेही सांगितले आहे. चला तर जाणून घेऊ, कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते दान केले असता, त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतात... 

हे ही वाचा : Sankashti Chaturthi 2024: संकष्टीच्या मुहूर्तावर त्रिग्रही योगाचा शुभ संयोग; ५ राशींवर बापाच्या कृपेचा वर्षाव!

आजची श्रावणातली संकष्टी हेरंब संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. हेरंब अर्थात अंबेचा-जगदंबेचा अंश आणि सांब सदाशिवाचा पुत्र, असा गणराज आपल्या अडचणी सोडवण्यास तत्परतेने पुढे येतो, म्हणून सुखकर्ता आणि दुःखहर्ता अशी त्याची ख्याती आहे. मात्र तो भक्तांची परीक्षा घेतो आणि त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या भक्तावरच कृपावर्षाव करतो. त्याच्या कृपेस पात्र होण्यासाठी कोणी कोणत्या गोष्टींचे दान आज करायला हवे ते जाणून घेऊया. 

>> मेष राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला गहू आणि गुळाचे दान करावे.

>> वृषभ राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तांदूळ आणि साखरेचे दान करावे.

>> मिथुन राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीला मनी प्लांटचे रोप दान करावे.

>> कर्क राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करावे.

>> सिंह राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीला गुलाबजल आणि मध दान करावे.

>> कन्या राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला लिंबू आणि बांबूचे रोप दान करावे.

>> तूळ राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करावे.

>> वृश्चिक राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला लाल रंगाचे वस्त्र दान करावे.

>> धनु राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला तुळशीचे रोप दान करावे.

>> मकर राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला शमीच्या रोपाचे दान करावे.

>> कुंभ राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीला नीलकंठाचे अर्थात महादेवाचे चित्र दान करावे.

>> मीन राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला केळीचे रोप दान करावे.

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीchaturmasचातुर्मासShravan Specialश्रावण स्पेशलAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य