Samudra Shastra: तळपायाला अचानक खाज सुटत असेल तर वेळीच सावध व्हा; जाणून घ्या कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 16:10 IST2023-08-28T16:09:24+5:302023-08-28T16:10:55+5:30
Samudra Shastra: तळहाताला खाज सुटणे म्हणजे धनलाभाची शक्यता, मात्र तळपायाला खाज सुटणे अशुभ लक्षण असल्याचे समुद्र शास्त्र सांगते!

Samudra Shastra: तळपायाला अचानक खाज सुटत असेल तर वेळीच सावध व्हा; जाणून घ्या कारण!
त्वचेचा आजार नसतानाही शरीराला खाज खरूज येणे ही सामान्य बाब आहे, तरीदेखील समुद्र शास्त्रात या छोट्याशा कृतीचाही बारकाईने विचार केला आहे. त्यानुसार अचानक खाज येणे तुमच्या भविष्याबाबत चांगले किंवा वाईट संकेत देणारे ठरते असा निष्कर्षदेखील काढला आहे. पायाच्या तळव्याला अचानक खाज सुटली तर त्याचा अर्थ समुद्रशास्त्रात काय होतो याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
उजव्या पायात अचानक खाज सुटणे
जर तुमच्या उजव्या पायाला किंवा पायाच्या तळव्याला अचानक खाज सुटू लागली तर ते चांगले लक्षण आहे. उजव्या पायास खाज येणे हे चांगले लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच एखाद्या शुभ प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. या प्रवासात तुमच्या योजना पूर्ण होतील आणि तुमचे काम यशस्वी होईल. तसेच आर्थिक लाभही मिळू शकतो.
डाव्या पायाला खाज सुटण्याचा अर्थ
जर तुमच्या डाव्या पायाला अचानक खाज येत असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. हे तुम्हाला कोणत्याही प्रवासाला जाण्यापासून प्रतिबंधित करते. याचा अर्थ आगामी काळात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. डाव्या पायाच्या तळव्याला खाज सुटणे सुटत असेल तर लांबचा प्रवास शक्यतो थांबवावा. या प्रवासात तुम्हाला अशुभ परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
उजव्या आणि डाव्या हाताला खाज सुटणे
हाताला किंवा तळव्याला खाज येण्याचा संबंध नफा किंवा तोटा यांच्याशी असतो. जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हाताला खाज येत असेल तर असे मानले जाते की त्याला कुठून तरी धन मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच डाव्या हाताला खाज सुटली तर पैसे जास्त खर्च होतात. अन्यथा काही कामात धनहानी होऊ शकते. याशिवाय काही लोकांच्या मते डाव्या भागात खाज येणे हे आजाराचे लक्षण आहे. तुमच्या घरातील कोणीतरी गंभीर आजारी पडू शकते. त्याबाबतीत अधिक काळजी घ्या आणि सतर्क राहा.