शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विकृती, प्रवृत्ती आणि संस्कृती यातील फरक गोष्टीतून सांगताहेत सद्गुरू वामनराव पै

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 08:00 IST

आपले व्यक्तिमत्त्व हा आपल्या विचारांचा आरसा आहे. सद्गुरू वामनराव पै यांच्यासारख्या मार्गदर्शकांच्या विचारातून या व्यक्तिमत्त्वाची अध्ये मध्ये पाहणी जरूर करावी.

देव आपल्याला भेटावा आणि त्याने आपले सगळेच प्रश्न सोडवावेत, असे आपल्या प्रत्येकाला वाटते. परंतु, उद्या यदाकदाचित, देव समोर आलाच, तर त्याच्याकडे आपण आधी स्वतःसाठी मागू की दुसऱ्यांसाठी यावरून कळते आपल्यातील विकृती, प्रवृत्ती आणि संस्कृती. यातील नेमका फरक सांगत आहेत, सद्गुरू वामनराव पै. 

दोन भक्त होते. आपल्या इच्छापूर्तीसाठी दोघेही एकाच ठिकाणी ध्यान मग्न होऊन बसले. त्यांनी बरीच वर्षे तपश्चर्या केली. शेवटी देव त्यांच्यापैकी एकाला प्रसन्न झाल़े  दुसऱ्याचे डोळे अजूनही बंदच, हे पाहून पहिला सुखावला. देवाने त्याला दर्शन न देता आपल्याला दर्शन दिले, त्यामुळे पहिल्याला आपल्याच नशीबाचा हेवा वाटू लागला. देवाने त्याला वर मागायला सांगितला. तो विचारात पडला. सोने, चांदी, बंगला, गाडी, बायको, मुलं, संसार अशी मोठी यादी मनातल्या मनात मोजू लागला. ते पाहून भगवंत म्हणाले, 'तू खूपच मोठी यादी केलेली दिसते. पण एक लक्षात ठेव, तू जेवढे मागशील, त्याच्या दुप्पट तुझ्या तुझ्या या मित्राला मिळेल.' 

हे वाक्य कानावर पडताच. पहिल्याने आपली बकेट लिस्ट  मनातल्या मनात फाडून टाकली. आपल्यापेक्षा त्याला जास्त मिळणार, या विचाराने, त्याच्या मनात वाईटात वाईट विचार घोळू लागले. शेवटी बराच विचार करून तो देवाला म्हणाला, 'देवा, माझा एक डोळा फोड.'

देव तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. त्याचा एक आणि मित्राचे दोन डोळे फुटले. पहिला आनंदून गेला. दुसऱ्याची काही चूक नसताना अतोनात नुकसान झाले. मात्र, अशाप्रकारे केलेल्या मत्सरात आपण आपला अमुल्य डोळा गमावला, याचे पहिल्याला अजिबात वैशम्य वाटले नाही. यावरून कळते, आपले भले झाले नाही, तरी चालेल, पण दुसऱ्याचे भले होता कामा नये, अशी वृत्ती म्हणजे विकृती!

आपले भले झाले, आता दुसऱ्यांचे काहीही होवो, आपल्याला काय, अशी वृत्ती म्हणजे प्रवृत्ती!

आणि माझ्यासकट सर्व विश्वाचे भले होवो, अशी वृत्ती म्हणजे संस्कृती!

म्हणून आपल्या सर्व संतांनी, कधीही स्वत:साठी न मागता साऱ्या विश्वासाठी प्रार्थना केली. ज्ञानेश्वर माऊलींनी तर 'जो जे वांछिल तो ते लाहो' म्हणत, विश्वकल्याणासाठी पसायदान मागितले. असेच दान आपणही मागितले पाहिजे. 

काही लोक एवढे हुशार असतात. त्यांना कधी, कुठे, काय मागावे हे बरोबर कळते. एका ९० वर्षाच्या गरीब म्हाताऱ्याने देवाला प्रसन्न करून घेतले आणि वर मागितला, `देवा, मला माझ्या पणतूला राजसिंहासनावर बसलेला माझ्या डोळ्यांनी पहायचा आहे.' म्हणजे एका मागणीत ऐश्वर्य, आरोग्य आणि आयुष्य मागून घेतले. पण स्वतःपुरते मागणे मागून आपण कधीच सुखी होऊ शकत नाही. 

भगवंत आपल्या प्रत्येक मागणीला नेहमी तथास्तू म्हणत असतो. म्हणून देवाकडे मागणे मागावे, 

हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे.सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर.आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 

दुसऱ्याच्या सुखासाठी स्वत:ची ओंजळ पुढे करा, देव त्यांच्यासकट तुमचेही भले करेल. त्याच्याकडे नुसती बुद्धी नाही, तर चांगली बुद्धी मागायची आहे. सगळ्यांनी चांगला विचार केला, तर वाईट गोष्टी घडणारच नाहीत आणि सगळे जण आपोआप सुखात, आनंदात, ऐश्वर्यात राहतील. निश्चिंत मनाने जगतील आणि हाताने काम करता करता, मुखाने हरीनामही आनंदाने घेतील.

टॅग्स :Wamanrao Paiवामनराव पैInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी