Ritual: बुधवारी केस कापले तर डोक्यावर घोंगावत नाही अकाल मृत्यूचे सावट; प्रेमानंद महाराज सांगतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:37 IST2025-03-25T15:36:25+5:302025-03-25T15:37:36+5:30
Ritula: पूर्वजांनी अनेक गोष्टी विचारपूर्वक ठरवल्या आहेत, जसे की केस कापावेत टीआर बुधवारी; पण आणखीही शास्त्रनियम कोणते तेही जाणून घेऊ.

Ritual: बुधवारी केस कापले तर डोक्यावर घोंगावत नाही अकाल मृत्यूचे सावट; प्रेमानंद महाराज सांगतात...
पूर्वीचे लोक अर्थात आपल्या आजी आजोबांची पिढी प्रत्येक रूढी, परंपरा यांचे काटेकोरपणे पालन करत असे. मात्र जीवनपद्धती बदलत गेली, तस तशी वेळ नाही या नावावर अनेक शॉर्ट कट सुरु झाले आणि जमतील तशा रूढी, जमतील तशा परंपरा असा सोयीस्कर अर्थ लावण्यात येऊ लागला. परिणामी या त्याचे दुष्परिणामही दिसू लागले. नखं कापणे, केर काढणे, केस कापणे, डोक्यावरून नाहणे यासारख्या अनेक गोष्टींमागे लावलेले नियम यांना शास्त्राधार होता. कालपरत्वे लोकांनी त्याचा अभ्यास करणे सोडून दिले त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी, नियम निराधार वाटू लागले. म्हणून अभ्यास केला नाही, तरी अभ्यास केलेल्या व्यक्तींकडून आलेल्या माहितीचे पालन केले तर आपल्यालाच लाभ होईल हे नक्की!
सध्या लोकप्रिय असलेले आणि सोशल मीडियावर सगळ्या वयोगटातल्या लोकांना आवडत असलेले अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज यांनी अशाच एका रुढीबद्दल टिप्पणी केली, ती म्हणजे केस कापण्यावर!
आज उठसूट लोक कधीही केस कापायला जातात. अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, वार असे कोणतेही नियम पाळत नाहीत. मात्र एखादी गोष्ट का करायची नाही यामागील कारण जाणून घेतले तर त्या चुका आपण करणार नाही. त्या चुका कोणत्या? तर-
सोमवार : जे शिवउपासक आहेत आणि ज्यांना आपल्या मुलांची प्रगती व्हावी असे वाटते त्यांनी सोमवारी केस कापू नयेत.
मंगळवार आणि शनिवार : या दिवशी दाढी, मिशी, केस कापल्यामुळे अकाल मृत्यू योग तयार होतो, त्यामुळे या दोन्ही दिवशी केस कापू नका.
बुधवार आणि शुक्रवार : या दिवशी केस कापल्याने धन, बुद्धी, संपत्ती, यश, कीर्ती यात वृद्धी होते.
गुरुवार : हा गुरुकृपेचा वार असल्यामुळे या दिवशी ज्ञानार्जनासकट जेवढ्या गोष्टी घेता येतील तेवढ्या घ्या, कमी करू नका-मग ते केस असोत की पैसा!
रविवार : हा सूर्याचा वार असतो, सूर्यपूजेचा मान दिला जातो, अशा वेळेस केस अर्पण केले तर अनेक प्रकारची हानी होऊ शकते, मग ती शारीरिक असो, मानसिक असो नाहीतर आर्थिक असो!
'अज्ञानात आनंद' असे म्हणत याआधी बुधवार आणि शुक्रवार सोडून अन्य दिवशी केस कापले असतील तर त्याबद्दल देवाची मनोमन क्षमा मागा आणि यापुढे वार लक्षात घेऊन मगच केस कापायला जा.