शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

Did you know: चूक करू नका! 'ध्वजारोहण' आणि 'झेंडा फडकवणे' यातला हा फरक तुम्हाला माहीत असायलाच हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:06 IST

Republic Day 2026: २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, कॉलेज, सोसायटीत ध्वजवंदन आयोजित केले जाते, त्यादृष्टीने ही माहिती अत्यंत महत्त्वाची!

प्रजासत्ताक दिन(Republic Day 2026) असो वा स्वातंत्र्य दिन, आपल्या तिरंग्याला डौलाने फडकताना पाहणे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या दोन्ही दिवशी ध्वज उभारण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असते? तांत्रिक भाषेत सांगायचे तर, एका दिवशी 'ध्वजारोहण' केले जाते, तर दुसऱ्या दिवशी 'झेंडा फडकवला' जातो.

Republic Day 2026 Speech: शाळा, कॉलेज, सोसायटीमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाला द्यायचंय छोटंसं पण दमदार भाषण? 2 मिनिटांत जिंका साऱ्यांची मनं

यंदाच्या २६ जानेवारी २०२६ च्या निमित्ताने यातील नेमका फरक आणि त्यामागील रंजक कारणे जाणून घेऊया.

१. ध्वजारोहण (Flag Hoisting) - १५ ऑगस्ट

स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान 'ध्वजारोहण' करतात.

पद्धत: यावेळी राष्ट्रध्वज खांबाच्या खालच्या बाजूला बांधलेला असतो. पंतप्रधान दोरी ओढून तो ध्वज खालून वर नेतात आणि मग तो फडकवला जातो.

अर्थ: ध्वज खालून वर नेण्याची ही प्रक्रिया ब्रिटीश राजवटीचा अंत आणि नवीन स्वतंत्र भारताच्या उदयाचे प्रतीक आहे. याला इंग्रजीत 'Flag Hoisting' म्हणतात.

२. झेंडा फडकवणे (Flag Unfurling) - २६ जानेवारी

प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) कर्तव्य पथावर देशाचे राष्ट्रपती 'झेंडा फडकवतात'.

पद्धत: यावेळी तिरंगा आधीच खांबाच्या वरच्या टोकाला गुंडाळून बांधलेला असतो. राष्ट्रपती केवळ दोरी ओढतात आणि तो फडकवला जातो.

अर्थ: भारत आधीच स्वतंत्र झाला असल्यामुळे ध्वज वर नेण्याची गरज नसते, तर केवळ तो उघडून फडकवला जातो. ही प्रक्रिया आपल्या संविधानाच्या अंमलबजावणीचा आणि प्रजासत्ताक राष्ट्राचा गौरव दर्शवते. याला इंग्रजीत 'Flag Unfurling' म्हणतात.

३. मान कोणाचा? (राष्ट्रपती की पंतप्रधान)

१५ ऑगस्ट: देश स्वतंत्र झाला तेव्हा संविधान अमलात आले नव्हते आणि राष्ट्रपती पद अस्तित्वात नव्हते, त्यामुळे देशाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान ध्वजारोहण करतात.

२६ जानेवारी: हा दिवस संविधानाच्या अंमलबजावणीचा आहे. राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असल्याने, प्रजासत्ताक दिनी त्यांचा हस्ते हा सोहळा पार पडतो.

ध्वज संहितेचे पालन अनिवार्य

तिरंगा हा आपल्या देशाचा सन्मान आहे. ध्वज कसा गुंडाळावा, त्याची घडी कशी घालावी आणि तो कसा उतरवावा याचे कडक नियम 'भारतीय ध्वज संहितेत' दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणे हा कायदेशीर गुन्हा ठरू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Flag Hoisting vs. Unfurling: Know the Key Difference This Republic Day

Web Summary : Republic and Independence Days differ in flag ceremonies. Hoisting on August 15 symbolizes independence, while unfurling on January 26 celebrates the constitution. The Prime Minister hoists, and the President unfurls, each signifying distinct national milestones.
टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२६IndiaभारतNational Flagराष्ट्रध्वज