आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात अनेकदा आपल्याला असं वाटतं की, "आता आयुष्यात काही 'राम' उरलेला नाही." जेव्हा जगण्याची उमेद हरवते, ध्येय धूसर होतं आणि मन अस्वस्थ असतं, तेव्हा फक्त एकच शक्ती आपल्याला सावरू शकते—ती म्हणजे 'राम नाम!'
Ram Navami 2026: रामनवमीला मनगटावर बांधा ११ गाठींचा 'हा' धागा; तुमचे आणि कुटुंबाचे होईल संरक्षण!
ज्या राम नामाने हलाहल विष प्राशन केलेल्या महादेवांच्या अंगाचा दाह शांत केला, तेच नाम आपल्या मनातील संकटांचा दाह नक्कीच शांत करेल. २६ मार्च २०२६, श्रीरामनवमी(Ram Navami 2026) निमित्त आपल्या समस्येनुसार कोणत्या मंत्राचा जप करावा, ते जाणून घ्या.
रामरक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी कवच आहे. ते पाठ असेल तर उत्तमच, नसेल तर या पवित्र दिवशी ते श्रवण करावे. त्यासोबतच, तुमच्या विशिष्ट अडथळ्यांनुसार खालीलपैकी एका मंत्राची निवड करून त्याचा किमान १०८ वेळा जप करावा.
तुमच्या समस्येनुसार निवडा योग्य राम मंत्र:
श्रीराम मंत्र आणि त्यांचे लाभ:
१. "राम" नामाचा उच्चार:हा केवळ एक शब्द नसून स्वतःमध्ये एक महामंत्र आहे. या नामाची मात्रा घेतल्यास मनातील सर्व नकारात्मक विचार आणि विकार आपोआप दूर होतात.
२. रां रामाय नम:जर तुम्हाला समाजात पद, प्रतिष्ठा हवी असेल किंवा लक्ष्मी (ऐश्वर्य), पुत्र सुख आणि उत्तम आरोग्याची इच्छा असेल, तर या मंत्राचा जप अत्यंत फलदायी ठरतो.
Numeroloy: अंकशास्त्र सांगतंय तुमच्या जन्मतारखेचं गुपित; तुमचं मॅजिकल गिफ्ट तुम्हाला माहित आहे का?
३. ॐ रामचंद्राय नम:ज्यांच्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे किंवा मानसिक क्लेश होत असतात, त्यांनी हा मंत्र जपावा. यामुळे कुटुंबात शांती आणि समाधान लाभते.
४. ॐ रामभद्राय नम:दैनंदिन आयुष्यात किंवा नोकरी-व्यवसायाच्या कामात येणारे अडथळे आणि विघ्न दूर करण्यासाठी या मंत्राचा उच्चार करावा.
५. ॐ जानकी वल्लभाय स्वाहा:मनातील एखाद्या विशेष मनोकामनेच्या पूर्तीसाठी किंवा इप्सित ध्येय साध्य करण्यासाठी हा मंत्र प्रभावी मानला जातो.
६. ॐ नमो भगवते रामचंद्राय:जेव्हा आपण एखाद्या मोठ्या संकटात सापडतो आणि बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सुचत नाही, तेव्हा हा मंत्र आपल्याला योग्य दिशा दाखवतो.
७. श्रीराम जय राम, जय-जय राम:हा १३ अक्षरी (त्रयोदक्षरी) मंत्र आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि मनाची एकाग्रता वाढवून साधनेत स्थिरता मिळवण्यासाठी हा मंत्र जपावा.
८. श्रीराम गायत्री मंत्र:(ॐ दशरथाय विद्महे सीता वल्लभाय धीमहि तन्नो राम: प्रचोदयात्)हा मंत्र सिद्धी देणारा असून, उच्च आत्मिक शक्ती आणि जीवनात तेज मिळवण्यासाठी याचा जप केला जातो.
९. ॐ हं हनुमते श्री रामचंद्राय नम:भक्त आणि भगवंत अशा दोघांचीही कृपा हवी असेल, तर हा मंत्र उत्तम आहे. यामुळे प्रभू श्रीराम आणि बजरंगबली या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो.
Ram Navami 2026: राम श्रेष्ठ की रावण? मंदोदरीला युद्धभूमीवर मिळाले उत्तर; सांगताहेत कुमार विश्वास!
१०. ॐ रामाय धनुष्पाणये स्वाहा:जर तुम्हाला गुपित शत्रूंचा (हितशत्रू) त्रास होत असेल किंवा कोणी विनाकारण त्रास देत असेल, तर त्यापासून संरक्षणासाठी हा मंत्र सहाय्यक ठरतो.
पठण करताना पाळायचे नियम:
श्रद्धा आणि ध्यान: मंत्र केवळ ओठांनी न म्हणता, प्रभू श्रीरामांच्या रूपाचे ध्यान करून मनापासून म्हणावा.
रामनवमीचा मुहूर्त: २६ मार्च रोजी दुपारच्या वेळी (राम जन्मोत्सवाच्या वेळी) हा जप करणे अत्यंत फलदायी ठरते.
सातत्य: केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता, यातील एखादा मंत्र रोजच्या दिनचर्येत समाविष्ट करावा.
Web Summary : Feeling lost? Ram Navami 2026 offers solace. Chanting specific Ram mantras can remove negativity, bring peace, success, and protect from enemies. Choose a mantra aligning with your needs and chant with devotion for best results.
Web Summary : खोया हुआ महसूस कर रहे हैं? राम नवमी 2026 सांत्वना प्रदान करता है। विशिष्ट राम मंत्रों का जाप नकारात्मकता को दूर कर सकता है, शांति, सफलता ला सकता है और दुश्मनों से रक्षा कर सकता है। अपनी आवश्यकताओं के अनुसार एक मंत्र चुनें और सर्वोत्तम परिणामों के लिए भक्ति के साथ जप करें।