Ram Navami 2025: नकारात्मक शक्तीपासून बचाव करण्यासाठी रामनवमीला बांधा रामधागा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:04 IST2025-04-04T14:03:17+5:302025-04-04T14:04:59+5:30
Ram Navami 2025: आयुष्यातल्या नकारात्मक घटना, वाईट शक्ती, नैराश्य यापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण व्हावे यासाठी रामनवमीला दिलेला उपाय करा.

Ram Navami 2025: नकारात्मक शक्तीपासून बचाव करण्यासाठी रामनवमीला बांधा रामधागा!
यंदा ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीरामनवमी (Ram Navami 2025) आहे. रामनवमी अर्थात प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस. तो दरवर्षी साजरा करण्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपण आपल्या आयुष्यात, आपल्या सभोवती, आपल्या कर्तृत्त्वाने रामराज्य उभे करायचे. त्यासाठी हा दिवस म्हणजे एक सकारात्मक सुरुवात.
प्रभू श्रीराम यांचे आयुष्य म्हणजे भयंकर प्रतिकूलता! अयोध्येचा राजा दशरथ याच्या पोटी जन्माला येऊनही या राजकुमाराला १४ वर्ष वनवास, वडिलांचा मृत्यू, त्यानंतर पत्नीचा विरह, नंतर मुलांचा विरह.... म्हणजेच सर्वसामान्य मनुष्याच्या वाट्याला यावं असं दुःख त्यांनी सहन केलं. तरीसुद्धा त्याही परिस्थितीत त्यांनी असामान्य कर्तृत्त्व दाखवून स्वतःला मर्यादा पुरुषोत्तम सिद्ध केलं.
Swami Samartha: स्वामींचा 'हा' मंत्र घराच्या भिंतीवर लिहून काढा; कायमस्वरूपी तणावमुक्त व्हाल!
अशा श्रीराम प्रभूंचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवावा आणि प्रत्येक प्रतिकूल स्थितीचा खंबीरपणे सामना करावा, यासाठी बुधकौशिक ऋषी त्याच श्रीरामाला शरण जाऊन प्रार्थना करा असे सांगतात. त्यांनी लिहिलेले श्री रामरक्षा स्तोत्र यादृष्टीने अतिशय परिणामकारक आहे. ही रामरक्षा रोज म्हटली तर जिभेला वळण लागतं, वाणी सुधारते आणि त्यात नमूद केल्यानुसार श्रीराम नखशिखांत आपले रक्षण करतात.
यादृष्टीने ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी यांनी रामनवमी विशेष उपाय सांगितला आहे. जो उपाय केला असता आयुष्यातील नकारात्मक घटनांचा विसर पडण्यास मदत होईल, आपल्या सभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती यांचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही. त्यासाठी रामरक्षेचे नित्य पठण तर करायचेच आहे, त्याबरोबर राम नवमीला विशेष उपाय करायचा आहे.
Vastu Shastra: तुळशीभोवती 'या' चुकीच्या गोष्टी असतील, तर वास्तू दोष निर्माण होणारच!
रामनवमी विशेष उपाय :
या उपायासाठी रामनवमीच्या दिवशी लाल पिवळा धागा घेऊन रामरक्षा म्हणावी. धाग्याला एक गाठ बांधावी. पुन्हा रामरक्षा म्हणून थोड्या अंतरावर परत एक गाठ बांधावी. अशी ११ वेळा रामरक्षा म्हणत धाग्याला ११ गाठी बांधाव्यात आणि तो धागा रामाच्या पायी ठेवून श्रद्धेने आपल्या मनगटाला बांधावा. हा उपाय आपण स्वतःसाठी तसेच आपल्या कुटुंबियांसाठी करू शकतो.
त्यामुळे येत्या रामनवमीला म्हणजेच रविवारी ६ एप्रिल २०२५ रोजी दिलेला उपाय करा आणि आयुष्याची सकारात्मक सुरुवात करा.