Rahu Gochar 2022: 'या' तीन राशींनो, वर्षभर सोबत आहे 'राहू'; नका आता मागे पाहू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 10:12 IST2022-05-06T10:11:48+5:302022-05-06T10:12:10+5:30
Rahu Gochar 2022: राहूच्या राशी बदलामुळे मोठे बदल होतात. करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य, राजकारण या विषयांत त्याचे पडसाद दिसतील. मेष राशीतील राहूचे संक्रमण पुढे दिलेल्या ३ राशीच्या लोकांसाठी संपूर्ण वर्षभर अतिशय शुभ दिवस घेऊन आले आहे.

Rahu Gochar 2022: 'या' तीन राशींनो, वर्षभर सोबत आहे 'राहू'; नका आता मागे पाहू!
ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या नंतर सर्वात मंद गतीने जाणारे ग्रह राहू आणि केतू आहेत. हे दोन्ही ग्रह दीड वर्षात राशी बदलतात. याशिवाय त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, की ते नेहमी मागे चालतात. एप्रिल महिन्यात राहू ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे. राहू-केतू यांना छाया ग्रह म्हणतात आणि त्यांच्या वाईट प्रभावामुळे जीवन उध्वस्त होऊ शकते, परंतु ते शुभ परिणाम देखील देतात. हाच शुभकाळ आला आहे, तीन राशींसाठी! केवळ आगामी काळ नाही तर पूर्ण वर्ष राहूची साथ तुम्हाला असणार आहे, त्यामुळे प्रगती, विकास, यशाची दारे तुमच्यासाठी खुली असतील. तर आता मागे वळून बघूच नका. त्या भाग्यवान राशी पुढीलप्रमाणे -
मिथुन: राहुचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी अनेक आनंददायी क्षण घेऊन आला आहे. हा काळ त्यांना करिअर आणि आर्थिक स्थितीत मोठी चालना देणारा ठरेल. त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडतील. विशेषत: जे लोक व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी हा काळ सोन्याचा वर्षाव करणारा ठरेल. राजकारणात सक्रिय असलेल्या लोकांनाही मोठे पद मिळू शकते.
कर्क : राहूचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी कामाच्या दृष्टीने अतिशय शुभ सिद्ध होईल. जे नोकरीत आहेत, त्यांना मोठे पद मिळू शकते. नवीन नोकरी मिळू शकते. पदोन्नती मिळू शकते. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन घर-कार खरेदी करू शकता. हे वर्ष तुमचेच आहे, असे समजून कामाला लागा आणि अद्भुत यश मिळवा.
मीन: राहूच्या संक्रमणामुळे मीन राशीच्या लोकांना धनलाभ होईल. आजवर प्रवासाची केलेली आखणी, सुप्त इच्छा पूर्ण होईल. एकीकडे तुमची साडे साती सुरू झाली आहे, पण राहूचे पाठबळ मिळाल्याने निदान पहिले वर्ष तुमच्यासाठी अडचणी नक्कीच नसतील. संधीचे सोने करा. तरच कामात प्रगती होईल. कमाई वाढेल. ज्यांना राजकारणात उतरायचे आहे किंवा मोठे पद मिळवायचे आहे, त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. एकंदरीत, हा काळ त्यांना प्रत्येक बाबतीत खूप फायदा देईल.