Power of Mantra: रात्री झोपण्यापूर्वी म्हणा 'हा' मंत्र; दुःख, कष्ट होईल दूर, मंत्राचा लाभ होईल पुरेपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 16:20 IST2026-02-24T16:19:44+5:302026-02-24T16:20:40+5:30

Power of Mantra: दिवसभराचा थकवा घालवणारा आणि देवावर भार सोपवून निश्चिंत मनाने विश्रांति देणारा मंत्र, त्याचा अर्थ जाणून घ्या आणि रोज झोपण्यापूर्वी म्हणा.

Power of Mantra: Say 'this' mantra before going to bed at night; sorrow and hardship will go away, the benefits of the mantra will be abundant! | Power of Mantra: रात्री झोपण्यापूर्वी म्हणा 'हा' मंत्र; दुःख, कष्ट होईल दूर, मंत्राचा लाभ होईल पुरेपूर!

Power of Mantra: रात्री झोपण्यापूर्वी म्हणा 'हा' मंत्र; दुःख, कष्ट होईल दूर, मंत्राचा लाभ होईल पुरेपूर!

दिवसभराच्या धावपळीनंतर आणि कामाच्या व्यापांनंतर रात्री जेव्हा आपण झोपायला जातो, तेव्हा आपले मन शांत असणे अत्यंत आवश्यक असते. शास्त्रात असे मानले जाते की, झोपण्यापूर्वी आपण ज्या विचारांचे किंवा मंत्रांचे चिंतन करतो, त्याचा आपल्या उपजत मनावर (Subconscious Mind) खोलवर परिणाम होतो. इथे आपण अशाच मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत, जो तुमच्या घराचे आणि आयुष्याचे सर्व संकटांपासून रक्षण करतो.

तो प्रभावी मंत्र खालीलप्रमाणे आहे:

"ओम सदा भवानी, दाहीने पुत्र गणेश ।
पाच देव रक्षा करे, ब्रह्मा विष्णू महेश ॥"

मंत्राचा सोपा अर्थ आणि महत्त्व:

हा मंत्र दिसायला साधा वाटत असला, तरी यामध्ये संपूर्ण विश्वाच्या संरक्षक शक्तींचे आवाहन केले गेले आहे:

१. ओम सदा भवानी: यामध्ये आपण आदिशक्ती माता भवानीला (दुर्गेला) वंदन करतो. देवी भवानी ही शक्ती आणि संरक्षणाची देवता आहे. तिचे स्मरण केल्याने भीती आणि नकारात्मकता नष्ट होते.

२. दाहीने पुत्र गणेश: कोणतेही कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी गणपती बाप्पा आपल्या उजव्या बाजूला (शुभ बाजूला) असावा, अशी ही प्रार्थना आहे. गणेश बुद्धी आणि अडथळे दूर करणारा देव आहे.

३. पाच देव रक्षा करे: या मंत्रात पाच प्रमुख देवतांकडे रक्षणाची याचना केली आहे. ते पाच देव म्हणजे— १. माता भवानी, २. भगवान गणेश, ३. ब्रह्मदेव, ४. भगवान विष्णू आणि ५. भगवान महेश (शिव).

४. ब्रह्मा विष्णू महेश: सृष्टीचा निर्माता (ब्रह्मा), पालनकर्ता (विष्णू) आणि संहारक (महेश) या तिघांची शक्ती जेव्हा एकवटते, तेव्हा माणसाचे कोणतेही दुःख किंवा संकट टिकू शकत नाही.

हा मंत्र म्हणण्याचे फायदे:

शांत झोप: हा मंत्र म्हणून झोपल्याने मनातील चिंता दूर होतात आणि शांत, गाढ झोप लागते.

नकारात्मकतेपासून मुक्ती: ज्यांना रात्री भीतीदायक स्वप्ने पडतात किंवा अस्वस्थ वाटते, त्यांच्यासाठी हा मंत्र एक संरक्षक कवच (Protection Shield) म्हणून काम करतो.

कष्ट आणि संकटांचे निवारण: घरातील संकटे दूर होतात आणि कामात येणारे अडथळे दूर होऊन यश मिळू लागते.

आध्यात्मिक बळ: रोजच्या पठणामुळे आत्मविश्वास वाढतो आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळते.

पठण करण्याची पद्धत:

रात्री झोपण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुवून, अंथरुणावर बसून शांत मनाने किमान ३, ११ किंवा २१ वेळा या मंत्राचा उच्चार करावा. मंत्र म्हणून झाल्यावर हात जोडून देवाचे आभार मानावेत आणि मग झोपावे.

Web Title : सोने से पहले इस मंत्र का जाप करें; दुख दूर, लाभ पाएं!

Web Summary : सोने से पहले 'ओम सदा भवानी' मंत्र का जाप करने से शांति मिलती है, नकारात्मकता दूर होती है, संकटों से रक्षा होती है और आध्यात्मिक शक्ति बढ़ती है। नियमित पाठ आत्मविश्वास और लचीलापन बढ़ाता है।

Web Title : Chant this mantra before sleep; remove sorrow, gain benefits!

Web Summary : Chanting the 'Om Sada Bhavani' mantra before sleeping brings peace, removes negativity, protects from troubles, and strengthens spiritual power. Regular recitation fosters confidence and resilience.