>> सुमेध रानडे, ज्योतिष आणि टॅरो कार्ड अभ्यासक
सध्या रात्रीच्या आकाशात दिसणाऱ्या एका ताऱ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तो कुठे बघायला मिळेल आणि कोणावर त्याचे शुभ परिणाम होतील, याबद्दल घेऊया.
सूर्यापेक्षा ४४ पट मोठा आणि तेजस्वी असा हा तारा आहे! याचे नाव आहे अल्डेबरन ! या ताऱ्यामुळे मिळणाऱ्या शुभ संकेताबद्दल जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत वाचा!
>> हा तारा सध्या रात्रभर आकाशात गुरू ग्रहाच्या जवळ दिसेल. गुरु आणि अल्डेबरन दोघेही मध्यरात्रीच्या आसपास बरोबर डोक्यावर असतील. सध्या गुरू ग्रह आकाशातील दुसरा सर्वात तेजस्वी बिंदू आहे. पहिला शुक्र आहे. पण शुक्र ग्रह सूर्यास्तानंतर सुमारे २ तासांनी मावळेल. त्यामुळे गुरू हा रात्रभर आकाशातील सर्वात तेजस्वी बिंदू राहील!
>> गुरू ग्रहाच्या अगदी जवळ दिसणारा दुसरा बिंदू म्हणजे हा "अल्डेबरन" तारा. तो त्याच्या सुंदर नारिंगी कांतीसाठी प्रसिद्ध आहे! हा तारा ओरिओन पट्ट्याच्या (मृग नक्षत्र) उजव्या बाजूने सरळ रेषेत येतो.
>>अल्डेबरन हा अत्यंत शुभ अशा रोहिणी नक्षत्राचा मुख्य तारा मानला जातो. या ताऱ्याला अनेकदा रोहिणी म्हणूनच ओळखलं जातं! या ताऱ्याच्या विशिष्ट कांतीमुळेच रोहिणीला सत्तावीस नक्षत्रात सर्वात सुंदर नक्षत्र मानलं जातं!
>> असं मानलं जातं की गुरू सारखा शुभ ग्रह, अल्डेबरन ताऱ्याच्या जवळ असताना विशिष्ट शुभ परिणाम देतात! सध्या गुरू अल्डेबरनच्या खूप जवळ आहे आणि पुढील काही दिवस असाच राहील, त्यामुळे या निमित्ताने काही शुभ घटना घडून येतील!
गुरू आणि अल्डेबरन या संयोगावर आधारित आणि इतर काही ग्रहस्थितींवरून, सर्वसामान्य भविष्य पुढीलप्रमाणे;
तुम्हाला पुढील दोन ते तीन आठवड्यांत एखादी शुभ घटना किंवा सकारात्मक बदल घडताना दिसू शकेल, जर...
>> तुमची राशी वृषभ, कन्या, मकर यांपैकी एक असेल.>> तुमची जन्म तारीख २४ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान असेल.>> तुमची जन्म तारीख २४ मे ते ७ जून दरम्यान असेल.>> तुमची जन्म तारीख २४ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान असेल.