नुकताच ८ सप्टेंबर रोजी पितृपक्ष(Pitru Paksha 2025) सुरु झाला आहे आणि २१ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावास्येला(Sarva Pitru Amavasya 2025) त्याची सांगता होणार आहे. या कालावधीत घराघरातून आपल्या पितरांप्रती ऋणनिर्देश म्हणून श्राद्धविधी आणि श्राद्धाचा स्वयंपाक केला जाईल. त्याबद्दल सविस्तर...
श्राद्धाच्या स्वयंपाकाला कोणी घास ठेवणे म्हणतात तर कोणी नैवेद्य ठेवणे म्हणतात. घास ठेवणे ही बोलीभाषा झाली तर, नैवेद्य ठेवणे ही शास्त्रोक्त भाषा. दोन्हीमागे भाव सारखाच. या नैवेद्याचे ताट वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यात असणारे जिन्नस पाहता, या स्वयंपाकाला आदर्श स्वयंपाक मानला जातो. नैवेद्याच्या या ताटाविषयी आणि त्याला जोडून येणाऱ्या प्रथांविषयी जाणून घेऊ.
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
श्राद्धाच्या दिवशी तयार करण्यात येणारा स्वयंपाक हा अतिआदर्श मानला जातो. वास्तविक असा स्वयंपाक वर्षभर केला जाणे आवश्यक असते. पण वर्षभर नाही तरी किमान श्राद्धादिवशी तरी आदर्श स्वयंपाक असावा, अशी किमान अपेक्षा असते. कारण त्यात हर तऱ्हेच्या रसांचा खाद्यपदार्थात समावेश असतो. हे सर्व रस आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असतात. परंतु एवढे पदार्थ रोज करायला आता कोणाकडे वेळ नाही, म्हणून वर्षातून एक दिवस तरी हा परिपूर्ण स्वयंपाक करावा.
श्राद्धदिनी डावा, उजवा, समोरील व मध्य अशा चारी भागातील पदार्थ सांगितले आहेत. त्यालाच आपण चौरस स्वयंपाक म्हणतो. एरव्ही आपण ताटात मीठ, लिंबू, चटणी वाढून सुरुवात करतो, परंतु श्राद्धाच्या पानात मीठ सर्वात शेवटी आणि लागणार असेल तरच वाढतात.
Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा
>> श्राद्धाचे जेवण ज्या पानावर वाढले जाते, त्याला तूप लावून मग त्यावर सगळे जिन्नस वाढले जातात. तूपामुळे सर्व रसांचे व्यवस्थित पाचन व्हावे हा त्यामागचा हेतू असतो.
>> एरव्ही वाढलेल्या ताटाचा नैवेद्य दाखवताना आपण उजवीकडून डावीकडे ताटाभोवती पाणी फिरवत नैवेद्य दाखवतो, परंतु श्राद्धाच्या पानाचा नैवेद्य दाखवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवून नैवेद्य दाखवला जातो. कारण, देवाला नैवेद्य दाखवताना किंवा आपल्या पानाचा नैवेद्य दाखवताना उजवीकडून डावीकडे पाणी फिरवल्याने ताटाच्या दक्षिण बाजूकडुन येणारे संकट अर्थात अन्नबाधा, विषबाधा यांसारखे प्रकार टळतात, याउलट पितर हे यमसदनाहून आले असल्यामुळे त्यांना त्या ताटाकडे आकर्षून घेण्यासाठी पूर्वेकडून दक्षिणेकडे म्हणजेच डावीकडुन उजवीकडे पाणी फिरवून पितरांना आमंत्रित केले जाते.
आता श्राद्धाच्या ताटात कोणते पदार्थ कसे आणि कुठे वाढले पाहिजेत, ते पाहू!
>> डावीकडे लिंबू, चटणी, कोशिंबीर, कोचकय, आमसुलाची चटणी हे पदार्थ असावेत.
>> समोर आमटी, कढी, पापड, कुरडई, भजी, उडदाचे वडे (माषवटक) हे पदार्थ असावेत.
>> मध्यभागी पोळी, पुरी, पक्वान्न, दूध, दहीसाखर हे पदार्थ असावेत.
>> अशा पानाचा नैवेद्य दाखवून कावळ्याचा अन्नाला स्पर्श झाला की मगच आपणही या सर्व रसांनी युक्त असलेल्या भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्त व्हावे, हा या श्राद्धाच्या स्वयंपाकाचा हेतू असतो.
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ