Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 12:35 IST2025-09-09T12:34:16+5:302025-09-09T12:35:25+5:30

Pitru Paksha 2025: १० सप्टेंबर रोजी संकष्टी आहे, अनेकांचा त्यादिवशी उपास असतो, अशा वेळी उपास आणि श्राद्ध विधीचा नैवेद्य यातून मार्ग कसा काढावा ते जाणून घ्या.

Pitru Paksha 2025: Should one offer Naivedya or not if Shraddha Tithi falls on a day of Sankashti or Upas? Read | Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा

Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा

यंदा ८ सप्टेंबर रोजी पितृपक्ष(Pitru Paksha 2025) सुरू झाला आहे आणि २१ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावास्येने(Sarva Pitru Amavasya 2025) त्याची सांगता होणार आहे. अशातच १० सप्टेंबर रोजी संकष्ट चतुर्थी आली आहे. पंधरा दिवसांचा हा काळ, त्यात अनेकांचे वारानुसारही उपास येऊ शकतात. अशा वेळी श्राद्ध विधी आणि स्वयंपाक यांचा सुवर्णमध्य कसा काढता येईल, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ. 

पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ

अनेक गोष्टींचा बारकाईने विचार केल्यावर लक्षात येते, की धर्म शास्त्रात प्रत्येक गोष्टीचे उत्तर सापडते. जसे की सध्या सुरू असणारा पितृपक्ष आणि त्या अंतर्गत येणारे उपास पाहता गृहीणींसमोर नैवेद्याचा प्रश्न उभा राहतो. जसे की काही वेळा योगायोगाने संकष्टी, प्रदोष, एकादशी अशा उपासाच्या दिवशी श्राद्धतिथी येते. त्यावेळी पितरांना नैवेद्य काय दाखवावा, ही अडचण निर्माण होते. यावर धर्मशास्त्राने दिलेला तोडगा प्रभावी ठरू शकतो. तो कोणता, हे जाणून घेऊ.

उपासाच्या दिवशी पितरांची श्राद्धतिथी आली असता सूर्योदयानंतर सुमारे सात तास ती तिथी असल्यामुळे व्रतदिनाच्या आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ती तिथी राहणार आहे का, हे पंचांगात किंवा दिनदर्शिकेवर दिलेल्या माहितीत पाहून घ्यावे. जाणकारांना विचारावे. 

Pitru Paksha 2025: पितृ पक्षात पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?

पंचांगानुसार उपासाच्या दिवशी श्राद्धतिथी येत नसेल तर प्रश्नच उद्भवत नाही. परंतु उपासाच्या दिवशी श्राद्धतिथी येत असेल व हस्तश्राद्ध करायचे असेल, तर ज्यांचा उपास नाही असे ज्येष्ठ ब्राह्मण भोजनासाठी निमंत्रित करावेत. उपास नाही, असे ब्राह्मण उपलब्ध नसतील, तर नातेवाईकांपैकी उपास नसलेल्या व्यक्तीला आणि तीदेखील उपलब्ध नसेल तर गरजू व्यक्तीला श्राद्धाचे अन्न अर्पण करावे आणि पितरांजवळ तशी अडचण व्यक्त करावी.

श्राद्धाचा नैवेद्य दाखवणाऱ्या व्यक्तीचा उपास असेल, जसे की संकष्टीचाएकादशीचा, गुरुवारचा उपास असेल, तर अशा व्यक्तीने प्रत्यक्ष भोजन न करता श्राद्धाचा नैवेद्य ब्राह्मणाला, गायीला, कावळ्याला आणि कुत्र्याला वाढून स्वत: मात्र ते अन्न केवळ हुंगावे. आणि सायंकाळी उपास सोडते समयी श्राद्धाच्या जेवणाचे अन्न नैवेद्य समजून भक्षण करावे. 

Pitru Paksha 2025:पितृपक्षात पितृ ऋण का फेडायचे आणि त्यामुळे कोणते लाभ होतात? वाचा!

काही संप्रदायानुसार एकादशीचे श्राद्ध दुसऱ्या दिवशी करण्याची प्रथा आहे. परंतु शास्त्रानुसार श्राद्धतिथी ओलांडू नये. श्राद्धाचे जेवण आपण पितरांसाठी करत असतो. म्हणून आपल्या उपासासाठी त्यांना उपाशी ठेवणे किंवा पर्यायी फराळी पदार्थांचा नैवेद्य दाखवणे उचित नाही, तसेच शास्त्राला धरून नाही. 

या गोष्टींची खबरदारी घेता, उपासाचा बाऊ न करता पितरांचे श्राद्ध वेळच्या वेळेस करावे आणि उपास सोडताना तो नैवेद्य आपण ग्रहण करावा, हे सयुक्तिक ठरते.

Web Title: Pitru Paksha 2025: Should one offer Naivedya or not if Shraddha Tithi falls on a day of Sankashti or Upas? Read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.