पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:10 IST2025-09-18T12:05:17+5:302025-09-18T12:10:03+5:30

Pitru Paksha 2025: दत्तगुरूंची उपासना मोक्षाची वाट दर्शवणारी आहे, या उपासनेने आपल्याला तर लाभ होईलच, शिवाय पितरांनाही मोक्ष मिळण्यास मदत होईल. 

Pitru Paksha 2025: On Thursday in Pitru Paksha, recite these 12 names of Datta Guru; your ancestors will get liberation, you will get satisfaction. | पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 

पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 

येत्या रविवारी २१ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या(Sarva Pitru Amavasya 2025) आहे. त्यादिवशी या वर्षातील शेवटचे श्राद्धविधी करता येतील. श्राद्धविधी आपण करतो ते पितरांचा मरणोत्तर प्रवास सुखरूप व्हावा म्हणून! दत्त उपासनेत एवढे सामर्थ्य आहे, की दत्त नामःस्मरणाने मोक्षाची वाट खुली होते. प्रपंचाची ओढ कमी होते. विषयांचे सुख कमी होऊन अध्यात्मात गती मिळू लागते. त्यामुळे प्रपंचात राहून दत्त उपासना जरूर करावी. जेणेकरून आपल्याला मोहमायेत मन अडकवून न ठेवता ईश्वर चरणी ते गुंतवता येईल. 

पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा

दत्तगुरूंच्या या १२ नावांच्या उपासनेने संसार सुखही मिळते. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतात, होतात, संतान सुख मिळते, लक्ष्मीप्राप्ती होते, सुख संपत्ती मिळते, थोडक्यात ज्याची जशी इच्छा असेल त्याला ते मिळते. ज्याला अध्यात्मिक उन्नती हवी आहे, तीसुद्धा या नामावलीतून मिळते. आपण आपल्यासाठी नेहमी काही ना काही मागतोच, सध्या पितृपक्ष(Pitru Paksha 2025) सुरु आहे म्हणून गुरुवारचे निमित्त साधून आपल्या पितरांना मोक्ष मिळावा अशी प्रार्थना देखील या उपासनेतून करता येईल. 

Surya Grahan 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!

स्तोत्र छोटे आहे आणि उच्चार करण्यास सोपे आहे. यासाठी सायंकाळी हात पाय धुवून देवापाशी दिवा लावावा. स्तोत्र म्हणावे. पितरांसाठी प्रार्थना करावी आणि 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या दत्त मंत्राचा १०८ वेळा जप करावा. सदर स्तोत्र रोजच्या उपासनेत समाविष्ट केल्यास अधिक लाभ होतो. 

|| श्री दत्त व्दादश नाम स्तोत्रं ||

|| श्री गणेशाय नमः श्री दत्त व्दादश नाम स्तोत्र मंत्रस्य ||
|| परमहंस ऋषिः । श्रीदत्तात्रेय परमात्मा देवता । अनुष्टुप छंदः||
|| सकलकामना सिद्धयर्थे । जपे विनियोगः||
|| प्रथमस्तु महायोगी । व्दितीय प्रभुरीश्वरः । तृतियश्च त्रिमूर्तिश्च ||
|| चतुर्थो ज्ञानसागरः । पंचमो ज्ञान विज्ञानं । षष्ठस्यात सर्व मंगलं ||
|| सप्तमः पुंडरिकाक्षो । अष्टमो देववल्लभः । नवमो नंददेवेशो ||
|| दशमो नंददायकः । एकादशो महारूद्रो । व्दादशो करुणाकरः ||
|| एतानि व्दादशनामानि दत्तात्रेय महात्मनः||
|| मंत्रराजेति विख्यातं दत्तात्रेय हरः परः ||
|| क्षयोपस्मार कुष्ठादि । तापज्वर निवारणं ||
|| राजव्दारे पथे घोरे संग्रामेषु जलांतरे ||
|| गिरेर्गृहांतरेरण्ये । व्याघ्रचोर भायादिषु ।
|| आवर्तन सहस्त्रेषु लभते विद्यां । रोगी रोगांत प्रमुच्यते ||
|| अपुत्रो लभते पुत्रं । दरिद्री लभते धनं ||
|| अभार्यो लभते भार्यां । सुखार्ती लभते सुखं ||
|| मुच्यते सर्व पापेभ्यो । सर्वदा विजयी भवेत ||
|| इति श्रीमद दत्तात्रेय व्दादश नाम स्तोत्रं संपूर्णम ||
|| श्रीगुरू दत्तार्पणमस्तु ||

Web Title: Pitru Paksha 2025: On Thursday in Pitru Paksha, recite these 12 names of Datta Guru; your ancestors will get liberation, you will get satisfaction.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.