पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 18:44 IST2025-09-09T18:39:05+5:302025-09-09T18:44:01+5:30
Pitru Paksha 2025: ज्यांना गणेशोत्सवात सुतक, सोहेर आले, ते पितृपक्षाच्या संकष्टीला करतात गणेशस्थापना; त्याची पूजापद्धती, नैवेद्य, विसर्जन याबाबत सविस्तर जाणून घ्या.

पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
गणेशोत्सव हा आनंदसोहळा आहे. अनेकांच्या घरी दीड, पाच, सात, दहा दिवसांसाठी गणपतीचे पूजन केले जाते आणि ठरलेल्या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जनही केले जाते. परंतु सोहेर-सुतकाचे प्रसंग सांगून ओढावत नाहीत. आजही आपण त्यासंबंधीत शास्त्र पाळतो आणि तेवढे दिवस देवपूजा टाळतो. परंतु आपणहून गणपती बाप्पाला आपल्या घरी बोलावले असताना, सोहेरसुतकाचा प्रसंग आला, तर विसर्जन कसे आणि कधी करावे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. याबाबत 'शास्त्र असे सांगते' या ग्रंथात माहिती दिली आहे, ती आपण गणेशोत्सवात जाणून घेतलीत. त्याबरोबरच आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती वाचनात आली ती साखर चौथीच्या गणपतीची!
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
नाव ऐकताच कुतूहल वाटतं ना? अनंत चतुर्थीनंतर येणाऱ्या संकष्टीला साखर चौथ म्हणतात. म्हणजेच १० सप्टेंबर २०२५ रोजी येणारी पितृपक्षातीलसंकष्ट चतुर्थी(Pitru Paksha Sankashti Chaturthi 2025) ही साखर चौथ म्हणून ओळखली जाईल.
याच दिवशी बसवले जाणारे गणपती म्हणजे साखर चौथीचे गणपती! हो! ज्यांना काही अडी-अडचणीमुळे गणेशोत्सवात गणपती आणणे शक्य झाले नाही ते लोक या चतुर्थीला गणेश मूर्ती घरी आणून तिची स्थापना करतात. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा
>> साखर चौथेचे गणपती दीड, पाच, अकरा किंवा एकवीस दिवस बसवले जातात.
>> विशेष म्हणजे या गणपतींची आरती चंद्रदर्शनानंतरच केली जाते.
>> जे लोकांना भाद्रपदात गणेशोत्सवात गणपती बसवता येत नाहीत मूर्तिकाराना वेळ मिळत नाही किव्हा ज्यांच्या घरी सोयर-सुतक असतं किंवा नवस पूर्ण करणारे त्यांच्या घरी हे बाप्पा बसवले जातात.
>> आरती परातीत केली जाते आणि नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक अर्पण केले जातात.
>> पण खासियत अशी की या दिवशी मोदक गूळ-खोबर्याचे नसून खोबरं आणि साखर घालून केले जातात. हाच खरा साखर चौथीचा प्रसाद.
टीप : सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल