Palmistry: तुम्ही किती वर्षं जगणार? हे हस्तरेषा बघून लगेच कळणार; जाणून घ्या तुमचे भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:56 IST2025-02-27T13:56:16+5:302025-02-27T13:56:53+5:30
Palmistry: हस्तरेषा पाहून आपल्याला आपल्या भविष्याचा ढोबळ अंदाज बांधता येतो तर सखोल अभ्यासाने भविष्यही जाणून घेता येते.

Palmistry: तुम्ही किती वर्षं जगणार? हे हस्तरेषा बघून लगेच कळणार; जाणून घ्या तुमचे भविष्य!
आपण किती वर्ष जगणार याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असते. हस्तरेषा पाहून आपले आयुर्मान कळते. अर्थात त्याचा अभ्यास अतिशय खोल आहे. पण वरवर पाहता ढोबळ अंदाज नक्कीच घेता येऊ शकतो. तो कसा घ्यायचा, ते पाहू.
तळहातातील जीवनरेषा तुमच्या आयुष्याबद्दल महत्त्वाची माहिती देते. तर्जनी आणि अंगठ्यापासून सुरू होणारी आणि मनगटावर समाप्त होणारी तळहाताची रेषा ही जीवनरेषा म्हणून ओळखली जाते. त्यावरून आपले आयुर्मान किती असू शकेल याचा अंदाज घेता येतो.
प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य हवे असते. अशातच सर्व सुख-सुविधा मिळाल्यानंतर त्या उपभोगुनच हे जग सोडले पाहिजे, अशी आपली मानसिकता असते. हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या लोकांच्या तळहातावर दीर्घ आयुष्य रेषा असते, ते लोक केवळ दीर्घकाळ जगत नाहीत तर जीवनातही प्रगती करतात. चला तर मग जाणून घेऊया हस्तरेषा शास्त्रानुसार तुमच्या तळहातावर जीवन रेषा कुठे आहे आणि त्याचा अर्थ काय आहे.
तळहातामध्ये जीवन रेषा कोणती?
तळहातातील जीवनरेषा तर्जनीपासून सुरु होते ती अंगठ्यापासून मनगटापर्यंत पोहोचते. तिलाच जीवन रेषा आणि इंग्रजीत लाईफ लाईन म्हणतात. ही रेषा व्यक्तीचे आरोग्य आणि आयुष्य याबद्दल भाकीत दर्शवते. ठळक आणि स्पष्ट रेषा हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. या रेषेवरील त्रिकोणाचे चिन्ह शुभ मानले जाते. हा त्रिकोण तळहातावरील अंगठ्याच्या खालच्या भागावर असूशकतो. तो असेल तर उत्तम आयुरारोग्य लाभते.
तुटलेली जीवनरेषा
जर तुमच्या तळहातावरची जीवनरेषा तुटली असेल तर याचा अर्थ तुम्हाला दीर्घ आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आयुष्यात कोणत्या ना कोणत्या आजाराचे शिकार होऊ शकता. आरोग्याच्या समस्या उद्भवतात, अपघाताचे प्रसंग येतात. यापासून बचाव झाला तर साधारण सत्तरी सहज पार करू शकता.
ठळक आणि स्पष्ट जीवन रेषेचा अर्थ
जर तळहातावरच्या रेषा ठळक आणि स्पष्ट असेल तर असे लोक आनंदी आणि यशस्वी जीवन जगतात. आरोग्याच्या तक्रारी फारशा येत नाहीत. यशप्राप्तीसाठी फार धडपड करावी लागत नाही. ही जीवन रेषा त्यांच्यासाठी भाग्यरेषाही ठरते.
दोन भागांमध्ये विभागलेल्या जीवनरेषेचा अर्थ
जर एखाद्या व्यक्तीची जीवनरेषा दोन भागात विभागली गेली असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती मृत्यूच्या दारात जाऊन परत येते. आयुष्यात आजाराचे, अपघाताचे असे प्रसंग येतात की मृत्यूशी गाठभेट होते पण मरण न येता जणू काही पुनर्जन्म मिळतो आणि दुसरे बोनस आयुष्य सुरु होते. मनगटाजवळच्या शेवटच्या भागात जीवनरेषा दुभंगली असेल तर असे लोक त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी घरापासून दूर असतात.