नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 11:16 IST2025-10-31T11:14:19+5:302025-10-31T11:16:54+5:30
November Born Astro: दिवस, वार, तिथी, नक्षत्र याप्रमाणेच आपण कोणत्या महिन्यात जन्माला आलो, त्याचा प्रभाव व्यक्तिमत्त्वावर पडतो; नोव्हेंबरकरांच्या बाबतीत तपासून पाहा.

नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
वर्षातला 'कूल' अर्थात थंडीचा महिना, नोव्हेंबर! या महिन्यात दिवाळी, देवदिवाळी डोकावते, प्रबोधिनी एकादशी असते आणि काहीच नाही तर तुळशी विवाहामुळे मंगलकार्याला सुरुवात झालेली असते. त्यामुळे या महिन्यात जन्माला आलेल्या लोकांचा वाढदिवस म्हणजे सेलिब्रेशनचा माहोल असतो. पण यांचे व्यक्तिमत्त्व कसे असते? ते ज्योतिष शास्त्राच्या मदतीने जाणून घेऊ.
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या (November Born people Astrology) व्यक्तींची ओळख एका वाक्यात सांगायची, तर ज्योतिषशास्त्र सांगते की या व्यक्ती जगात सर्वांचे भले करण्यासाठी जन्माला आलेल्या असतात. जर तुमचा वाढदिवस नोव्हेंबर मध्ये असेल किंवा तुमच्या कुटुंबातील आवडत्या व्यक्तीचा किंवा मित्र मैत्रिणीचा वाढदिवस या महिन्यात असेल तर तुम्हाला त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, बरोबर ना? तर हा घ्या नोव्हेंबर मधील व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय...
तुम्ही सर्वांमध्ये एकोपा आणण्याचे काम उत्तम प्रकारे करता. तुमच्या मित्रांना जुळवून घेणे ही अनेकदा तुमची जबाबदारी असते. जरी जग तुम्हाला खूप शांत आणि सौम्य स्वरुपात ओळखत आहे, परंतु ज्याने तुमचा राग पाहिला आहे त्याला माहित आहे की तुमच्यात किती ज्वालामुखी सुप्त स्वरूपात दडलेला आहे. मात्र या स्वभावामुळे तुम्ही कमी वयात रक्तदाबासारख्या आजारांना बळी पडू शकता. तुमच्या चेहऱ्यावर निरागस भाव असल्यामुळे तुमचे खोटे बोलणे ही समोरच्याला सहज खरे वाटू शकते. मात्र त्याचा गैरफायदा घेऊ नका. आरोग्याची विशेषतः केसांची काळजी घ्या. अन्यथा वाढत्या वयाआधीच टक्कल पडू लागेल.
नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या तरुणांमध्ये प्रेमाचा अमर्याद सागर असतो.तुम्ही उत्तम जीवनसाथी असता. तुम्हाला तुमची प्रिय व्यक्ती मिळाली नाही तरी तुम्ही तिला मिळवण्याचा अट्टहास करणार नाही, वा तिला विसरू शकणार नाही. आणि मिळाली तर तिच्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व अर्पण करता. तुम्ही आपले जीवन दुसऱ्याच्या सुखासाठी खर्च करता. परंतु तेवढे प्रेम तुम्हाला न मिळाल्याने तुम्ही अस्वस्थ राहता.
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
करिअर बाबतीत तुम्ही संवेदनशील लेखक, पोलीस, पत्रकार, कलाकार, सर्जन किंवा गुप्तचर विभागातील काम चांगल्या प्रकारे सांभाळू शकता. भावनांवर थोडा आवर घातलात आणि रागावर नियंत्रण मिळवले तर तुम्ही तुमच्या क्षेत्राचे शिखर गाठू शकाल. तुमच्या ठायी असलेल्या अतुलनीय सहनशक्तीमुळे, तुम्ही जीवनाची प्रत्येक लढाई जिंकू शकता. तुमच्या सौम्य स्वभावाचा इतरांना गैरफायदा घेऊ देऊ नका. सत्य आणि प्रामाणिकपणा ही तुमची ताकद आहे, त्याचा वापर करा.
या महिन्यात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती - झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, चाचा नेहरू, सी.व्ही. रमण, कमल हसन, ऐश्वर्या राय, विराट कोहली, तब्बू, सानिया मिर्झा, नीता अंबानी ई.
Palmistry: एकापेक्षा जास्त लग्न, विवाहबाह्य संबंधं, उशिरा लग्न या सगळ्याचे गूढ 'या' हस्तरेषेमध्ये!