शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जर टॅरिफ लावला नसता, तर भारताने कधीच..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टॅरिफची 'वकिली'
2
"एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर...", श्रीकांत शिंदे आरक्षणाच्या निर्णयावर काय बोलले?
3
"आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार
4
ट्रम्प यांना मोठा झटका! जगाला टॅरिफची धमकी देणारा अमेरिका स्वतः मंदीच्या उंबरठ्यावर; मूडीजचा इशारा
5
नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
6
बांदेकरांच्या घरी बाप्पाची आरती, भावी सूनबाई पूजा बिरारीचीही दिसली झलक; प्रेक्षक म्हणाले...
7
मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना स्वामींचे स्मरण करता की नाही? ‘असा’ आहे कालातीत ऋणानुबंध
8
Mark Mobius Prediction: चीनची बाजी, परंतु भारतच खरा 'किंग'; 'या' दिग्गजाला आपल्यावर इतका का भरवसा?
9
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना कोणी सांगितले? काय लाभ झाला?
10
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
11
वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले
12
झोमॅटोचा झटका! सणासुदीत प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ; आता प्रत्येक ऑर्डरवर इतके रुपये मोजावे लागणार
13
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
14
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
15
७० वर्षांच्या झाल्या नीना कुलकर्णी, अजूनही दिसतात तितक्याच सुंदर, खास पद्धतीने सेलिब्रेट केला बर्थडे
16
नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?
17
नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..."
18
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
19
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
20
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील

केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 09:41 IST

Ganapati Atharvashirsha: गणपती बाप्पाशी संबंधित अनेक स्तोत्रे, मंत्र आहेत. परंतु, हे स्तोत्र केवळ प्रभावी नाही, तर सर्वोच्च, सर्वोत्तम मानले गेले आहे. जाणून घ्या...

Ganapati Atharvashirsha: बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेला प्रथमेश गणपती समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा समाजाच्या सर्व थरांना, सर्वांना आदर्श वाटणारा असा देव. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते. कोट्यवधी घरांमध्ये दररोज गणपती पूजला जातो. प्रत्येक महिन्यातील दोन चतुर्थ्या गणेश सेवेचा पर्वणी काळ, तर गणेशोत्सव सर्वोच्च आनंदाचा, चैतन्याचा आणि असीम उत्साहाचा कालावधी. 

मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. चतुर्थी तिथी श्रीगणेशाची अत्यंत प्रिय तिथी आहे. चतुर्थी म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांपलीकडील तुरीया अवस्था होय. तेच जीविताचे परमाध्य, असे मानले जाते.

गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणेशोत्सवात काही स्तोत्रे आवर्जून म्हटली जातात. गणपतीच्या अनेक स्तोत्रांपैकी एक म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. याची गणेशोत्सवात अनेक ठिकाणी आवर्तने केली जातात. परंतु, केवळ विनायक चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, गणेशाचे जन्मोत्सव किंवा गणपती गणेशोत्सवापुरते नाही, तर नियमित कायम हे स्तोत्र म्हणणे अतिशय शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे. 

गणपती अथर्वशीर्ष नेमके काय आहे?

अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. यामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे. गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो. यात प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय, असे म्हटले आहे.

गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला, तरी "गं" हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून, तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे. यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे. या उपनिषदाचे एक हजार वेळा पठन केल्याने जे हवे ते प्राप्त होईल, असे म्हटले आहे. गणपती अथर्वशीर्ष अत्यंत प्रभावी मानले गेले असले तरी ते म्हणताना काही नियम अवश्य पाळावेत, असे सांगितले जाते.

अथर्वशीर्ष म्हणताना कोणते नियम नक्कीच पाळावेत?

- अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे.

- अथर्वशीर्षाचा पाठ करताना धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा.

- अथर्वशीर्षाचा पाठ म्हणताना मांडी पालटावी लागू नये, याची काळजी घ्यावी.

- दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.

- अथर्वशीर्ष पाठ म्हणण्यापूर्वी वडिलधार्‍यांना तसेच गुरुंना नमस्कार करावा.

- अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी आणि तांबडे फूल व्हावे.

- पूजा करणे शक्य नसल्यास गणपतीचे मनोभावे ध्यान करावे, नमस्कार करावा.

- अथर्वशीर्ष पठण भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे.

- अथर्वशीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांतीमंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा.

- उच्चार अगदी स्पष्ट असावे.

- अथर्वशीर्ष अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.

- अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.

- जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे अथर्वशीर्ष म्हणावयाचे असेल, तेव्हा 'वरदमूर्तये नमः।' येथेपर्यंतच म्हणावे. त्यापुढे फलश्रुती देण्यात आली असून, ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी.

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2025Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीganpatiगणपती 2025Ganpati Festivalगणपती उत्सव २०२५Ganeshotsavगणेशोत्सवchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक