नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 14:06 IST2025-09-24T14:04:13+5:302025-09-24T14:06:29+5:30

Ashwin Vinayak Chaturthi September 2025: गणपतीच्या अनेक स्तोत्रांपैकी हे एक प्रभावी स्तोत्र मानले जाते. विनायक चतुर्थीला आवर्जून या स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे, असे म्हटले जाते.

navratri ashwin vinayak chaturthi september 2025 chant ganesha pancharatnam stotram in 5 minutes and get eternal blessings | नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!

नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!

Ashwin Vinayak Chaturthi September 2025: नवरात्रोत्सव सुरू आहे. गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी विनायक चतुर्थी आहे. गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते. नवदुर्गांसह गणेशाची कृपा लाभण्याची संधी यानिमित्ताने प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. विनायक चतुर्थीचे व्रत जमले नाही, तरी सकाळी थोडा वेळ गणपतीसाठी काढावा. दुर्वांची जुडी, जास्वंदाचे फूल, गणपतीला आवडणाऱ्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. 

या दिवशी अथर्वशीर्ष आवर्जून म्हणावे, असे म्हटले जाते. परंतु, अथर्वशीर्ष येत नसेल किंवा पठण-श्रवण शक्य नसेल, तर अगदी पाच मिनिटांत होणारे गणपतीचे एक प्रभावी स्तोत्र नक्की म्हणावे, असे म्हटले जाते. आदि शं‍कराचार्यांनी या स्तोत्राची रचना केल्याचे सांगितले जाते. अर्थ समजून हे स्तोत्र म्हटल्यास याचे महात्म्य लक्षात येते. या स्तोत्राचे नाव आहे, गणेश पंचरत्न स्तोत्र. हे स्तोत्र म्हटल्यास निरामय, निर्दोष, साधनेने युक्त आणि अष्टसिद्धी प्राप्त होतात. जीवनात शांती, सुख, आणि भौतिक समृद्धी येते. हे स्तोत्र बुद्धी आणि ज्ञानाचा दाता असलेल्या गणपतीच्या गुणांचे वर्णन करते, ज्यामुळे उच्च फायदे मिळतात, असे म्हटले जाते. 

आदि शंकराचार्यांनी रचलेल्या या श्री गणेशाच्या स्तुतीपर स्तोत्रात पाच श्लोक आहेत. सहावा फलश्रुतीचा आहे. यातील श्लोकांचे /चरणांचे विविध अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावलेले दिसतात. गणपतीच्या हातात मोदक असतो व तो त्याला खूप आवडतो. त्याचे स्वतःचे स्वरूप आनंदमय असून तो इतरांच्या जीवनात मोद (हर्ष) निर्माण करतो म्हणून त्याने मोदक हातात घेतला आहे. गणपतीच्या संदर्भात गज हा शब्द नेहेमी येतो. काही अभ्यासकांनी ‘गज’ हा ‘जग’ च्या उलटा आहे, म्हणून सगुण साकार ‘जगा’च्या विपरीत ‘गज’ निर्गुण निराकार असे मानून गजेश्वर म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म असा अर्थ घेतला आहे. वैश्विक पातळीवर सर्व देवी देवतांना ईश्वर महेश्वरांना गण म्हणतात. त्या सर्वांवर गणेशाचा अधिकार चालत असल्याने त्याला गणेश्वर असे नाव आहे.

गणेश पंचरत्नम् सोत्र

मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकम् । 
कलाधरावतंसकं विलासि लोकरक्षकम् । 
अनायकैक नायकं विनाशितेभदैत्यकम् । 
नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् ।।१।।

नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरम् । 
नमत्सुरारि निर्जरं नताधिकापदुद्धरम् ।
सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं । 
महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् ।।२।।

समस्तलोकशंकरं निरस्तदैत्यकुञ्जरम्। 
दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम्।
कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करम् । 
मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम्।।३।।

अकिंचनार्तिमार्जनं चिरन्तनोक्ति भाजनम् । 
पुरारिपूर्व नन्दनं सुरारि गर्वचर्वणम्।
प्रपंच नाशभीषणं धनंजयादि भूषणम्। 
कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् ।।४।।

नितान्तकान्तदन्तकान्ति - मन्तकान्तकात्मजम् । 
अचिन्त्य - रुपमन्तहीन - मन्तरायकृन्तनम्।
ह्रदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनाम्। 
तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम्।।५।।

फलश्रुति

महागणेश पंचरत्नम् आदरेण योन्वहम्। 
प्रजल्पति प्रभातके ह्रदि स्मरन् गणेश्वरम्।
अरोगितामदोषतां सुसाहितीं सुपुत्रताम्। 
समाहितायु - रष्टभूतिमभ्युपैति सोSचिरात्।।

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

Web Title: navratri ashwin vinayak chaturthi september 2025 chant ganesha pancharatnam stotram in 5 minutes and get eternal blessings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.