शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 14:01 IST

Navratri 2025: नवरात्रीत देवी उपासक विविध पद्धतीने देवीची उपासना करतात, त्याचाच एक भाग म्हणून या ग्रंथांचे पठण का केले जाते तेही जाणून घ्या.

देवीची उपासना कराची इच्छा तर आहे, पण मार्ग कोणता निवडावा हा प्रश्न पडत असेल तर हा परांपरिक उपासनेचा पर्याय निवडता येईल. तो म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथांच्या वाचनाचा. तुम्ही म्हणाल, एवढा आमच्याकडे वेळ कुठे? पण या ग्रंथ वाचनाचे लाभ वाचले तर तुम्ही वेळ काढून ही उपासना नक्कीच कराल. 

आज घटस्थापना आणि नवरात्र (Navratri 2025) उत्सवाचा प्रारंभ! या नऊ दिवसात देवीची विविध प्रकारे उपासना केली जाते. त्या उपासनेचा एक भाग म्हणून दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन केले जाते. या ग्रंथवाचनाचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि तो कशासाठी वाचावा ते जाणून घ्या. 

Happy Navratri 2025 Wishes: नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!

देवी उपासनेला फार मोठी परंपरा असून ती प्राचीन काळापासून केली जाते. तिची आराधना तिला शक्तीचे स्वरूप मानूनच केली जाते. भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर विविध स्वरूपात तिची उपासना मनोभावे केली जाते. भारतीय संस्कृतीत देवीचे स्थान अनन्यसाधारण असून तिला माता मानले जाते. दुर्गा देवीच्या संदर्भातला एकमेव प्रमाण ग्रंथ म्हणून `दुर्गा सप्तशती'ची सर्वदूर ख्याती आहे. इतकेच नव्हे, तर तो स्त्री शक्तीचे स्वरूप उलगडून सांगणारा अद्वितीयय ग्रंथ आहे. यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. सर्व पुराणात 'मार्कंडेय पुराण' प्राचीन मानले जाते व 'दुर्गा सप्तशती' त्यातील अंश आहे. देवी नित्यरूपा असून तिने सर्व जग व्यापले आहे. ती विविध प्रसंगात विविध रूपात विश्वात प्रगट होते. 

'दुर्गा सप्तशती'चे दुसरे नाव 'देवी महात्म्य'. याचे १३ अध्याय असून त्यात देवी महिषासुरमर्दिनीच्या रूपात प्रकटली असून तिने सर्वसामान्यांना `त्राहि भगवान' करून सोडणाऱ्या  दुष्ट व क्रूर राक्षसंशी तुंबळ युद्ध करून त्यांचा नि:पात कसा केला, याचे रसाळ भाषेत वर्णन केले आहे. मुळात या ग्रंथात ५६८ श्लोकच होते, परंतु वेळोवेळी त्यात भर पडत गेली आणि शेवटी त्याची संख्या ७०० झाली. म्हणूनच हा ग्रंथ कालांतराने 'दुर्गा सप्तशती' म्हणून ओळखला जाऊ लागला.

Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा

या दुर्गा देवीची उपासना 'बाह्य' आणि 'अभ्यंतर' अशा दोन प्रकारे केली जाते. पैकी बाह्य उपासनेचे दोन भाग आहेत. ते असे-'वैदिक' आणि 'तांत्रिक'. वैदिक पूजेत यज्ञ, तप, भक्ती, ज्ञान तसेच योगा व्यतिरिक्त मूर्तिपूजाही समाविष्ट केली आहे. तांत्रिक साधनेत देवीपूजेत तांत्रिक सर्वार्थाने देवीशी एकरूप होतो, असे म्हणतात. 

महिषासुराला तमोगुणयुक्त मानवी मनाचे प्रतीक मानून 'मार्कंडेय पुराणा'त प्रस्तुत केले आहे. परंतु `देवी भागवता'त त्याला देवीवरील प्रेमाने उन्मत्त किंवा आंधळा दाखवला आहे. 'दुर्गा सप्तशती' दैत्यांच्या केवळ संहाराची शौर्यगाथा नसून कर्म, भक्ती व ज्ञानाची त्रिवेणी असून ती भक्ताचे सर्व मनोरथ पूर्ण करते. या ग्रंथाच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या पारायणामुळे पारायणकर्त्याच्या  सर्व इच्छा पूर्ण होतात, त्यात तिळमात्रही शंका नाही. 

Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?

'दुर्गा सप्तशती' म्हणजे अस्य सिद्धमंत्रांचा अतुलनीय संग्रह असून त्याचा विधीवत केलेला पाठ पठण कर्त्यांची कुंडलिनी जागृत होण्यास सहाय्यभूत होतो. इतकेच नव्हे, तर नवरात्रात नवदुर्गांच्या उपासना व आरधनेमुळे षट्चक्रापैकी संबंधित चक्र जागृत होते, हे निर्विवाद! याशिवाय काही सिद्धीही प्राप्त होते. सीतेच्या वियोगामुळे दु:खी झालेल्या श्रीरामांनी नवरात्रात विधिवत 'सप्तशती' पाठ केल्याचा रामायणात उल्लेख आढळतो. परिणामी भगवतीच्या कृपेने सीता श्रीरामांना परत मिळाली. इतकेच नव्हे, तर लंकेवर मिळवलेला विजयही तिच्याच कृपेने प्राप्त झाला.

भगवान शंकर एकदा पार्वती मातेला म्हणाले, 'पार्वती शक्तीशिवाय मी शिव, शवाप्रमाणे समाान असून, जेव्हा मी शक्तीयुक्त असतो, तेव्हा मी भक्ताची कुठलीही इच्छा तत्काळ पूर्ण करतो. कच अर्गला कीलक, प्राधनिक रहस्य. वैकृत रहस्य, मूर्ती रहस्य ही सप्तशतीची षडांगे असून त्याच्या क्रमात मतभेद असले, तरी सप्तशतीच्या विधिवत पाठांमुळे संबंधिताला अपेक्षित असलेले  फळ यशावकाश मिळतेच मिळते. 

काय मग? तुम्ही पण या उपासनेसाठी काढताय न वेळ??

Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!

टॅग्स :Navratriनवरात्रीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीNavratri Mahotsav 2025शारदीय नवरात्रोत्सव २०२५