शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 15:44 IST

Navratri 2025: नवरात्रीत उपासनेचा एक भाग म्हणून काही जण अनवाणी अर्थात चप्पल न घालता चालतात, याला श्रद्धा म्हणावी की त्यामागे कारण असेल आणखी काही?

नवरात्रीत आपल्याला  नवरंगच नाही तर भाविकांचे नवढंग सुद्धा अनुभवता येतात. ज्याची जशी श्रद्धा तशी त्याची उपासना. कोणाला कोणत्या उपासनेतून आनंद मिळेल हे सांगता येत नाही. अशीच एक उपासना असते अनवाणी चालण्याची....ही प्रथा कशी आणि कधीपासून सुरू झाली त्याबद्दल जाणून घेऊ. 

Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा

आजपासून शारदीय नवरात्र सुरू झाली आहे. उपासनेचा एक भाग म्हणून अनेक जण नवरात्रीत अनवाणी चालताना दिसतात. त्यामागे नेमका काय भाव असावा आणि त्याचे फायदे तोटे काय? शिवाय शास्त्रीय आधार काय तेही जाणून घेऊया. 

अनवाणी चालण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. कोणत्याही धार्मिक स्थळी जाताना आपण चपला बाहेर काढून ठेवतो. चपलेबरोबर मनाला चिकटलेले विकारही मंदिराच्या पायरीशी ठेवून मंदिरात प्रवेश करणे, हा त्यामागचा मुख्य हेतू असतो. शिवाय, आपल्यामुळे स्वच्छ परिसर घाण होऊ नये, ही देखील सद्भावना असते. तसेच, तिथल्या वातावरणाशी समरस होताना अनवाणी चालल्याचा खूप फायदा होतो. 

Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?

आपल्या पायाचे तळवे अतिशय संवेदनशील असतात. संपूर्ण देहाचे अ‍ॅक्युपंक्चर पॉईंटस पायाच्या तळव्यात असतात. अनवाणी चालल्यामुळे जमिनीची विद्युत शक्ती पायाच्या तळव्यातून शरीरात शिरकाव करते. रक्त संक्रमण सुधारते. अनेक प्रकारच्या आजारातून सुटका होते. उच्च रक्तदाब कमी होतो. तणाव दूर होतो. डोकेदुखी कमी होते. उत्साह वाढतो. हृदयविकाराची शक्यता कमी होते. वजन नियंत्रणात राहते आणि हाडे मजबूत होतात. म्हणून डॉक्टरदेखील आपल्या रुग्णांना रोज पंधरा मिनीटे बागेत, मैदानी परिसरात अनवाणी चालण्याचा सल्ला देतात. त्यामुळे केवळ नवरात्रीतच नाही, तर दररोज दिवसातील काही वेळ तरी अनवाणी चालणे हितावह ठरते. 

...मग नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कधी सुरू झाली?

ही प्रथा नेमकी कधी सुरू झाली ते माहित नाही, मात्र कशी सुरू झाली असेल, हा तर्क आपण नक्कीच लावू शकतो. नवरात्रीत आपण घटस्थापना करतो. घटाभोवती मातीचा ओटा तयार करून त्यात धान्याची रुजवण घालतो. एकार्थी मातीच्या आणि पर्यायाने निसर्गाच्या संपर्कात येतो. मातीशी नाळ जोडली जावी आणि मातीशी आपला ऋणानुबंध कायम राहावा, या हेतून भाविक नवरात्रीत वहाणा घालत नाहीत. 

Happy Navratri 2025 Wishes: नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!

नवरात्रीत नऊ दिवस भाविक, कांदा-लसूण खात नाहीत, मांसाहार करत नाहीत, एकभुक्त राहतात, फलाहार करतात. या गोष्टी शारीरिकदृष्ट्या फायदेशीर असतातच, शिवाय भावनिकदृष्ट्या देखील त्यागाचे महत्त्व शिकवतात. अनवाणी चालण्याचा पर्यायही त्याचाच एक भाग. स्वत:च्या शरीराला थोडेफार कष्ट देऊन ईश्वरी चिंतन मनात ठेवणे, हा त्यामागचा मूळ विचार आहे. 

उत्सव हे चांगल्या कार्याची सुरुवात करण्याचे निमित्त असते. त्या मुहूर्तावर चांगल्या सवयी लावून घ्याव्या, चांगल्या कार्याचा शुभारंभ करावा, चांगल्या कामासाठी योगदान देता यावे, हा शुद्ध हेतू असतो.

परंतु, अलीकडे विचार लक्षात न घेता केवळ ट्रेंड म्हणून अनेक गोष्टी केल्या जातात. कुणी विचारले, तर त्यामागचे कारणही सांगता येत नाही. त्यामुळे व्यक्तीचे हसे होतेच, परंतु धर्म संस्कृतीवर देखील प्रश्नचिन्ह उभे केले जाते. म्हणून एखाद्या गोष्टीचे अनुसरण करायचे असेल, तर आधी त्याची संपूर्ण माहिती करून घ्यावी आणि मगच त्यानुसार कृती करावी.

टॅग्स :Navratriनवरात्रीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणHealth Tipsहेल्थ टिप्स