शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

Navratri 2021: उदाे बाेला...उदाे...अंबाबाई माउलीचा हाे; साडेतीन वेटोळ्यांचा नाग पाहिलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 07:36 IST

Navratri Special: चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. मूर्तीची उंची २ फूट ९ इंच असून, ती काळ्या बेसॉल्ट दगडापासून बनवली आहे.

दुसरी माळ - कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री अंबाबाई म्हणजे भारतातील ५१ शक्तिपीठ आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील देवता. यज्ञकुंडात आहुती दिलेल्या सतीचे नेत्र पडले ते हे ठिकाण. कोल्हापूरची अंबाबाई, कोल्हापूर 

दरवर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या २५०००००

मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापनाआदिलशाही आक्रमणांच्या काळात मूर्तीला इजा पोहोचू नये म्हणून पूजाऱ्यांनी देवीची मूर्ती अज्ञातवासात ठेवली होती. हा कालावधी संपल्यानंतर २६ सप्टेंबर १७१५ मध्ये तिची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. या घटनेला यंदा ३०५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंगदेवीच्या एका उजव्या हातात म्हाळूंग हे बीजफळ आहे. दुसऱ्या हातात खाली टेकवलेली गदा आहे. एका डाव्या हातात ढाल, तर दुसऱ्या हातात पानपात्र आहे. शिवशक्ती स्वरुपिणी असल्याने देवीच्या मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग व त्याभोवतीने साडेतीन वेटोळ्यांचा नाग आहे. म्हणूनच मूळ मूर्तीवर किरीट नाही. चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. मूर्तीची उंची २ फूट ९ इंच असून, ती काळ्या बेसॉल्ट दगडापासून बनवली आहे. पुरातत्त्व खात्याच्या अंदाजानुसार ही मूर्ती दीड हजार वर्षांपूर्वीची आहे. गाभाऱ्याच्या वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे.

अंबाबाईचा नवरात्रोत्सवश्री अंबाबाईचा नवरात्रोत्सव देशभरात प्रसिद्ध असून, या काळात २५ लाखांहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या काळात देवीची वेगवेगळ्या स्त्री देवतेच्या रूपातील पूजा हे खास वैशिष्ट्य आहे. रोज रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी निघते. ललिता पंचमीला त्र्यंबोली टेकडीवर त्र्यंबोली देवीची भेट व कोहळा भेदनाचा विधी होतो. अष्टमीला अंबाबाई सजवलेल्या वाहनातून नगरवासीयांच्या भेटीला निघते. रात्री बारानंतर मंदिरात परत येते. मध्यरात्रीनंतर अष्टमीचा होम होतो. विजयादशमीला देवीची पालखी दसरा चौकात येते. येथे छत्रपतींच्या उपस्थितीत शाही दसरा सोहळा होतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी ई-पासची सुविधा करण्यात आली आहे. ज्यांना ई-पासने दर्शन घेता येणे शक्य नाही त्यांना मुखदर्शनाचीदेखील सोय केली आहे. तरी भाविकांनी नवरात्रौत्सवात प्रशासनाला सहकार्य करावे. - राहुल रेखावार, जिल्हाधिकारी 

टॅग्स :Ambadevi Mandirअंबादेवी संस्थानNavratriनवरात्री