Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:48 IST2025-05-03T12:48:03+5:302025-05-03T12:48:22+5:30

Narasimha Navratri 2025: कोणत्याही प्रकारच्या पिडेतून मुक्ति मिळवण्यासाठी आजपासून सुरू होणार्‍या नृसिंह नवरात्रीत दिलेली उपासना करा, खूप लाभ होईल!

Narasimha Navratri 2025: From today till May 11, don't forget to chant 'this' fever-relieving hymn during Narasimha Navratri! | Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!

Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!

आजपासून अर्थात 3 मे पासून नृसिंह लक्ष्मी नवरात्र(Nrusinha Navratri 2025) सुरू होत आहे. भगवान नृसिंहाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत अर्थात नृसिंह जयंती(Nrusinha Jayanti 2025) पर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते. यंदा हा सोहळा ३ ते ११ मे साजरा केला जाईल. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते. नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.

नृसिंह अवताराची कथा : 

हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हणले होते की "तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री,ना शस्त्रानेना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे."

या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळी); न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबऱ्यावर मृत्यू दिला.ना शस्त्रना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकशिपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला.

नृसिंह मूर्तीचे दर्शन : सोळा हात (षोडषबाहू) असलेली श्री नरसिंहस्वामींची मूर्ती. ही फक्त मंत्रालय इथेच मात्र आहे. ही मूर्ती बघण्याची संधी व भाग्य फक्त वर्षातून एकदाच मिळते. 

आद्य शंकराचार्य रचित नृसिंह लक्ष्मी स्तोत्राचे फायदे : 

लक्ष्मी नृसिंह देवाची आराधना करणाऱ्यांना शनिदेव त्रास देत नाही असे वरदानआहे. नरसिंह देवाचा अवतार हा संध्याकाळी झाला असल्याने लक्ष्मीनृसिंह स्तोत्र तिन्हीसांजेस म्हटल्यास त्याचे विशेष फल मिळते. इथे करावलंब स्तोत्र देत आहे, ते खूप प्रभावी स्तोत्र आहे. रोज शनिवारी सायंकाळी म्हणून बघा, तुमचे कष्ट दूर होतील. या स्तोत्रामागे पूर्वपीठिका आहे. श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र, श्री शंकराच्या अनेक स्तोत्रांपैकी एक आहे. 

एकदा श्रीशंकर श्रीशैलम इथे राहत होते, कापालिक नावाचा एक संन्यासी शंकराकडे येऊन स्वत: करत असलेल्या पूजेसाठी एका संन्यासाचा बली द्यायचा आहे, असे शंकराला सांगतो. कारुण्यमूर्ती श्री शंकर त्याला लगेच संमती देतात. गूरुंचा परम शिष्य पद्मराज, नरसिंह देवाची प्रार्थना करुन, नरसिंह देवाला आपल्या शरीरात प्रवेश करण्याचे आवाहन करतो व क्रोधपूर्ण आवेशात त्या कापालिकाचा बली देतो. श्री पद्मराजाच्या अंगी झालेला नरसिंहाचा अविर्भाव शांत करण्यासाठी श्री शंकर त्याक्षणी  १७ चरणांचे हे स्तोत्र रचतात ते स्तोत्र म्हणजे श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र. नावाप्रमाणेच, त्या परमात्म्याचा कर अवलंबून ( हात धरुन) आपण हा भवसागर तरुन जाण्यासाठी आमचे रक्षण कर असे साकडे घालणारे हे स्तोत्र आहे. या श्लोकाच्या पठणाने भूलोकी असलेले सकल कष्ट, दु:ख, अनारोग्य, सर्व पापेही नष्ट होऊन मोक्ष प्राप्ती होण्याची करुणा होते. हे स्तोत्र प्रात:काळी तसेच संध्याकाळी पठण केल्यास उत्तम. पुढील स्तोत्राची रचना आदी शंकराचार्य यांनी केली आहे. 

श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र। श्री मत्पयोनिधिनेकेतन चक्रपाणी । भोगिंद्रभोगमणेराजित पूण्यमूर्ती ।

योगिश शाश्वत शरण्य भवाब्धिपोत लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १ ।।
ब्रम्हेंद्ररुद्रमरुदर्ककिरिटकोटि संघ-  टितांघ्रिकमलामलकांतिकांत। 
लक्ष्मीलसत्कूचसरोरुहराजहंस लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। २ ।।
संसारदावदहनाकरभिकरोरुज्वा- लावळीभिरतीदग्धतनुरुहस्य ।
त्वत्पादपद्मसरसिरुहमागतस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ३ ।।
संसारजालपतिततस्य जगन्निवास सर्वेंद्रियार्थ बडिशाग्र झशोपमस्य ।
प्रोत्कंपित प्रचुरतालुकमस्तकस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ४ ।।
संसारकुपतिघोरमगाधमुलं संप्रास्य दु:खशतसर्पसमाकुलस्य ।
दीनस्य देव कृपणापदमागतस्य । लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ५ ।।
संसारभिकरकरींद्रहराभिघात निष्पिड्यमानवपूष: सकलार्तिनाश । 
प्राणप्रयाणभवभीतीसमाकुलस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ६ ।।
संसारसर्पविषदिग्धमहोग्रतीव्र दंष्ट्राग्रकोटिपरिदष्टविनष्टमूर्ते: । 
नागारिवाहन सुधाब्धिनिवास शौरे लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ७ ।।
संसारवृक्षबिजमनंतकर्मा- शाखा यातं करणपत्रमनंगपुष्पम ।
आरुह्य दु:खफलित: चकित: दयालो लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ८ ।।
संसारसागरविशालकराळकाळ नक्रग्रहग्रसितनिग्रहविग्रहस्य । 
व्यग्रस्य रागनिचयोर्मिनिपिडितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ९ ।।
संसारसागरनिमज्जनमुह्यमानं दीनं विलोकय विभो करुणानिधे माम ।
प्रल्हादखेदपरिहारपरावतार लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १० ।।
संसारघोरगहने चरतो मुरारे मारोग्रभीकरमृगप्रचुरार्दितस्य । 
आर्तस्य मत्सरनिदाघ्रसुदु:खितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ११ ।।
बध्पदागले यमभटा बहु तर्जनीयंत कर्षंती यत्र भवपाशशक्तैर्यातं माम  । 
ऐकाकीनं परवशं चकितं दयालो लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १२ ।।
लक्ष्मीपते कमलनाभ सुरेश विष्णो  यज्ञेश यज्ञ मधुसुदन विश्वरुप । 
ब्रम्हण्य केशव जनार्दन वासुदेव लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १३ ।।
एकेन चक्रमपरेण करेण शंख- मन्येन सिंधुतनयामवलंब्य तिष्ठन । 
वामेतरेण वरदाभयपद्म चिन्हं लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १४ ।।
अंधस्य मे हृतविवेकमहाधनस्य चोरैर्माहाबलिभिरिंद्रियनामधेय्यो: । 
मोहांधकारकुहरे विनिपातितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १५ ।।
प्रल्हादनारदपराशरपुंडरिकव्यासा-दिभागवतपुंगवहृन्मिवास ।
भक्तानुरक्तपरिपालनपारिजात लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १६ ।।
लक्ष्मीनृसिंह चरणाब्जमधुव्रतेन स्तोत्रं कृतं शुभकरं भूवि शंकरेण ।  
यो तत्पठंति मनुजा हरिभक्तियुक्ता-स्तेयांति तत्पदसरोजमखंडरुपम ।। १७ ।।

Web Title: Narasimha Navratri 2025: From today till May 11, don't forget to chant 'this' fever-relieving hymn during Narasimha Navratri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.