शहरं
Join us  
Trending Stories
1
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
4
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
5
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
8
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
9
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
10
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
11
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
12
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
13
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
14
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
15
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
16
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
17
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
18
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
19
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

Narad Jayanti 2023: महर्षी नारद हे पुराणातील विनोदी पात्र नसून ते अत्यंत वंदनीय विष्णुभक्त होते; वाचा त्यांच्याविषयी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 11:30 IST

Narad Jayanti 2023: ६ मे रोजी महर्षी नारद यांची जयंती आहे. ते आद्य कीर्तनकार म्हणून ओळखले जातात. याबरोबरच त्यांची अनेक स्वभाव वैशिष्ट्य आहेत. ते निस्सीम विष्णुभक्त आहेत. जाणून घेऊया त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी!

ब्रम्हदेवांचा मानसपुत्र, विष्णुंचा प्रियभक्त, त्रैलोक्यात संचार करणारे देवदानवांनंतरचे एकमेव मुनी. ऑल स्पेस परमीट. क्षणात इकडे तर क्षणात तिकडे. देव, दानव, मानव, पशू पक्षी सर्वांशी मैत्री. जगन्मित्र, अजातशत्रु.

व्यक्तिमत्त्व अगदी साधे, धोतर, उपरणे, एका हातात वीणा दुसर्‍या हातात चिपळया, मुखी भगवंताचे अखंड नामस्मरण. मानवासारखेच सर्व विकार व विचार असलेले मानवाचे मानवरूपी प्रतिनिधी. संकटकाळी देवाच्या आधी धावून जाणारे (जसे आपल्या खाजगी चानेलचे प्रतींनिधी शासनाच्याही आधी जाऊन पोहोचतात तसे) कोणतेही स्मरण कोणीही केलेले नसतांना धाऊन जाणारे संकटमोचक अशी त्यांची खरी ओळख आहे. 

डोक्यात भरपूर कल्पना असणारे, कल्पनाशक्तीचे विपुल भांडार. आधुनिक गुगल ऋषी. संगणक देवताच जणू! कधी हार न मानणारे व उदास न होणारे. प्रख्यात वकिलासारखा युक्तिवाद मांडून, प्रसंगी भांडून, कोणत्याही समस्येवर तोडगा काढून, शेवट गोड करणारे असे हे महर्षी नारद!

देवही संभ्रमीत होतील अशा कठीण प्रसंगी धीर न सोडता, आपल्या गोलमाल व गोडगोड बोलण्याने समोरच्यावर छान छाप पाडून, अगदी स्वतःला बुद्धिमान समजणार्‍या भल्या भल्या उन्मत्त राक्षसी वृत्तीच्या उच्चपदस्थांनाही सहज कह्यात घेणारे (उल्लू बनवणारे) नारद. अगा असा मुनी झालाची नाही.

त्यांच्यावर आरोप खूप झाले. कळीचा नारद, (खरे तर ह्यांना बघितलेच की अनेकांची कळी खुलायची, काहीतरी नवे घडणार, किंवा ऐकायला मिळणार!! म्हणून कळीचा नारद), आगलाव्या नारद, लावालाव्या करणारा, काड्या करणारा, भांडण लावून देऊन, दुरून मजा बघणारा. पण इतके आरोप होवूनही हे महाराज भक्तीत गुंग. त्यांनी कधीही हे सर्व आरोप मनावर घेतलेच नाही की रागाने फुगून बसले नाहीत.

बहुजनहित व नीतीची, धर्माची बाजू घेणे, न्यायाने तडजोड करणे, हेच त्यांचे ब्रीद होते. पृथ्वीतलावरच्या यच्चयावत समाज हितासाठी, विकासासाठी, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांसारीक, भौतिक, सांस्कृतिक क्षेत्रात दिवस रात्र संशोधन करून तन मन धनाने कार्यरत असणार्‍या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेत, पालनकर्त्या विष्णूंना त्वरेने जाऊन ते जगातील नववे आश्चर्य म्हणून सांगून त्यांच्या कार्याचा उचित बहुमान घडविण्यासाठी त्यांना “जीवनगौरव” देऊन सत्कार करा सांगणारे आपले नारदच. त्यांच्यामुळेच कित्येक दुर्लक्षित संत, महंत, ऋषि, मुनि, शास्त्रज्ञ, विद्वान, कलावंत, भक्त, जपी, तपी, असे अज्ञाताच्या पडद्याआड असलेले गुणवंत धूलरत्न, जगासमोर आणले गेले. वाल्मिकी, ध्रुव, प्रह्लाद, अनसूया, गौतम ऋषि, भगीरथ, मार्कंडेय, संदीपक, असे अनेक जे प्रसिद्धी टाळत होते, त्यांना त्यांनी त्यांच्या कार्यासहित उजेडात आणले.

अगदी कोणाच्याही दालनात, कोणत्याही वेळेत त्यांना मुक्त प्रवेश होता. मग आता  सांगा, अशी व्यक्ति का नाही आवडणार आबालवृद्धांना? प्रत्येक कीर्तन, भजन, प्रवचनात यांची उपस्थिती गुप्त सुप्त रूपात किंवा कोणत्याही रूपात श्रवणभक्तिसाठी ते असतातच. कारण तेथे भगवंताचे अधिष्ठान असते.जिथे नारायण तिथे महर्षी नारद!