शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कामिका एकादशीचे पौराणिक महत्त्व, या व्रताची सद्यस्थितीशी सांगड आणि पूजाविधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 8:00 AM

व्रत वैकल्यांमध्ये कालानुरुप आवश्यक बदल करून आपण या परंपरांमध्ये सातत्य ठेवू शकतो. जेणेकरून व्रतांचा मूळ उद्देश, तो म्हणजे मानवी मनाचा, देहाचा विकास, साध्य होईल.

आषाढ कृष्ण एकादशीला कामिका एकादशी असे नाव आहे. येत्या बुधवारी म्हणजेच ४ ऑगस्ट रोजी ही एकादशी आहे. या एकादशीची पवित्रा एकादशी आणि कृष्णैकादशी अशी दुसरी नावेही आहेत. या एकादशीला नेहमच्या एकादशीसारखाच उपास आणि पूजा करायची असते. शिवाय श्रीधर या नावाने भगवान विष्णूंची पूजा करून चोवीस तास अखंड तेवता असा तुपाचा दिवा लावणे, हा विशेष विधी असतो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पंचामृत पूजा करावी. पूजेत तुळस असणे आवश्यक असते. तसेच आपल्याला शक्य होईल त्या गोष्टीचे दान द्यावे. 

या एकादशीची एक कथा आहे - 

पूर्वी एका शूर क्षत्रियवीराच्या हातून अपघाताने ब्रह्महत्या घडली. त्यावेळी त्याने त्या ब्राह्मणाचे तेरावे आणि पुन्हा चौदाव्या दिवशीचे अंत्यसंस्कार विधी करायचे असे ठरवले. परंतु ब्रह्महत्या घडली म्हणून सर्व ब्राह्मणांनी त्याच्याकडे जायचे नाकारले. मात्र त्यांनी या पापाचा नाश व्हावा म्हणून त्याला ही कामिका एकादशी करायचा सल्ला दिला. त्याने मनोभावे हे व्रत केले. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला दर्शन दिले. त्याची पापातून मुक्तता केली. व त्याला स्वर्गप्राप्ती झाली.

आपल्या हातूनही कळत नकळत एखाद्याचा अपमान झाला असेल, एखादी व्यक्ती आपल्या बोलण्याने दुखावली वा दुरावली गेली असेल तर या व्रताच्या निमित्ताने त्या व्यक्तीला भेटून तिची माफी मागावी. तिला एखादी वस्तू भेट म्हणून द्यावी. मकर संक्रातीला आपण जसे तिळगूळ देऊन गोड बोला म्हणतो, तसे या एकादशीच्या निमित्ताने दुरावलेली माणसे जोडता आली तर उत्तमच आहे ना!

अशा रितीने व्रत वैकल्यांमध्ये कालानुरुप आवश्यक बदल करून आपण या परंपरांमध्ये सातत्य ठेवू शकतो. जेणेकरून व्रतांचा मूळ उद्देश, तो म्हणजे मानवी मनाचा, देहाचा विकास, साध्य होईल. कामिका एकादशीच्या व्रतातून आपणही हा बोध घ्यायला काहीच हरकत नाही. या व्रताला विष्णूपुजेची जोड दिली, उपास करून उपासना केली, तर मनाबरोबर देहाची शुद्धी होईल आणि एकादशीचे व्रत सुफळ संपूर्ण होईल.