May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 11:01 IST2025-04-30T10:59:56+5:302025-04-30T11:01:29+5:30

May Born Astro: मे महिन्यात जन्मलेल्या लोकांना उच्च राहणीमान आवडते, त्यासाठी ते प्रयत्नही करतात, पण अहंकाराने अनेक गोष्टी गमावतात, त्यांच्याबद्दल जाणून घेऊ.

May Born Astro: Royal, attractive but angry by nature, read the strengths and weaknesses of people born in May! | May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!

May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!

मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते  आणि त्यांना अमाप लोकप्रियता मिळते. थोडेसे निष्काळजी आणि थोडेसे शीघ्रकोपी असतात. जे ठरवतात ते मिळवतात. त्यांचा स्वभाव राजसी असतो, त्यामुळे थोडी अहंकारी वृत्ती असते. तसेच त्यागाचीही वृत्ती असते. 

साधे राहणीमान यांना मानवतच नाही. प्रत्येक गोष्टीत राजेशाही थाट लागतो. त्यांची स्वत: काम करण्याची तयारी कमी आणि दुसऱ्यांकडून काम करवून घेण्याची सवय जास्त असते. घरातल्या सदस्यांनी घरात आवराआवर करावी अशी त्यांची अपेक्षा असते, परंतु स्वत:च्या कामाचा पसारा त्यांना आवरत नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असल्याने चारचौघात उठून दिसत़े घरात ते कसेही राहत असले, तरी बाहेर अगदी टापटिप राहतात. 

प्रेम आणि सांसारिक आयुष्याबाबत त्यांना मजा मस्करी आवडत नाही. ते आपली मर्यादा ओलांडत नाहीत. अनैतिक गोष्टींना त्यांच्याकडे अजिबाब वाव नसतो. भविष्याबद्दल त्यांचे विचार स्पष्ट असतात. ते आपल्या जोडीदाराकडून कधी प्रेमाने तर कधी अरेरावी करून मनासारखे काम करवून घेतात. मैत्रीच्या बाबतीत ते अतिशय प्रामाणिक असतात. शेवटपर्यंत आपली मैत्री निभावतात. 

पत्रकार, लेखक, संगणक अभियंता, पायलट, डॉक्टर, प्रशासन अधिकारी अशा मोठ्या हुद्द्यापर्यंत यांचा प्रवास जातो. मुलींना फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात गती मिळते. 

या लोकांचा कोणी विश्वासघात केला, तर ते त्यांच्यावर पुन्हा कधीच विश्वास ठेवत नाहीत. एवढेच काय, तर त्यांच्याशी पुनश्च संबंधही ठेवत नाहीत. प्रत्येक नात्यात ते अतिशय गुंतून जातात आणि समोरच्याकडूनही तेवढ्याच प्रेमाची अपेक्षा ठेवतात. या स्वभावाचा कधी त्यांना तर कधी इतरांना त्रास होतो. 

या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती प्रेम करताना हात राखत नाहीत. आपले सर्वस्व अर्पण करून टाकतात. याच स्वभावाचा फायदा अनेक जण घेतात त्यामुळे त्यांचे हितशत्रू वाढत जातात. अति स्पष्टवक्तेपणामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते, याची त्यांना जाणीव होत नाही. ते आपलेच म्हणणे खरे करतात. त्यामुळे यांच्या आयुष्यात अनेक लोक येऊनही त्यांचे हितसंबंध फार काळ टिकत नाहीत. यासाठी त्यांनी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवणे गरजेचे आहे. 

मे महिन्यात माधुरी दीक्षित, अनुष्का शर्मा, करण जोहर यांसारख्या सिनेतारकांचा वाढदिवस असतो. तुमचाही वाढदिवस या महिन्यात असेल, तर वरील गुणविशेष तुमच्याशी जुळतात का हे ताडून पहा...!

Web Title: May Born Astro: Royal, attractive but angry by nature, read the strengths and weaknesses of people born in May!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.