आज २१ मार्च २०२६, चैत्र शुद्ध तृतीया! आजच्या दिवशी भगवान विष्णूंनी सृष्टीच्या रक्षणासाठी आपला पहिला अवतार म्हणजेच 'मत्स्य अवतार' धारण केला होता. हिंदू धर्मात मत्स्य जयंतीला(Matsya Jayanti 2026) अत्यंत पवित्र मानले जाते, कारण ही केवळ एका अवताराची कथा नसून ती विनाशातून नवनिर्मितीकडे नेणारी आणि ज्ञानाचे जतन करणारी गाथा आहे. या मंगल दिनाचे महत्त्व आणि पूजा विधीची सविस्तर माहिती घेऊ.
स्वामी समर्थ प्रकट दिन २०२६: तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आहे का? ओळखा 'या' ५ अदृश्य खुणा!
मत्स्य अवताराचे महत्त्व
पौराणिक कथेनुसार, जेव्हा 'हयग्रीव' नावाच्या असूराने वेदांची चोरी केली आणि पृथ्वीवर महाप्रलयाचे संकट आले, तेव्हा भगवान विष्णूंनी मत्स्य (मासा) रूप धारण केले. त्यांनी सत्यव्रत राजाला नौका बांधण्यास सांगून त्यात सप्तर्षी, औषधी आणि सर्व जीवमात्रांचे बी सुरक्षित ठेवण्यास सांगितले. प्रलयाच्या वेळी भगवंतांनी त्या नौकेचे रक्षण केले आणि पुन्हा एकदा सृष्टीची स्थापना केली. हा अवतार आपल्याला संकटाच्या वेळी धैर्याने तोंड देण्याची आणि निसर्गाचे रक्षण करण्याची शिकवण देतो.
भगवान विष्णूंची पूजा विधी
आजच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी लाभते, अशी श्रद्धा आहे.
१. संकल्प आणि अभिषेक: सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळी वस्त्रे परिधान करावीत. श्रीविष्णूंच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला पंचामृताने आणि शुद्ध जलाने अभिषेक करावा.
२. अष्टगंध आणि फुले: देवाला पिवळे चंदन (अष्टगंध) लावून तुळशीची पाने आणि पिवळी फुले अर्पण करावीत. विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे.
३. मत्स्य रूप पूजन: शक्य असल्यास पात्रात पाणी घेऊन त्यात माशाची प्रतिमा ठेवून तिचे पूजन करावे.
४. धूप-दीप आणि नैवेद्य: शुद्ध तुपाचा दिवा लावून देवाची आरती करावी. नैवेद्यात साखर-खोबरे, फळे किंवा शिऱ्याचा (प्रसादाचा) नैवेद्य दाखवावा.
५. मंत्रपठण: पूजेवेळी या मंत्राचा जप करणे फलदायी ठरते - "ॐ नमो भगवते वासुदेवाय"
तुम्ही हे ५ आशीर्वाद तुमच्या मुलांना रोज देता का? नाही? मग आजपासूनच करा सुरुवात!
आजच्या दिवसाचे खास महत्त्व
मत्स्यजयंती हा दिवस आपल्याला जलसंवर्धनाचा संदेश देतो. जलचर प्राण्यांचे रक्षण करणे आणि नद्या-समुद्र प्रदूषित न करणे, हीच खऱ्या अर्थाने भगवंताची सेवा ठरेल.
Web Summary : Matsya Jayanti celebrates Vishnu's first avatar, saving Earth from destruction. The story emphasizes courage and nature conservation. The day involves Vishnu puja with Panchamrita, yellow flowers, and the mantra "Om Namo Bhagavate Vasudevaya", promoting peace and prosperity. It also highlights water conservation.
Web Summary : मत्स्य जयंती विष्णु के पहले अवतार का उत्सव है, जो पृथ्वी को विनाश से बचाता है। यह कहानी साहस और प्रकृति संरक्षण पर जोर देती है। इस दिन पंचामृत, पीले फूलों और मंत्र "ओम नमो भगवते वासुदेवाय" के साथ विष्णु पूजा की जाती है, जो शांति और समृद्धि को बढ़ावा देती है। यह जल संरक्षण को भी उजागर करता है।