दीपावलीपूर्वी(Diwali 2025) येणारे पुष्य नक्षत्र हे ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते, याला 'नक्षत्रराज' असे म्हटले जाते. दीपावलीच्या अगदी आधी येणारे हे नक्षत्र, धनत्रयोदशीप्रमाणेच खरेदी आणि गुंतवणुकीसाठी सर्वात शुभ मानले जाते, कारण या नक्षत्रात केलेले कार्य अक्षय (अखंड) आणि दुप्पट फळ देते.
पुष्य नक्षत्र २०२५ ची शुभ वेळ आणि महत्त्व(Pushya Nakshatra importance and shopping muhurta 2025):
पुष्य नक्षत्राचा शुभ योग २०२५ मध्ये अश्विन कृष्ण अष्टमी तिथीला, मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३:४२ वाजता सुरू होईल आणि तो पुढील दिवशी बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३:१९ पर्यंत राहील. या नक्षत्रात विशेषतः मंगळवारचा संयोग जुळून येत असल्याने याला 'मंगल-पुष्य योग' म्हटले जाईल, हा योग अत्यंत फलदायी असतो. या काळात चंद्र त्याची स्वतःची रास असलेल्या कर्क राशीत राहील. या नक्षत्रात केलेले दान किंवा खरेदी केलेली वस्तू अनेक पटींनी वाढते, तसेच मंत्रांच्या उपासनेतून शंभरपट अधिक फळ मिळते.
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!
मंगल-पुष्य नक्षत्रात खरेदी आणि गुंतवणुकीचे लाभ
मंगळवार पुष्य नक्षत्राचा संचरण मंगलकारी असल्याने या दिवशी केलेली खरेदी विशेष लाभ देते, कारण भूमीवर मंगळाचे आधिपत्य आहे. या शुभ योगात जमीन आणि मालमत्ता (उदा. घर, फ्लॅट) खरेदी करणे अत्यंत फलदायी ठरते आणि संपत्तीत वाढ होते. यासोबतच, सोने दागिने खरेदी करणे स्थिरता आणि समृद्धी आणते. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, म्युच्युअल फंड, स्टॉक किंवा इतर कोणत्याही प्रकारचा दीर्घकालीन गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. व्यापार, उद्योग किंवा घरातील वापरासाठी नवीन खातेवही, वाहने, मशीनरी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
टीप: पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ असले तरी, ज्योतिषशास्त्रानुसार या नक्षत्रात विवाहाशी संबंधित कोणतेही कार्य करू नये. हा योग सुख-समृद्धी घेऊन येण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.
Web Summary : Pushya Nakshatra on October 14, 2025, is ideal for investments. Buying property, gold, and long-term investments on this day brings prosperity. Avoid marriage-related activities.
Web Summary : 14 अक्टूबर 2025 को पुष्य नक्षत्र निवेश के लिए उत्तम है। इस दिन संपत्ति, सोना और दीर्घकालिक निवेश खरीदने से समृद्धि आती है। विवाह संबंधी गतिविधियों से बचें।