>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
अनेक वेळा विवाहाचे वय थोडे जरी पुढे गेले तरी पालक लगेच चिंतेत पडतात. घरात तोच विषय असतो. पण त्यामुळे अनेकदा १०० स्थळे बघितली वगैरे बोलण्यात येते आणि मग एखादे स्थळ समोरून आले किंवा आपण पाहिले, वरवर सर्व चांगले दिसले आणि २८-२५ असे गुण जुळत आहेत हे बघितल्यावर विचारचक्र जणू थांबतात आणि स्थळाला होकार दिला जातो. कदाचित हाच जो निर्णायक क्षण आहे ज्यात घाई केली जाते. ती होऊ नये म्हणून हा लेखन प्रपंच.
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!
आपल्या नातेवाईक मित्र मंडळीत कुणाचा विवाह ठरला की आपल्याला आनंद होतो पण मग आपल्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह अजून नाही ठरला त्याची सल कारण नसताना मनाला टोचून राहते. अनेकदा अशी घाई करून केलेले विवाह पुढे अनेक प्रश्न निर्माण करतात. ह्या घाई चे उत्तर पत्रिकेतील हर्षल आणि नेपच्यून हे ग्रह होत.
हर्षल हा आकस्मित गोष्टी करणारा ग्रह आहे. मध्यंतरी एक गोष्ट वाचली होती. सातारा सांगली ह्या गावात कुठेतरी सकाळी मुलगी पाहायला गेले आणि संध्याकाळी चक्क वरातच घरात घेऊन आले. इतकी घाई कश्यासाठी? हे असे पटकन निर्णय घेण्यासाठी स्थिती उत्पन्न करणारा ग्रह म्हणजे हर्षल. जराही विचार न करता नुसता चेहरा बघून किंवा माफक अपेक्षा पूर्ण होत आहेत पुढे चौकशी का करायची? अशा विचारांनी किंवा गेली दोन वर्ष स्थळं बघत आहोत आता स्थळं बघण्याचाही कंटाळा आलाय हे सर्व विचार एखाद्या स्थळाला पटकन होकार देण्यास पुरेसे ठरू शकतात, पण पुढे ह्याच होकाराने आयुष्य वेगळ्या वळणावर जाऊ शकते.
ज्योतिष बाजूला ठेवा, पण मुला मुलीनी एकमेकांना अनेकदा भेटले पाहिजे, आपल्या प्रश्नांची उत्तरे समोरच्याकडून खुबीने काढून घेतली तर समोरच्याचे व्यक्तिमत्व कसे आहे त्यावर थोडा तरी प्रकाश टाकता येतो. ज्योतिष शास्त्राचा उपयोग निदान विवाहासाठीसाठी तरी करून घ्यावा असे वाटते. पत्रिकेत हर्षल नेपच्युन जर सप्तम ह्या भावात असतील तर स्थळाची कसून चौकशी करावी. नेपच्युन हा ग्रह गूढता, असत्य, लपवा छपवी अशा गोष्टी दर्शवतो. सप्तम भावात हे दोन ग्रह ठाण मांडून बसलेअसतील तर निश्चित ही फळे मिळतील. त्याचप्रमाणे लग्नात असलेले हर्षल नेपच्युन सप्तम भावावर दृष्टी टाकतात तसेच लग्नात असतील तर स्वभाव विक्षिप्त करतील व्यक्तिमत्व गूढ असते. सप्तमेशाचा संबंध हर्शल नेप ह्या ग्रहांशी असेल किंवा लग्नेशाचाही संबंध ह्या दोन ग्रहांशी असेल तर अधिक काळजी घ्यायलाच हवी .लग्नेश नेपच्यून सोबत असल्यास समोरच्या स्थळाकडून फसवणूक होण्याची शक्यता अधिक होते.
सप्तम भावाचा किंवा सप्तमातील ग्रहांचा ह्या दोन ग्रहांशी कुठल्याही प्रकारचा संबंध वैवाहिक जीवनात काहीतरी वादळे आणतोच. वैवाहिक सुखाचा कारक ग्रह शुक्र हा सुद्धा हर्षल नेपच्यूनसोबत असेल तर शुक्राचे नैसर्गिक कारकत्व बिघडते. विवाहानंतर आलबेल होण्याऐवजी अनेक गोष्टी समोर येऊ लागतात, ज्या आधी माहित नव्हत्या! म्हणूनच स्थळाची कसून चौकशी करा, विवाहाची घाई अजिबात नको. वय पुढे गेले असेल तरीही! कारण घाई करून जर पुढे तो टिकला नाही तर त्याला जबाबदार कोण?
हर्षल हा आकस्मित पसंती दर्शवतो. ती मला खूप आवडली किंवा आवडला, माझ्या मनातून तो जातच नाही असे शब्द क्षणिक असतात. आवडला म्हणजे नेमके काय ते मुलांना समजत नाही कारण त्यांचे वय. पण पालकांनी सुद्धा सर्व चौकशी करायला हवी. अनेकदा नेपच्यूनचा संबंध असेल तर लग्न झाल्यावर मुलगी किंवा मुलगा सांगतो की मला हे लग्न करायचे नव्हते, माझे दुसऱ्यावर प्रेम होते पण आई वडिलांच्या दबावामुळे लग्न केले. आता हे सर्व लग्न झाल्यावर सांगून तसाही काहीच उपयोग नसतो. म्हणूनच हर्षल नेपच्यून पत्रिकेत विवाह सुखाच्या आड तर येत नाहीत ना, हे पाहणे आवश्यक आहे. राहू असेल तर कदाचित आपल्या जातीत लग्न होणार नाही पण हर्षल नेपच्यून काहीतरी गूढ स्थिती लपवण्याकडे कल असणारे स्पष्ट चित्र समोर न येऊ देण्यासाठी स्थिती निर्माण करणारे असल्यामुळे त्यांचे फलित तपासावे लागते. अनेक पत्रिका पाहिल्यावर जेव्हा हर्षल नेपच्यूनची फळे जोरदार मिळालेली आहेत आणि म्हणून विवाह आनंदाचे झालेले नाही असे लक्षात आले, म्हणून हा लेखन प्रपंच. फक्त गुण मिलना वर जाऊ नका. ग्रहांचे मिलन अनेक गोष्टींवर प्रकाश टाकते जे गुण मिलनात समजत नाही. जाणकार, अभ्यासू ज्योतिषाकडून पत्रिकेचे विवेचन करून घ्या. प्रश्न विचारा आणि मुलीच्या किंवा मुलाच्या आणि कुटुंबियांच्या प्रत्यक्ष भेटीत प्रत्यक्ष अपरोक्ष सुद्धा आपल्या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळवा. कुणी आपली फसवणूक करेल हे गृहीत धरून स्थळ पाहू नका पण सतर्क मात्र राहा.
बुध गुरु युती २०२५: बुध-गुरुचा शक्तिशाली नवपंचम राजयोग; 'या' ७ राशींचा सुखाचा काळ होणार सुरु
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत फसतो तेव्हा फसण्याचे योग आपल्या स्वतःच्याच कुंडलीत असतात म्हणून कुणीतरी येऊन आपल्याला फसवतो त्यामुळे आपल्या पत्रिकेचा मुळात अभ्यास असणे आवश्यक असते आणि त्या स्वीकारणे सुद्धा . सहमत ?
संपर्क : 8104639230
Web Summary : Astrology warns against rushing marriage decisions. Harsh and Neptune in the birth chart can create marital issues. Thoroughly investigate potential partners and seek astrological guidance to avoid future problems and deception, even if delayed.
Web Summary : ज्योतिष विवाह के फैसलों में जल्दबाजी के खिलाफ चेतावनी देता है। जन्म कुंडली में हर्षल और नेपच्यून वैवाहिक समस्याएं पैदा कर सकते हैं। भविष्य में समस्याओं और धोखे से बचने के लिए संभावित भागीदारों की अच्छी तरह से जांच करें और ज्योतिषीय मार्गदर्शन लें, भले ही देरी हो।