२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:26 IST2025-12-06T16:25:33+5:302025-12-06T16:26:01+5:30

Margashirsha Sankashti Chaturthi December 2025: २०२५ मधील शेवटच्या संकष्ट चतुर्थीला काही सोपे, सुलभ उपाय करणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

margashirsha sankashti chaturthi december 2025 do these 5 remedies and be free from worries you will receive immense blessings from ganpati | २०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!

२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!

Margashirsha Sankashti Chaturthi December 2025: रविवार, ०७ डिसेंबर २०२५ रोजी संकष्ट चतुर्थी आहे. मार्गशीर्ष महिन्यातील ही संकष्टी विशेष मानली जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विशेष पूजन, नामस्मरण, उपासना, आराधना करण्याची प्राचीन परंपरा आजपर्यंत अखंडितपणे सुरू असल्याचे पाहायला मिळते. गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर कायम असावी, सगळे चांगले व्हावे, मंगलमूर्ती विघ्नहर्ता होऊन मदतीला धावून यावा, असे सगळ्यांना वाटत असते. सन २०२५ या वर्षातील ही शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. या निमित्ताने काही उपाय आवर्जून केल्यास त्याचे चांगले सकारात्मक प्रभाव परिणाम पाहायला मिळू शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी व्रत कोणीही करू शकतो. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. 

२०२५ शेवटच्या संकष्ट चतुर्थीला काय उपाय करता येतील?

गणपती बाप्पाचे पूजन, नामस्मरण करताना अनेकदा अनेक गोष्टींमध्ये अडचणी, अडथळे, समस्या येत असतात. प्रयत्न केले जातात, कठोर परिश्रम, मेहनत केली जाते; परंतु, त्याचे यथायोग्य फळ मिळतेच असे नाही. अशा वेळी काही उपाय करावे, असा सल्ला दिला जातो.  संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्यास त्याचा लाभ होऊन सकारात्मक अनुकूलता अनुभवता येऊ शकते, असे सांगितले जाते. 

- परीक्षेत, स्पर्धेत, अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण करावे. हे व्रत मनोभावे करावे. 

- यशप्राप्ती आणि प्रगतीसाठी गणपतीला ११ दुर्वांच्या ११ जुड्या अर्पण कराव्यात. २१ जुड्या अर्पण केल्या तर उत्तम. 

- गणपतीला आवडणारी फुले आवर्जून अर्पण करावीत. 

- गणपती संकटनाशनम् स्तोत्र म्हणावे. ‘ॐ गं गणपतये नम:’ किंवा ‘ॐ सिद्धिविनायकाय नम:’ या मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.

- गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. म्हणता येणे शक्य नसेल तर मनोभावे श्रवण करावे.

- राहु-केतुसह अन्य काही ग्रह दोष असल्याचे सांगितले असल्यास ‘ॐ दुर्मुखाय नमः’ या मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

 

Web Title : 2025 की अंतिम संकष्टी चतुर्थी: सुख-समृद्धि के लिए उपाय।

Web Summary : सुख और भगवान गणेश का आशीर्वाद पाने के लिए 2025 की अंतिम संकष्टी चतुर्थी पर ये उपाय करें। सफलता और कल्याण के लिए मंत्रों का जाप करें, दुर्वा घास चढ़ाएं और व्रत रखें।

Web Title : Last Sankashti Chaturthi of 2025: Remedies for happiness and blessings.

Web Summary : Perform these remedies on the last Sankashti Chaturthi of 2025 for happiness and Lord Ganesha's blessings. Recite mantras, offer Durva grass, and observe the fast for success and well-being.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.