शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
4
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
5
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
6
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
7
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
8
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
9
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
10
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
11
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
12
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
13
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
14
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
15
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
16
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
17
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
18
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
19
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...

Mangalagauri 2025: मंगळागौरीच्या पूजेनंतर म्हणा 'ही' आरती; होईल विवाह सौख्याची प्राप्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 07:05 IST

Mangalagauri 2025: श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते आणि वैवाहिक सुखासाठी पुढे दिलेली आरती रूपी प्रार्थनाही केली जाते.

मंगळागगौरीची(Mangalagauri 2025) पूजा म्हणजे उमामहेश्वराची पूजा. पती-पत्नी दोघांतील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते आणि त्यांची कृपा संपादन करण्यासाठीच ही पूजा केली जाते. श्रावण मासात दर मंगळवारी हे व्रत केले जाते. आज तिसरा मंगळवार!

मंगळागौरीच्या व्रतात शिव व गणपती यांच्यासह गौरीची पूजा करतात. पूजेसाठी चौरंग मांडतात. त्याला केळीचे खुंट बांधून मखर तयार करतात. ते फुलांनी सजवतात. त्या भोवती रांगोळी काढतात. या पूजेत १६ संख्येचे विशेष महत्त्व आहे. सोळा प्रकारची पत्री, सोळा प्रकारची फुले आणि पुरणाचे सोळा दिवे यांसह षोडशोपचारे गौरीची पूजा केली जाते. तसेच गौरीसाठी पुरणाचे अलंकार केले जातात. त्यात दागिने, हार, गजरा, भातुकली, फणी असे प्रकार पुरणापासून बनवले जातात व पूजा करतेवेळी गौरीला अर्पण केले जातात. पूजा झाली की मंगळागौरी व्रताची कथा वाचली जाते व त्यानंतर पुढील आरती मनोभावे म्हटली जाते. 

जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।१।।पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।२।। साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।३।।डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।४।।न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।५।।सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।६।।लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।मागुती परतु‍नीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।७।।

या आरतीने पूजा संपन्न होते. रात्री खेळ, गप्पा, गाणी करत जागरण केले जाते आणि पुन्हा एकदा ही आरती म्हणून दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा झाली की पूजेची सांगता केली जाते. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलMangalagaur Specialमंगळागौर स्पेशलPuja Vidhiपूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण